Swaminarayan Temple to Ravet DPR |  स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी चार हजार कोटींचा डीपीआर तयार

Categories
Breaking News Political social पुणे

Swaminarayan Temple to Ravet DPR |  स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार

| केंद्राने चार हजार कोटींचा डीपीआर तयार केल्याची खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती

 

Swaminarayan Temple to Ravet DPR |पुणे : मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत (Swami Narayan Temple To Ravet) या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एलिव्हेटेड हायवे (Elevated Highway) बांधण्यासाठी ४ हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे. यासोबतच कोथरूड ते मुळशी दरम्यान भुयारी मार्ग आणि पूल तसेच सेवा रस्त्यांचे काम लवकरच सुरू होत आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule)  यांनी आज दिली.

या रस्त्यांबाबतच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी सुळे यांनी आज एनएचएआयच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली. बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते नवले पूल ते वारजे व चांदनी चौक ते रावेत येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम निकाली काढण्यासाठी त्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत. याला सकारात्मक प्रतिसाद देत नीतीन गडकरी यांनी एलिव्हेटेड हायवे बांधण्यासाठी ४ हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

वडगाव आणि वारजे पुलासह सेवा रस्त्यासाठी ३६ कोटींचा निधी मंजूर
यासोबतच कोथरुड ते मुळशी भुयारी मार्गाचे कामही लवकरच सुरु होत असून वडगाव येथील पुलासह वारजे येथील मुठा नदीवरील पुल आणि दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्याचे काम करण्यासाठी ३६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले असून ही सर्व कामे लवकरात लवकर पुर्ण होऊन या भागातील दळणवळण अधिक सुसह्य आणि सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


News Title |Swaminarayan Temple to Ravet DPR | DPR prepared for Swaminarayan Mandir to Ravet Elevated Highway | MP Supriya Sule informed that Center has prepared DPR worth 4 thousand crores

MP Supriya Sule | अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी |खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी | नवले पूल परिसरात पुन्हा मोठा अपघात

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

अपघातग्रस्तांना राज्य शासनाने मदत जाहीर करावी |खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

| नवले पूल परिसरात पुन्हा मोठा अपघात: चारजणांचा मृत्यू: अनेक जखमी

पुणे : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलापासून जवळच स्वामी नारायण मंदिरा समोरील पुलाखाली आज मध्यरात्री पुन्हा मोठा अपघात झाला. त्यात चारजणांचा बळी गेला तर अनेकजण जखमी झाले. या घटनेत मरण पावलेल्या दुर्दैवी व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारने तातडीने मदत जाहिर करण्याची आवश्यकता आहे. याखेरीज या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींवरील उपचारांचा खर्च राज्य सरकारने उचलावा ही आमची मागणी आहे. शासनाने संवेदनशीलता दाखवून याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पहाटे ट्रक आणि खासगी बसच्या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत त्यांची विचारपूसही केली. या भागातील अपघातांची मालिका थांबावी यासाठी उपायोजना करण्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी आपण लवकरच चर्चा करुन आणखी सुधारणा कशा करता येतील यावर भर देण्याचा प्रयत्न असणार आहोत. संसदेत देखील हा मुद्दा आपण मांडला असून सर्व विभागाशी समन्वय साधून हा रस्ता अपघातमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे समोर येत आहे. नवले पुल परिसरात नोव्हेंबर मध्ये मोठा अपघात झाला होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे, परंतू त्यात आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. या संदर्भात आपला सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे सुळे यांनी यावेळी सांगितले.

घटनास्थळी वाहतूक पोलीस आणि पुणे पोलीस पोलीस वेळेत पोहोचले होते, याबद्दल त्यांचे मी त्यांचे आभार मानते. प्रशासनाने देखील या घटनेची तातडीने दखल घेऊन घटनास्थळी पोहोचण्याची गरज आहे. असेही त्या यावेळी म्हणाल्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, माजी नगरसेवक सचिन दोडके, शरद दबडे, दिपक बेलदरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Navale Bridge | Supriya Sule | नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा | खा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Categories
Uncategorized

नवले पूल भागातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा

| खा. सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
पुणे | मुंबई -बंगळुरू महामार्गावर (Mumbai-Benglore Highway) नवले पूल (Navale bridge accident) परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आणि रस्ता सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय अंतर्गत जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलाविण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना याबाबत त्यांनी लेखी पत्र दिले आहे. या बैठका नियमित घेऊन रस्ता सुरेक्षेच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात. तसेच त्या त्या वेळी घेण्यात आलेल्या आढावा बैठकांतील सूचनांनुसार या रस्त्यावर योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात, असे खा. सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. रविवारी (दि. २०) रात्री नवले पूल आणि स्वामीनारायण मंदिर परिसरात दोन मोठे अपघात झाले. त्यानंतर काल (दि. २१) खा. सुप्रिया सुळे यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. इतकेच नाही तर या अपघातातील जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेत त्यांची विचारपूसही केली.  त्यानंतर आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
मुंबई-बंगळूरू महामार्गावर सातत्याने अपघात होत असून या संदर्भात उपाय योजना करण्यासंदर्भात वेळोवेळी बैठकी द्वारे तसेच पत्रव्यवहार आपण पाठपुरावा केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवले पूल हा अपघातांचा हॉटस्पॉट ठरतआहे. या ठिकाणी वेळोवेळी भेट देऊन आपण पाहणी देखील केली आहे व त्यानुसार बैठकीत सर्व्हिस रस्त्याची कामे करणे, महामार्गावरील पंक्चर बंद करणे, अतिक्रमण काढणे अशा आपत्कालीन उपाययोजनाही सुचविल्या आहेत, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेग मर्यादा ८० वरून ४० किलोमीटर प्रति तास करण्यात यावी, तसेच त्याचे फलक लावावेत, स्टड लाईट, ठिकाणी रम्बल स्ट्रीप, सोलर ब्लिकर्स, कर्ब पेंटिंग, ‘ड्रिंक अँड ड्राईव्हला आळा घालणे, गो स्लोव, अपघात प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा, अशा सूचना देणारे फलक या सारख्या अपघातांवर नियंत्रण करण्यासाठीच्या उपाय योजना तातडीने पूर्ण करण्याबाबत आपण यापूर्वीही मागणी केली होती त्यावरही शीघ्रगतीने कार्यवाही व्हायला हवी, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
या मार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महापालिकेकडे आराखडा सादर केला आहे. अशातच रविवारी झालेल्या भिषण अपघातानंतर जिल्ह्यातील रस्ता सुरक्षा आणि अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे तातडीने या उपाययोजना करण्यात याव्यात,  असे त्यांनी म्हटले आहे.