PMC Balotsav 2.0 | Urban 95 | अर्बन 95 च्या बालोत्सव २.० मधील दुसरा दिवस खास विशेष मुलांसोबत साजरा

Categories
Breaking News Education PMC social पुणे

 PMC Balotsav 2.0 | Urban 95 | अर्बन95 च्या  बालोत्सव २.० मधील दुसरा दिवस खास विशेष मुलांसोबत साजरा  

PMC Balotsav 2.0 | Urban 95 | पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) व व्हॅन लीर फाऊंडेशन (Van Leer Foundation) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बालोत्सव २.० (Balotsav 2.0) चा दुसरा दिवस  खास विशेष मुलांसोबत  साजरा करण्यात आला. या दिवशी विशेष मुले आणि अश्या मुलासाठी काम करणाऱ्या कामायणी, जीवनधारा, प्रीझम फाऊंडेशन सारख्या संस्था सहभागाने गजबजून गेला. आज महानगपरलिकेची विशेष मुलांची शाळा क्र. १४ सुद्धा उपस्थित होती. (PMC Pune News) 

दुसऱ्या दिवशी या बालोत्सवामध्ये विशेष मुलांसाठी विशेष पद्धतीने आयोजित केलेल्या संगीत, पपेट शो, कठपुतली शो, पंचेंद्रियांना समतोल साधणारे व त्याला प्रेरक असे खेळ, माइंड जिम, ब्रेन अॅक्टिविटी, मेंदूला चालना देणारे आणि मानसिक तनाव कमी करणारे खेळ, मुलांची बहुरंगी बुद्धिमततेवर आधारित अनेक खेळ आणि उपक्रमांचा मनसोक्त आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. (Pune Municipal Corporation) 

बालोत्सवामध्ये विविध वैज्ञानिकबौद्धिक व शारीरिक विकास या विषयांवर आधारित मानपाच्या विविध विभागातर्फे बाल विकाससाठी चालू असलेल्या उपक्रमाची माहिती देणारे स्टॉल लावण्यात आलेले आहेत.  यातून नागरिकांना शासन, निमशासकीय संस्था आणि स्वयंसेवी संस्थाद्वारे विविध स्तरांवर राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती मिळत आहेत. 

नागरिकांच्या आलेल्या प्रतिक्रिया मधील काही प्रतिक्रिया खालील प्रमाणे:

 

दुपारी ४ वाजेपर्यंत ,७२४  विशेष मुलांसह इतर लहान मुले आणि १५,३४८ नागरिक, सांभाळकर्ते, शिक्षकांनी बलोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी सहभाग नोंदविला

***

 अर्बन९५हा बर्नार्ड व्हॅन लीर फाऊंडेशनने २०१६मध्ये लहान मुलांच्या जीवनाला आकार देण्यासाठी तयार केलेलाएक उपक्रम आहेया उपक्रमाच्या केंद्रस्थानी प्रश्न आहे “जरतुम्ही ९५ सेंटीमीटर ऊंचीपासून शहराचा अनुभव घेऊ शकलातरतुम्ही काय बदलाल?” शहराचे नेतेनियोजकवास्तुविशारदआणि प्रशासनासोबत काम करून,जगभरातील शहरांतीलविकास धोरणांच्या केंद्रस्थानी ‘बालविकास म्हणजे सर्वांचाविकास’ हा दृष्टीकोन आणण्यात मदत करत आहे.

व्हॅन लीअर फाउंडेशन (VLF) बद्दल: व्हॅन लीअर फाउंडेशन(व्हीएलएफही एक जागतिक स्तरावर शिशुलहान मुले आणित्यांची काळजी घेणाऱ्या लोकांचे आरोग्य आणि कल्याणासाठीमोठ्या प्रमाणावर कृती,  प्रेरणा आणि माहिती देण्यासाठीकार्यरत असलेली स्वतंत्र संस्था आहेहि संस्था विविधपार्श्वभूमीतील सक्रिय नेत्यांना ओळखुन त्यांना आणि त्यांच्याटीमला बालविकास क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाईकरण्यास समर्थन देतेगेल्या ५० वर्षांमध्येया संस्थेने जगातीलबालविकास संबंधित असणाऱ्या सर्व क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करूनप्रेरणात्मक काम केले आहे.

Urban 95 | PMC Kids Festival | उद्यापासून पुणे महापालिकेचा बालोत्सव! | सारस बागेत 4 दिवस मुलांसाठी गमती जमती

Categories
Breaking News cultural PMC social पुणे

Urban 95 | PMC Kids Festival | उद्यापासून पुणे महापालिकेचा बालोत्सव! | सारस बागेत 4 दिवस मुलांसाठी गमती जमती

Urban 95 | PMC Kids Festival |  | पुणे महापालिकेच्यावतीने (Pune Municipal Corporation) येत्या १४ ते १७ डिसेंबर दरम्यान सारसबागेमध्ये शिशुगटातील अर्थात सहा वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी बालोत्सवाचे (Kids Festival) आयोजन करण्यात आले आहे. वॅन लिअर फाउंडेशन या स्वंयसेवी संस्थेच्या सहकार्याने आयोजित या बालोत्सवामध्ये विविध खेळ, कला, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून मुलांचे आरोग्य,आहार आणि कौशल्य विकासासाठी पालकांसाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शन वर्गाचे देखिल आयोजन करण्यात आले आहे. या बालोत्सवामध्ये पालकांनी आपल्या सहा वर्षांपर्यंतच्या पाल्यांसह मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांनी केले आहे. (Urban 95 | PMC Kids Festival )

महापालिकेच्यावतीने बालोत्सव आयोजित करण्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. मागील वर्षी पाच विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. यंदा सारसबागेमध्ये सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत हा उपक्रम होईल. या उपक्रमाअंतर्गत मुलांसाठी जादुचे खेळ, ओरिगामी, बाहुल्यांचा खेळ, मातीची भांडी बनविणे, वाळूतील खेळ, चित्रकला यासोबतच मुलांमध्ये कलात्मकता आणि कल्पनाशक्ती वाढविण्यासाठी खेळांतून विकासाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहेत. तसेच पालकांसाठी बालविकासाबदद्दल व प्रतिसादात्मक पालकत्वाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. (Pune Balotsav PMC)

या उपक्रमासाठी शहरातील अंगणवाड्या आणि बालवाड्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.  तसेच यंदा प्रथमच गतीमंद मुले आणि त्यांच्या पालकांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. लहान मुलांचे कान, डोळे आणि ह्दयविकाराच्या आराजांबद्दल सल्ला आणि पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन आणि प्रत्यक्षात मदत करण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित रुग्णालयांतील तज्ज्ञही याठिकाणी उपस्थित राहाणार आहेत. या उपक्रमात नागरिकांनी आपल्या सहा वर्षापर्यंतच्या पाल्यासह आवश्य उपस्थित राहावे, असे आवाहन ढाकणे यांनी केले आहे. (PMC Pune News)

——