Ravindra Binwade PMC | पुण्यात मुलींच्या जन्माच्या प्रमाणात होत असलेल्या घरसरणीबाबत अतिरिक्त आयुक्तांची असंवेदनशीलता! 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे

Ravindra Binwade PMC | पुण्यात मुलींच्या जन्माच्या प्रमाणात होत असलेल्या घरसरणीबाबत अतिरिक्त आयुक्तांची असंवेदनशीलता!

Ravindra Binwade PMC | Pune Sex Ratio | पुणे शहर (Pune City) मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात मागेच असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महापालिका आरोग्य विभागाच्या (PMC Health Department) माहितीनुसार पुणे शहरात मुलींचे जन्माचे प्रमाण 2023 साली घटून 890 वर आले आहे. 2020 साली हे प्रमाण 946 होते. मागील काही वर्षात महापालिकेने (Pune Municipal Corporation PMC) चांगले काम करत हे प्रमाण 879 वरून 946 पर्यंत आणले होते. मात्र आता पुणे शहरातील मुलींच्या जन्माच्या प्रमाणात चांगलीच घसरण होत चालली आहे. मात्र हा विभाग ज्यांच्या अधिपत्याखाली येतो ते अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Pune Municipal Corporation Additional Commissioner Ravindra Binwade) यांनी याबाबत फारच असंवेदनशीलता दाखवून दिली आहे. आपल्याला इतर कामे, बैठका असतात. याबाबत आपल्याला काही माहिती नाही, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त बिनवडे यांनी दिली आहे. पुणे शहराला असे असंवेदनशील आणि बेजबाबदार अधिकारी हवे आहेत का, असा विचार शहरातील सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिक यांना यानिमित्ताने यांनी करण्याची वेळ आली आहे. (Pune Sex Ratio)

ही देखील बातमी वाचा : Pune Sex Ratio | सावित्रीबाईंच्या पुण्यात 1 हजार मुलांमागे फक्त 890 मुली! 

2010 साली पुणे शहरातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 879 होते. 2011 मध्ये मुलींच्या जन्माचे प्रमाण 884 एवढे होते. 2012 व 2013 मध्ये अनुक्रमे 934 व 933 एवढे प्रमाण होते. 2014 मध्ये त्यात थोडीशी वाढ होऊन ते 937 पर्यंत गेले, तर 2015 मध्ये  हे प्रमाण घसरून 925 पर्यंत खाली आले होते. त्यानंतर 2019 ला 922 तर 2020 ला हे प्रमाण 946 पर्यंत आले होते. मात्र 2021 मध्ये यात खूपच घसरण झाली. 1000 मुलांच्या मागे मुलींचे प्रमाण फक्त 900 असे होते. तर 2022 साली यात थोडीशी सुधारणा होऊन हे प्रमाण 910 इतके झाले. त्यानंतर आता 2023 सालात देखील संख्या कमीच असल्याचे दिसून येत आहे.  910 वरून हे प्रमाण 890 इतके असल्याचे दिसून आले आहे. (Pune Municipal Corporation Health Department)

हे पूर्णपणे पुणे महापालिका आरोग्य विभागाचे अपयश आहे, असे मानले जात आहे. महापालिका जनजागृती करण्यात आणि लिंग तपासणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्यात कमी पडली असल्याचे दिसून येत आहे. याबाबत महापालिका काही नियोजन करणार आहे का, याबाबत अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांना विचारले असता त्यांनी खूप आश्चर्यकारक उत्तर दिले. बिनवडे म्हणाले कि मला इतर कामे, बैठका असतात. मला याबाबत काही माहिती नाही. अशा पद्धतीच्या अससंवेदनशील आणि बेजबाबदारपणा बाबत शहरातील सामाजिक संघटना, राजकीय पक्ष जाब विचारणार का, शिवाय महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) याबाबत काही कारवाई करणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Holidays List in New Year 2024 | PMC | नवीन वर्षात फक्त २० सुट्ट्या | शनिवार रविवार मध्ये ७ सुट्ट्या जाणार 

Categories
Breaking News PMC पुणे

Holidays List in New Year 2024 | PMC | नवीन वर्षात फक्त २० सुट्ट्या | शनिवार रविवार मध्ये ७ सुट्ट्या जाणार

| आगामी वर्षासाठी महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्ट्या जाहीर

पुणे | आगामी वर्ष म्हणजेच २०२४ साल (New year 2024) काही दिवसावर येऊन ठेपले आहे. महापालिका प्रशासनाकडून (Pune municipal corporation) दर वर्षी सुट्ट्या (holiday) जाहीर करण्यात येतात. त्यानुसार महापालिका कमर्चारी आणि अधिकाऱ्यासाठी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण २0 सुट्ट्या असणार आहेत. तर ७ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. (PMC Pune)

महापालिका अतिरिक्त आयुक्त (PMC Additional commissioner) कार्यालयाकडून या सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विविध उत्सव, सण (festival) यासाठी सुट्ट्या देण्यात येत असतात. प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, स्वातंत्र्य दिन, दिवाळी असे सगळे सणवार धरून वर्षभरात एकूण २० सुट्ट्या महापालिका कर्मचाऱ्याना मिळतील. तर ७ सुट्ट्या या शनिवार आणि रविवारी येत आहेत. यामध्ये डॉ आंबेडकर जयंती – रविवार, महावीर जयंती – रविवार, गणेश चतुर्थी – शनिवार, दसरा – शनिवार,  दिवाळी (बलिप्रतिपदा) -शनिवार आणि भाऊबीज – रविवार  यांचा समावेश आहे. तर ३० जून या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पुण्यात आगमन होणार आहे. त्यादिवशी देखील रविवार आहे. (Pune Municipal Corporation)

| अशा आहेत सुट्ट्या

PMC Sanitary Inspector (SI) Promotion | आरोग्य निरीक्षक पदोन्नती : पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन!

Categories
Breaking News PMC पुणे

PMC Sanitary Inspector (SI) Promotion | आरोग्य निरीक्षक पदोन्नती : पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन!

| 31 जानेवारी पर्यंत अर्ज करता येणार

 

PMC Sanitary Inspector (SI) Promotion |  पुणे मनपातील (Pune Municipal Corporation) कार्यरत कर्मचाऱ्यामधून किमान ३ वर्षाचा अनुभव व शैक्षणिक अर्हता धरण करणाऱ्या सेवकांची “आरोग्य निरीक्षक” वर्ग-३ (Sanitary Inspector class 3) या पदावर तात्पुरत्या पदोन्नतीने नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे. अर्ज करण्यासाठी 31 जानेवारीचा कालावधी देण्यात आला आहे. याबाबत प्रशासना कडून परिपत्रक (PMC Circular) जारी करण्यात आले आहे. (PMC Pune)

पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाकडील (PMC Solid Waste Management Department) “आरोग्य निरीक्षक” या पदाच्या जागा पुणे महानगरपालिकेमधील (PMC Pune) कार्यरत कर्मचाऱ्यांमधून सेवाजेष्ठता, गुणवत्ता व किमान ३ वर्षाचा अनुभव असणाऱ्या सेवकांमधून बढतीने भरावयाच्या धोरणास शासन निर्णयानुसार व महापालिका आयुक्त यांचे ठरावानुसार मान्यता प्राप्त झाली आहे. मान्यतेनुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील कार्यरत कर्मचाऱ्यांमधून ज्या सेवकांची
३०/११/२०२० किंवा तत्पुर्वी शेड्युलमान्य पदावर नेमणूक करण्यात आली आहे व जे सेवक शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या अ. माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण, ब. शास्त्र शाखेची पदवीधारकास प्राधान्य, क. पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सेवाजेष्ठता व गुणवत्ता याआधारे कार्यरत कर्मचाऱ्यांमधून किमान ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. ही पात्रता धारण करणाऱ्या सेवकांची माहिती सर्व खातेप्रमुख / विभागप्रमुख यांचेकडून विहीत नमुन्यामध्ये मागविण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज पुणे महानगरपालिकेच्या https://pmc.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. (Pune PMC News)
तरी अशा मनपातील उपरोक्त नमूद केलेली शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या व ज्यांचे जातवैधता प्रमाणपत्र प्राप्त आहे अशा सेवकांची माहिती खातेप्रमुख. शिफारशीसह विहित नमुन्यामधील अर्जासह आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून आस्थापना विभाग कार्यालयाकडे ३१ जानेवारी अखेर सादर करावी. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 आरोग्य निरीक्षक पदाची शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण करणाऱ्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांची गुणवत्ता पडताळणी परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून सूचना पारित करण्यात येईल. नमुद केलेप्रमाणे जे संबंधित सेवक विहित केलेल्या मुदतीमध्ये साक्षांकित कागदपत्रांसह खातेप्रमुख यांचे मार्फत अर्ज सादर करणार नाहीत व अपूर्ण अर्ज / कागदपत्रे सादर करतील, अशा कर्मचाऱ्यांचा “आरोग्य निरीक्षक”, वर्ग-३ या पदासाठी विचार केला जाणार नाही. असे ही प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.