Pune News | पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कविता कांबळे (खरात)यांची निवड

Categories
Breaking News Education पुणे

Pune News | पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कविता कांबळे (खरात)यांची निवड

Pune News | पुणे जिल्हा (Pune District) कार्यक्षेत्र असणारी पुणे जिल्ह्यातील एक अग्रगण्य पतसंस्था पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी चिखलगाव ता. मुळशी च्या मुख्याध्यापिका कविता खरात (कांबळे) (Kavita Kamble) व व्हाईस चेअरमन पदी दौंड चे शिक्षक संदीप रसाळ (Sandip Rasal) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. (Pune News)
    पतसंस्थेचे अधिकृत भागभांडवल वीस कोटी,वसूल भांडवल दहा कोटी, वार्षिक नफा सव्वा कोटी रूपये मिळविणारी स्वभांडवली पतसंस्था असून पुणे शहरात सुसज्ज असे कार्यालय आहे. कविता खरात अनेक जिल्हा,राज्य, पंचायत समिती मुळशी गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षिका आहेत. (Education News)
 या निवडीबद्दल संस्थापक नाना जोशी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्य कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, जिल्हाध्यक्ष सुनिल वाघ, सरचिटणिस संदीप जगताप,राज्य नेते महादेव माळवदकर, सुनिल लोणकर,मुळशी तालुका अध्यक्ष संदीप दुर्गे, ज्ञानदेव बागल,सचिन हंगरगे, सदानंद चौधरी,राजू आत्तार,विलास पानसरे,कुंडलिक कांबळे,सुनिल कुंजीर ,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष प्रियतमा दसगुडे,वंदना कोल्हे,दशरथ बेलखेडे,ज्योती सोनकळे,महानंदा बडेकर,यांनी अभिनंदन केले.
—-
News Title | Pune News |  Election of Kavita Kamble (Kharat) as Chairman of Pune District Primary Teachers Co-operative Credit Institution

MP Supriya Sule | निसर्गसौंदर्याने नटलेल्या भागात कचरा टाकू नका | खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन

Categories
Breaking News cultural Political पुणे महाराष्ट्र

निसर्गसौंदर्याने नटलेल्या भागात कचरा टाकू नका

| खासदार सुप्रिया सुळे यांचे आवाहन

बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर-वेल्हा-मुळशी या भागावर निसर्गाचे वरदान आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला हा भाग आहे. या भागात फिरायला किंवा अन्य कोणत्याही कामासाठी गेलेल्या पर्यटक अथवा प्रवाशांनी प्रवासादरम्यान गाडीतून किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव येथे रस्त्याच्या बाजूला कचरा टाकू नये, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

खासदार सुळे या काल (दि. १०) मुळशी तालुका दौऱ्यावर होत्या. तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना भेट दिली. या दौऱ्यात असताना प्रवासादरम्यान निसर्गाने परिपूर्ण असलेल्या अनेक भागात गाडीतून उतरून त्यांनी निसर्गाचा अनुभव घेतला. अनेक ठिकाणी त्यांना स्वतः आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो आणि व्हिडीओ घेण्याचाही मोह आवरता आला नाही. त्यावेळी स्वतः घेतलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी हे आवाहन केले आहे.

बारामती लोकसभा मतदार संघातील मुळशी, भोर आणि वेल्हा भागातून प्रवास करीत असताना निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य अनुभविता येते. याशिवाय राज्यातील सह्याद्री असो की सातपुडा, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सृष्टीसौंदर्याची रेलचेल असणारी कितीतरी ठिकाणे आहेत. महाराष्ट्रातील आपल्या भूमीचा अतिशय महत्वाचा ठेवा आहे; परंतु अनेकदा या हिरवाईत आणि निसर्गाने नटलेल्या सुंदर अशा या प्रदेशात ठिकठिकाणी कचरा दिसतो. हे अतिशय वाईट आहे. हा भाग सुंदर आहे. त्याचे सौंदर्य अबाधित राखणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे पर्यटक अथवा अन्य प्रवाशांनी प्रवासादरम्यान गाडीतून किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव येथे रस्त्याच्या बाजूला कचरा टाकू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आपण सर्वांनी निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असणाऱ्या ठिकाणांची काळजी घेतली पाहिजे. हा आपला सुंदर ठेवा कायम सुंदर रहावा यासाठी सर्वांनी कचऱ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करायला हवे. आपण सर्वांनीच सृष्टीसौंदर्याची मुक्त उधळण असणारे परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करुया, असेही त्यांनी म्हटले आहे.