Bibwewadi | Chetan Chavir | बिबवेवाडी परिसरात विविध समस्यांनी नागरिक त्रस्त  | समस्य सोडवण्याची भाजप नेते चेतन चावीर यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी 

Categories
Breaking News PMC social पुणे

Bibwewadi | Chetan Chavir | बिबवेवाडी परिसरात विविध समस्यांनी नागरिक त्रस्त

| समस्य सोडवण्याची भाजप नेते चेतन चावीर यांची महापालिका आयुक्ताकडे मागणी

 

Bibwewadi | Chetan Chavir |बिबवेवाडी परिसराती नागरिक खड्डे, पाणी न येणे, ड्रेनेज लाईन टाकणे, चेंबर दुरुस्ती व राडारोडा अशा विविध समस्यांनी ग्रासले आहेत. या समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी भाजप नेते चेतन चावीर यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune PMC News)

चावीर  यांच्या निवेदनानुसार  बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक – २८ मध्ये खिलारे,वस्ती ढोले मळा,डायसप्लॉट झोपडपट्टी भागा मध्ये कित्येक महिने खड्डे,ड्रेनेज लाईन टाकणे,चेंबर दुरुस्ती, कमी दाबाने पाणी येणं व राडारोडा उचलणे अश्या अनेक समस्यांना स्थानिक नागरिक तोंड देत आहेत. काही भागात नागरिकांच्या दरवाजा मध्ये चेंबर च घाण पाणी साचून राहत आहे. त्यामुळे वस्ती भागामध्ये रोगराई पसरून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. झोपडपट्टी च्या काही भागात पाणी येत नाही. अश्या अनेक समस्यांना नागरिक तोंड देत आहेत.

चावीर यांनी पुढे म्आहटले आहे  कि, खात्यातील संबंधित अधिकारी यांना वारंवार तक्रार करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आहे असं आमच्या लक्षात येत आहे. आमच्या परिसरात कधीपर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे,चेंबर दुरुस्ती व पाण्याची लाईन, राडारोडा उचलणे ही सर्व कामे कधी पर्यंत पूर्ण करून देणार आहेत याचं लेखी उत्तर द्यावे. तक्रारी  लवकरात लवकर मार्गी लावाव्यात.

Dr. Siddharth Dhende | डॉ. सिद्धार्थ धेंडे स्वीकारणार निराधार १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व 

Categories
Breaking News Education Political social पुणे

डॉ. सिद्धार्थ धेंडे स्वीकारणार निराधार १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व

–   डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त संकल्प

निराधार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्यासाठी पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पुढाकार घेतला आहे. १३२ विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याची जबाबदारी डॉ. धेंडे यांनी घेतली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त हा संकल्प केला असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली जाणार आहे.

आई वडिलांचे लहानपणीच छत्र हरविल्याने अनेक मुलांचे आयुष्य भरकटले जात आहे. त्यांना शिक्षण, नोकरी, योग्य जगण्याचे मार्गदर्शन होत नाही. परिणामी त्यांचे मोठे नुकसान होत आहे. समाजाची एक पिढी नाहक गैरमार्गाला लागण्याची शक्यता असते. लोकप्रतिनिधी या नात्याने काम करत असताना विविध ठिकाणी फिरताना ही परिस्थिती निदर्शनास येत आहे. ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षणाविषयी आधार देण्याचा मानस केला होता. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचा सर्वत्र माहोल आहे. त्या निमित्त अनेक सामाजिक उपक्रम माझ्या पुढाकाराने आयोजित केले जात आहेतच. मात्र यंदा १३२ निराधार विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाच्या खर्चाचा भार उचलणार असल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

जून महिन्यापासून नवे शैक्षणिक वर्ष सुरु होणार आहे. त्या वर्षापासूनच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी निराधार विद्यार्थ्यांच्या पालकांनी नागपूर चाळ येथील जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच ९६८९९३४२८४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन, डॉ. धेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक सुधारणा करत असताना शिक्षण या विषयाला खूप महत्व दिले आहे. लोकांना गुलामीतून, आर्थिक दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचा उपयोग होतो. अन्यायाला वाचा फोडली जाते. समाजात ज्यांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरविले आहे. ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीचे निमित्त साधत निराधार विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय मी घेतला आहे.

डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी उपमहापौर, पुणे महापालिका

CM Pune Tour | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर 

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी पुणे दौऱ्यावर

पुणे | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सद्यस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्याचा दौरा करत आहेत. पाऊस आणि पीकपाण्याचा आढावा घेण्याबरोबर विविध निर्णय घेतले जात आहेत. याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री शिंदे आज म्हणजेच मंगळवारी पुणे दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिनांक २ ऑगस्ट २०२२ रोजीचा पुणे जिल्हा दौरा कार्यक्रम

सकाळी ११.०० वाजता: पाऊस, अतिवृष्टी, पीक- पाणी व विकास कामे विभागीय आढावा बैठक
स्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

दुपारी १२.४० वाजता: पत्रकार परिषद, पुणे
स्थळ: विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे

दुपारी १.२० वाजता: फुरसुंगी पाणी योजना प्रकल्पास भेट व पाहणी. तुकाई दर्शन टेकडी
स्थळ: भेकराईनगर, फुरसुंगी.

दुपारी २.२० वाजता- श्री खंडोबा जेजुरी देवस्थान येथे राखीव

दुपारी २.४५ वाजता: शिवसेना पक्षाची जाहीर सभा
स्थळ:- पालखी तळ मैदान क्रमांक- १, सासवड, पुरंदर

सायंकाळी ५.४५: वाजता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदान उद्घाटन समारंभ आणि हडपसर उद्यान येथील कार्यक्रमास उपस्थिती
स्थळ :- जेएसपीएम महाविद्यालयाशेजारी, हांडेवाडी, महमदवाडी, हडपसर

सायंकाळी ७.०० वा: आमदार तानाजी सावंत यांचे निवासस्थान येथे राखीव

सायंकाळी: ७.५५ वाजता: शंकर महाराज मठ धनकवडी येथे आगमन व राखीव

रात्री ८.४० वाजता: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदीर व दत्त मंदीर येथे राखीव
रात्री ८. ५५ वाजता: गणेश मंडळ व नवरात्र उत्सव मंडळ यांची आगामी उत्सवासंदर्भात बैठक
स्थळ: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदीर सभागृह

रात्री ९.१५ वाजता : दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, कोथरुड येथे राखीव

रात्री ९.४५ वाजता: कोथरुड पुणे येथून मोटारीने ठाणे निवासस्थानाकडे प्रयाण