Insurance proposal | PMC Pune | अंशदायी वैद्यकीय योजना राबवण्याबाबतचा विमा प्रस्ताव 28 नोव्हेंबर पर्यंत सादर करा  | इन्शुरन्स ब्रोकर्स ना मनपा आरोग्य विभागाकडून कार्यादेश (work order) 

Categories
Breaking News PMC आरोग्य पुणे

अंशदायी वैद्यकीय योजना राबवण्याबाबतचा विमा प्रस्ताव 28 नोव्हेंबर पर्यंत सादर करा

| इन्शुरन्स ब्रोकर्स ना मनपा आरोग्य विभागाकडून कार्यादेश (work order)

पुणे | महापालिका कर्मचारी आणि आजी माजी नगरसेवकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून (Pune Municipal corporation) अंशदायी वैद्यकीय सहायता योजना चालवली जाते. योजनेतील सदस्यांना वैद्यकीय विमा देण्यासाठी आणि यावर अमल करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून २ ब्रोकर (Insurance broker) नियुक्त करण्यात आले आहेत. स्थायी समितीने (PMC Standing Committee) नुकतीच याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांचा विरोध असतानाही विरोध झुगारून आणि ऐन वेळेला म्हणजे रात्री च्या वेळी स्थायी समिती समोर प्रस्ताव आणून या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. यावर संघटना न्यायालयात गेल्या आहेत. तरीही महापालिका आरोग्य विभागाने इन्शुरन्स ब्रोकर्स ना कार्यादेश (work order) दिले आहेत. यामुळे कर्मचारी वर्गात रोष आहे.

 

सध्याची प्रचलित अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना (CHS), मोडीत काढून ही योजना खाजगी मेडिक्लेम कंपनीच्या दावणीला बांधण्याचा प्रशासनाने चंगच बांधला आहे. सध्याची अंशदायी वैद्यकिय सहाय्य योजना तशीच अबाधित ठेवावी व खाजगी मेडिक्लेम कंपनीला योजना देण्याबाबतची प्रक्रिया रद्द करावी असे संघटनेने भेटून व वारंवार पत्रे देऊन प्रशासनाला यापूर्वीच कळवले आहे. त्याचबरोबर १२ मे २०२२ रोजी व त्यानंतर ६ ऑक्टोबर २०२२ रोजी म.न.पा. भवनासमोर मोठी निदर्शने, आंदोलने करून मेडिक्लेम प्रक्रिया थांबवावी असे पुन्हा एकदा मांडले. तरीही वैद्यकीय सहाय्य योजना राबविण्याकरीता, १) रंगनाल इन्शूरन्स ब्रोकिंग अँड रिस्क मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड व २) जे. के. इन्शुरन्स ब्रोकर लिमिटेड, या दोन कंपन्यांना दिनांक २१-१०-२०२२ च्या स्थायी समितीच्या ठरावात मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर आता महापालिका आरोग्य विभागाने (PMC Helath Dept) इन्शुरन्स ब्रोकर्स ना कार्यादेश (work order) दिले आहेत. यामुळे कर्मचारी वर्गात रोष आहे.

| असा आहे कार्यादेश

 आरोग्य खात्त्यामार्फत महाटेंडर पोर्टलवर(Mahatender Portal) ऑनलाईन निविदा प्रक्रिया (Online Tender) राबविण्यात आलेली होती. या निविदेत आपण ऑनलाईन सहभाग घेतलेला असून इतर निविदाधारकांपेक्षा सर्वाधिक गुण आपणास या निविदेत प्राप्त झालेले आहेत. सदर निविदेस संदर्भाकित ठरावान्वये मान्यता प्राप्त झालेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पुणे मनपाच्या आजी व माजी अधिकारी, कर्मचारी यांच्या व यांच्यावर अवलंबून असणा-या कुटूंबाकरीता अशंदायी वैदयकीय सहाय योजना राबविण्यात येत  आहे. इन्शुरन्स कपंनीमार्फत अशंदायी वैदयकीय सहाय योजना राबविण्याच्या अनुषंगाने सदर योजनेचा सविस्तर अभ्यास करून आपलेमार्फत लेखी स्वरूपात सविस्तर विमा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे दिनांक २८/११/२०२२ पर्यंत न चुकता सादर करावा.