PMC Pune Bharti Exam | पुणे महापालिकेच्या भरती परीक्षेसाठी 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती | अधिक्षक, उपाधिक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांचा समावेश

Categories
Breaking News PMC social पुणे

PMC Pune Bharti Exam | पुणे महापालिकेच्या भरती परीक्षेसाठी 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती

PMC Pune Bharti Exam | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात (PMC recruitment 2023) येणार आहे. महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवाराना अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. या कालावधीत महापालिकेकडे 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आता  परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 22 जून आणि 7 जुलै ला होणार आहे. त्यासाठीचे परीक्षा केंद्राची तयारी iBPS संस्थेकडून पूर्ण झाली आहे. या परीक्षा केंद्रावर महापालिका कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 44 कर्मचाऱ्यांच्या ऑर्डर अतिरिक्त आयुक्त यांनी जारी केल्या आहेत.  (PMC Pune Bharti Exam)

पुणे महानगरपालिका (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग १ ते वर्ग – ३ संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया  IBPS या संस्थेकडून पार पाडली जात आहे. यापूर्वी इच्छुक उमेदवारांचे आवेदन अर्ज हे ऑनलाईन पध्दतीने
मागविणेत आले आहेत. प्राप्त आवेदन अर्जानुसार संबंधित उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा ही IBPS या संस्थेने प्राधिकृत केलेल्या पुणे, औरंगाबाद, मुंबई, अमरावती, नागपूर या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर  २२/०६/२०२३ व ०२/०७/२०२३ रोजी तीन सत्रात संपन्न होणार आहे. पुणे महानगरपालिकेतर्फे (Pune Municipal Corporation) उक्त प्रमाणे आयोजित होणाऱ्या परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी दिलेल्या मान्यतेनुसार 44 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अधिक्षक, उपाधीक्षक आणि वरिष्ठ लिपिक यांचा समावेश आहे. याबाबत उद्या या लोकांचे प्रशिक्षण देखील ठेवण्यात आले आहे.

किती आणि कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे?

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली होती.  पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी  वाढवण्यात आला होता. 30 एप्रिल पर्यंत कालावधी देण्यात आला होता. (PMC Pune Bharti 2023)

हे आहेत सेवक

कार्यालयीन आदेश_6

News Title |PMC Pune Bharti Exam | Appointment of 44 employees for Pune Municipal Corporation recruitment exam | Including Superintendent, Superintendent and Senior Clerk

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : 10 जून नंतर परीक्षा घेतली जाणार?

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Mahanagarpalika Bharti 2023 : 10 जून नंतर  परीक्षा घेतली जाणार?

Pune Mahanagarpalika Bharti 2023 :  (Author: Ganesh Mule) : पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) एकूण 320 पदांसाठी भरती करण्यात (PMC recruitment 2023) येणार आहे. महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील वर्ग 1, वर्ग २  आणि वर्ग ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीमधील पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत.  इच्छुक उमेदवाराना अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल पर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपली आहे. या कालावधीत महापालिकेकडे 10 हजार 171 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यानुसार आता  परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा 10 जून नंतर होईल. त्यासाठीचे परीक्षा केंद्राची तयारी iBPS संस्थेकडून सुरु आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Deputy Commissioner Sachin Ithape) यांनी दिली.  (Pune Mahanagarpalika Bharati 2023)

किती आणि कोणत्या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे?

पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) आस्थापनेवरील वर्ग-१ ते वर्ग-३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आली होती.  पदे ही आरोग्य, उद्यान, अभियांत्रिकी, तांत्रिक व अग्निशमन सेवेमधील आहेत. त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात आली आहे. वर्ग-१ मधील ८ पदे, वर्ग-२ मधील २३ पदे व वर्ग-३ मधील २८९ पदे अशा एकूण ३२० पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी  वाढवण्यात आला होता. 30 एप्रिल पर्यंत कालावधी देण्यात आला होता. (PMC Pune Bharti 2023) 

 

भरती प्रक्रियेत किती अर्ज प्राप्त झाले? 

 एवढ्या कालावधीत महापालिकेकडे 10744 अर्ज आले होते. त्यातील 10171 अर्ज पात्र झाले आहेत. महापालिकेला जेवढा प्रतिसाद अपेक्षित होता तेवढा तो मिळताना दिसला नाही. या भरती प्रक्रियेत फायरमन च्या सर्वात जास्त जागा आहेत. फायरमन च्या 200 जागांसाठी एकूण 3738 अर्ज आले, त्यातील 3555 पात्र झाले आहेत. त्या खालोखाल औषध निर्माता पदासाठी 3148 अर्ज आले. त्यातील 3032 पात्र झाले आहेत. कनिष्ठ अभियंता (विद्युत) साठी 1853 अर्ज आले. त्यापैकी 1677 पात्र झाले आहेत. आरोग्य निरीक्षक साठी 771 अर्ज आले त्यातील 738 पात्र झाले. वैद्यकीय अधिकारी पदासाठी 465 अर्ज आले. त्यातील 450 पात्र झाले. (Pmc Pune recruitment 2023) 

 

कधी होणार उमेदवारांची परीक्षा?

उपायुक्त सचिन इथापे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता 10 जून नंतर उमेदवारांची परीक्षा घेण्यात येईल. परीक्षा केंद्राची माहिती IBPS या परीक्षा घेणाऱ्या संस्थेकडून घेण्यात येईल. त्यानुसार 11 पेपर असतील. यामध्ये फायरमन साठी physical exam देखील होणार आहे. परीक्षेचे केंद्र, वेळापत्रक आणि त्या अनुषंगाने याबाबतची माहिती लवकरच उमेदवारांना कळवण्यात येईल. (Pune municipal corporation Recruitment)

– पदे आणि अर्जाची संख्या 

१) क्ष-किरण तज्ञ (रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट) – 12
२) वैदयकीय अधिकारी/ निवासी वैदयकीय अधिकारी – 450
३) उप संचालक (प्राणी संग्रहालय) – 9
४) पशु वैदयकीय अधिकारी – 47
५) वरिष्ठ आरोग्य निरीक्षक / सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक – 209
६) कनिष्ठ अभियंता (विद्युत) – 1677 
७) आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर – 738 
८) वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर – 216 
९) औषध निर्माता – 3032
१०) पशुधन पर्यवेक्षक (लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) – 226 
११) अग्निशामक विमोचक / फायरमन – 3555

—-

News title | Pune Mahanagarpalika Bharti 2023 : Exam to be held after June 10?