PMC Sanitary Inspector (SI) Promotion | आरोग्य निरीक्षक पदोन्नती : पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Sanitary Inspector (SI) Promotion | आरोग्य निरीक्षक पदोन्नती : पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन!

| 31 जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार

 

PMC Sanitary Inspector (SI) Promotion |  पुणे मनपातील (Pune Municipal Corporation) कार्यरत कर्मचाऱ्यामधून किमान ३ वर्षाचा अनुभव व शैक्षणिक अर्हता धरण करणाऱ्या सेवकांची “आरोग्य निरीक्षक” वर्ग-३ (Sanitary Inspector class 3) या पदावर तात्पुरत्या पदोन्नतीने नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी 31 जानेवारीचा कालावधी देण्यात आला आहे. याबाबत प्रशासना कडून परिपत्रक (PMC Circular) जारी करण्यात आले आहे. (PMC Pune)

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील (PMC Solid Waste Management Department) “आरोग्य निरीक्षक” या पदाच्या जागा पुणे महानगरपालिकेमधील (PMC Pune) कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता, गुणवत्ता व किमान ३ वर्षाचा अनुभव असणाऱ्या सेवकांमधून बढतीने भरावयाच्या धोरणास शासन निर्णयानुसार व महापालिका आयुक्त यांचे ठरावानुसार मान्यता प्राप्त झाली आहे. मान्यतेनुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील कार्यरत कर्मचाऱ्यांमधून ज्या सेवकांची
३०/११/२०२० किंवा तत्पुर्वी शेड्युलमान्य पदावर नेमणूक करण्यात आली आहे व जे सेवक शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अ. माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण, ब. शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य, क. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे कार्यरत कर्मचाऱ्यांमधून किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. ही पात्रता धारण करणाऱ्या सेवकांची माहिती सर्व खातेप्रमुख / विभागप्रमुख यांचेकडून विहीत नमुन्यामध्ये मागविण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. (Pune PMC News)
तरी अशा मनपातील उपरोक्त नमूद केलेली शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या व ज्यांचे जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त आहे अशा सेवकांची माहिती खातेप्रमुख. शिफारशीसह विहित नमुन्यामधील अर्जासह आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून आस्थापना विभाग कार्यालयाकडे ३१ जानेवारी अखेर सादर करावी. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 आरोग्य निरीक्षक पदाची शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करणाऱ्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांची गुणवत्ता पडताळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून सूचना पारित करण्यात येईल. नमुद केलेप्रमाणे जे संबंधित सेवक विहित केलेल्या मुदतीमध्ये साक्षांकित कागदपत्रांसह खातेप्रमुख यांचे मार्फत अर्ज सादर करणार नाहीत व अपूर्ण अर्ज / कागदपत्रे सादर करतील, अशा कर्मचाऱ्यांचा “आरोग्य निरीक्षक”, वर्ग-३ या पदासाठी विचार केला जाणार नाही. असे ही प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.