Pune News |Pune University |पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार!

Categories
Breaking News cultural Political social पुणे महाराष्ट्र

Pune News |Pune University |पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारणार!

|पालकमंत्री मंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा

| सवाई गंधर्वच्या धर्तीवर नृत्यरोहिणी महोत्सवाचे आयोजन

Pune News | Pune University | भारतीय संस्कृतीत (Indian Culture) नृत्यकलेला (Dance Art) अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नृत्यकलेचे संवर्धन आणि प्रचार प्रसारासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे नृत्य संकुल (Dance Academy) पुणे विद्यापीठात (Pune University) उभारणार असून, त्यासाठी राज्याचा उच्च शिक्षण विभाग, पुणे विद्यापीठ आणि जिल्हा नियोजन मधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakant Patil) यांनी आज केली. तसेच सवाई गंधर्वच्या (Sawai Gandharva) धर्तीवर नृत्य रोहिणी महोत्सव (Nritya Rohini Mahotsav) हा कार्यक्रम नृत्यकलाकारांसाठी स्वतंत्र कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जाईल, असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Pune News Pune University)

नृत्य गुरु मनिषा साठे (Dancer Guide Manisha Sathe) यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात (Yashwantrao Chavan Theatre) मनेषा नृत्यालय कार्यक्रम तथा अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात नामदार पाटील बोलत होते. यावेळी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर (Vidyavachaspati Shankar Abhyankar), नृत्य गुरु शमा भाटे (Dancer Shama Bhate), सुचेता चापेकर (Sucheta Chapekar), प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर (Singer Arti Anklikar Tikekar) यांच्या सह कला क्षेत्रातील विविध मान्यवर यांच्यासह शास्त्रीय नृत्यप्रेमी उपस्थित होते. (Dance Academy in pune university)

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, पुणे ही आपली सांस्कृतिक राजधानी आहे. अनेक सुप्रसिद्ध कलाकार या शहरात वास्तव्यास आहेत. नृत्य क्षेत्रातील अनेक दिग्गज देखील आपल्या कलेची जोपासना करतात. त्यामुळे नृत्यकला संवर्धनासाठी पुण्यात समर्पित व्यासपीठ असावे; अशी मागणी होत होती. त्याला अनुसरूनच पुणे विद्यापीठात नृत्य संकुल उभारण्यात येणार आहे. (Dance Art in indian culture)

ते पुढे म्हणाले की, “या नृत्य संकुलासाठी पुणे विद्यापीठाने पाच एकर जागा प्रस्तावित केली आहे. तसेच यासाठी २२५ कोटी खर्च अपेक्षित असून, पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तर उर्वरित २०० कोटी राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून टप्प्या टप्प्याने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे संकुल साकार झाल्यानंतर, देश-विदेशातील शास्त्रीय नृत्यकलेवर प्रेम करणाऱ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.” (Pune university news)

नामदार पाटील पुढे म्हणाले की, “पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवाचे एक वेगळेच महत्त्व आहे. देश विदेशातील अनेक शास्त्रीय गायक इथे आपली कला सादर करण्यासाठी आतूर असतात. त्याचप्रमाणे नृत्य कलाकारांना ही आपली कला सादर करण्यासाठी एक नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून, नृत्य रोहिणी महोत्सव यंदा डिसेंबर २०२३ पासून आयोजित करण्यात येणार आहे. त्यालाही नृत्यप्रेमींकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल,” अशी अपेक्षा व्यक्त केली. (Pune Marathi news)


News Title |Pune News | Pune University | Pune University will set up a dance complex!Announcement by Minister Chandrakantada Patil

Degree examination results | पदवी परीक्षांचा निकालांच्या छापील गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात दिरंगाई | मनविसे चा आंदोलनाचा इशारा

Categories
Breaking News Education पुणे महाराष्ट्र

पदवी परीक्षांचा निकालांच्या छापील गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात दिरंगाई

| मनविसे चा आंदोलनाचा इशारा

प्रथम ते तृतीय वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाचे निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले. ऑनलाईन निकाल जाहीर केल्यानंतर तातडीने छापील गुणपत्रिका सुद्धा वितरित करण्यात येतात; परंतु पुणे विद्यापीठाकडून आजपर्यंत ह्या छापील स्वरूपातील गुणपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या नाहीत. याबाबत पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने ४८ तासांत खुलासा करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या मागणीसाठी तीव्र आंदोलन करेन. असा इशारा देण्यात आला आहे.

मनविसेच्या पत्रानुसार भविष्यातील प्रवेश, शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षण प्रवेश, शैक्षणिक कर्ज अश्या अनेक कारणांसाठी गुणपत्रिकेच्या प्रती अत्यावश्यक असतात. असे असूनही आपल्या विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे . याहीपेक्षा गंभीर म्हणजे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे या गुणपत्रिका अजुन छापलेल्या च नसलेबाबत माहिती मिळाली आहे. सदर बाब अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी आपण त्वरित लक्ष घालून छापील गुणपत्रिका वितरणाबाबत , सद्यस्थिती आणि निश्चित तारीखे बाबत ४८ तासांत खुलासा करावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या मागणीसाठी तीव्र आंदोलन करेन. असे ही पत्रात म्हटले आहे.

DCM Ajit Pawar | सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार

Categories
Breaking News Education Political Sport पुणे महाराष्ट्र

सावित्रीबाई फुले स्मारक आणि जलतरण तलावासाठी विद्यापीठाला १० कोटी रुपयांचा निधी-उपमुख्यमंत्री अजित पवार

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात इनडोअर हॉल आणि सिंथेटीक ट्रॅकचे उद्घाटन

पुणे -सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आणि जलतरण तलावासाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील पै. खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हेलिअन इमारत, इनडोबर हॉल आणि अद्ययावत सिंथेटीक ट्रॅकच्या उद्घानप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.कारभारी काळे, प्र-कुलगुरु डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षणाचे संचालक डॉ. दीपक माने, क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष राजेश पांडे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, बालेवाडी परिसरात उत्तम क्रीडा सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठातदेखील अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. राज्यातल्या कुठल्याही भागात समाजाच्या हितासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी शासन भक्कमपणे पाठीशी उभे राहील. डेक्कन कॉलेज आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्माकरकासाठीदेखील सहकार्य करण्यात येईल.

खेळाडूंना पायाभूत सुविधा आणि प्रोत्साहन देण्याची गरज

पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे विद्यापीठ घडविण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करावा. आपल्या युवा पिढीत मोठी क्षमता आहे. खेळाडुंच्या क्षमतेला वाव देताना पायाभूत सुविधा निर्माण करून देत प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विद्यापीठाला कुठलीही समस्या असल्यास ती सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल. खेळाडुंवर भार न टाकता क्रीडा संकुलाची देखभाल करण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. विद्यापीठाच्या बाबतीत आपलेपणाच्या भावनेने सर्वांनी जबाबदारीचे भान ठेवून काम करावे, प्रत्येक विद्यार्थी आपला असल्याची भावना अधिकारी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी दाखवावी, असे आवाहन पवार यांनी केले.

ते पुढे म्हणाले , पै.खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत यश संपादन करून यशाची प्रेरणा सर्वांना दिली. देशाला कुस्तीतले पहिले कांस्य पदक मिळवून दिले. स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचार आणि कार्याने जगाला प्रभावीत केले. त्यांचे विद्यापीठात उभारण्यात आलेले पुतळे मानवतेसाठी कार्य करण्याची आणि यशाची प्रेरणा विद्यार्थ्यांना देतील असे त्यांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग काही शहरात वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले.

पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा देताना ते म्हणाले, जागतिक तापमान वाढीमुळे जगावर परिणाम होत असताना पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे, ही काळाची गरज आहे. एक दिवस पर्यावरणाचा विचार न करता ३६५ दिवस आपल्यापरिने पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यायला हवे.

सामंत म्हणाले, पुण्याच्या शैक्षणिक पंढरीत अपूर्ण शिक्षण प्रकल्प पूर्ण करून पुण्याला देशपातळीवर लौकीक वाढविण्याचा प्रयत्न आहे. राज्याच्या विद्यार्थ्याला सक्षम करणारे शिक्षण विद्यापीठात मिळायला हवे यासाठी विद्यापीठ आणि शासनाला मिळून काम करावे लागेल. काश्मिरी पंडीतांच्या मुलांना शिक्षणासाठी राखीव जागा ठेवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानासाठी १३ कोटी ३३ लाख रुपये मंजूर करण्याात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. क्रीडा संकुलाच्या जलतरण तलाव आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक उभारण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

कुलगुरू डॉ.काळे म्हणाले, सावित्रीबाई फुले विद्यापीठाने शैक्षणिक क्षेत्रात मोलाची कामगिरी करीत अनेक बहुमान प्राप्त केले. विद्यापीठाने अनेक आंतरराष्ट्रीय सामंज्यस्य करार करून आपला विस्तार केला आहे. देशपातळीवर विद्यापीठ १८ व्या स्थानी आहे. २७ एकर मध्ये उभारलेल्या क्रीडा संकुलामुळे क्रीडा क्षेत्रात विद्यापीठाचा नावलौकीक देशपातळीवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. क्रीडा संकुलाचा परिपूर्ण वापर करण्यासाठी विद्यापीठ लवकरच धोरण ठरविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमापूर्वी श्री.पवार आणि श्री.सामंत यांनी स्वामी विवेकानंद आणि खाशाबा जाधव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. त्यांनी यावेळी सिंथेटिक पथ, व्यायामशाळा आणि शुटींग रेंजची पाहणी करुन माहिती घेतली. शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमीच्या युवक-युवतींनी मर्दानी खेळ दांडपट्टा, लाठीकाठी आणि तलवारबाजीचे प्रात्यक्षिक सादर केले. खेलो इंडिया स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मल्लखांबच्या खेळाडूंनी मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर केले. मंत्रीद्वयांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

अशा आहेत विद्यापीठातील नव्या क्रीडा सुविधा

क्रीडा संकुलामध्ये बहुउद्देशीय क्रीडा प्रकारांसाठी इनडोअर सभागृह तयार करण्यात आला आहे. यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, ज्युदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस, कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स असे विविध क्रीडा प्रकार खेळता येणार आहेत.

क्रीडा संकुलामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचा ४०० मीटर सिंथेटिक ट्रॅक व पॅव्हेलियन इमारत तयार करण्यात आली आहे. त्याच्या मध्यभागी फुटबॉल क्रीडांगण तयार करण्यात आले असून यासाठी राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षण अभियान (रुसा) अंतर्गत रुपये ४ कोटीचे अनुदान प्राप्त झाले व उर्वरित खर्च विद्यापीठाने केला आहे. या अद्ययावत सिंथेटिक पथचा खेळाडूंना लाभ होणार आहे.

Uday Samant : Savitribai fule pune university : बारामतीला मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु होणार : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा 

Categories
Breaking News Education Political पुणे

  बारामतीला मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु होणार

:  तर पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी

: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे: पुणे ही शिक्षणाची पंढरी असून ही ओळख आणखी ठळकपणे जगासमोर आणण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच पुणे येथे प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनी आणि बारामती येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाचे मुंबई येथील महावाणिज्यदूत पिटर ट्रसवेल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

सामंत म्हणाले, प्राध्यापक प्रशिक्षण प्रबोधिनीच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीला चालना मिळणार आहे. यशदाच्या माध्यमातून प्राध्यापकांना आवश्यक प्रशिक्षण देण्याबाबत विचार करण्यात येत आहे. पुणे येथे मुक्त विद्यापीठाचे विभागीय कार्यालय असून लवकरच बारामती येथे उपकेंद्र सुरू करण्यात येईल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि त्यांना त्यासाठी आवश्यक संधी मिळावी असे शासनाचे प्रयत्न आहेत.

गरीब कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजना अधिक व्यापक आणि नव्या स्वरूपात राबविण्याचा विचार करण्यात येत आहे. अधिकाधिक मुलांना या योजनेचा लाभ होण्यासाठी प्रत्येक विद्यापीठातून या योजनेचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यापीठातून नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्याची गरज असल्याचे मतही सामंत यांनी व्यक्त केले.

पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून ते म्हणाले विद्यापीठाला जगात अग्रेसर ठेवण्याचे कार्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केले आहे. मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने विद्यापीठाची स्थापना झाली. आज विद्यापीठाने देशाच्या सीमा ओलांडल्या असून कतारसारख्या देशातही विद्यापीठाने अभ्यासक्रम सुरू करणे ही गौरवास्पद बाब आहे. पुण्याचा ऐतिहासिक वारसा चित्ररूपाने पुणेकरांसमोर यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पद्धतीवर चर्चा होणे गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी अहवाल सादर करताना विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पदवी प्रदान समारंभात सन ऑक्टोबर/नोव्हेंबर २०२० या वर्षात व त्यापूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ३ हजार ८०६ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. त्यापैकी ४३ स्नातकांना पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे आदींसह व्यवस्थापन परिषद सदस्य, शैक्षणिक परीषद सदस्य, अधिसभा सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक आणि पदवी प्राप्त विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीक्षांत मिरवणुकीने झाली. मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वार्ताच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

Nagraj Manjule : दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणतात, म्हणून जात मला भूतबाधेप्रमाणे वाटते

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

जात ही भूतबाधेसारखी..! – नागराज मंजुळे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून शरणकुमार लिंबाळे यांचा सत्कार

पुणे – काही जण आपल्या जातीचा न्यूनगंड बाळगतात तर काहीजण माज बाळगतात, त्यामुळेच ही जात मला भूतबाधेप्रमाणे वाटते असे मत चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
मराठी आणि हिंदी दलित साहित्यावरील आंबेडकरी विचारधारेचा प्रभाव आणि सरस्वती सन्मान व राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दलित साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा सत्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात करण्यात आला.  विद्यापीठाचा हिंदी विभाग व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाने या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. त्यावेळी मंजुळे बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. दत्ता मुरूमकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव, हिंदी विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार रोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मंजुळे म्हणाले, पिस्तुल्या या शॉर्टफिल्ममध्ये जरा वेगळा विचार मांडताना सुरुवातीला भीती वाटली, मात्र महात्मा फुलेंच्या कवितेतील विचाराने मला बळ दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो या सगळ्यांचा प्रभाव केवळ, विद्यापीठ किंवा साहित्यपुरता मर्यादित न राहता आपल्या जगण्यावर पडायला हवा.
यावेळी डॉ. दत्ता मुरूमकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोहर जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन गीता शिंदे यांनी केले.
दलित साहित्य समजून घेण्यासाठी शिक्षकांनी जात बाजुला ठेवत शिकवायला हवे तर विद्यार्थ्यांनीही जात विसरून समजून घ्यायला हवे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून मी आज इथे पोहचू शकलो आहे. विद्यापीठाने माझा सत्कार केल्याबद्दल मी आभारी आहे.

डॉ. शरदकुमार लिंबाळे, लेखक

——
विविध प्रकारच्या साहित्यातून ज्या व्यथा समाजासमोर आल्यात त्या व्यथा पुढच्या पिढीला जाणवू नयेत ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. ही भावना रुजवत समाजातील या भिंती तोडत समाजाशी नाळ जोडण्याचा प्रयत्न आम्ही विद्यापीठाच्या माध्यमातून करत आहोत.

– डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ