AAP | रयतच्या पदाधिकाऱ्यांनी आम आदमी पार्टी मध्ये केला जाहिर प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

रयतच्या पदाधिकाऱ्यांनी आम आदमी पार्टी मध्ये केला जाहिर प्रवेश

पिंपरी : आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक विजय कुंभार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील रयत स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. रयत स्वाभिमानी संघटनेचे सरचिटणीस रविराज काळे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पुणे जिल्ह्यात आम आदमी पार्टीला तरूणांची मोठी साथ लाभली आहे. आजचा होणारा पक्षप्रवेश पिंपरी चिंचवड शहरात मोठा झंझावात उभा करेल. असा विश्वास विजय कुंभार यांनी व्यक्त केला. (AAP)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भागात विकास कामे जोराने सुरू आहेत. सर्व तरुणांनी एकत्र येऊन स्थानिक पातळीवर बूथ कमिट्या सक्षम करण्याचे काम करावे. यातूनच आता येऊ घातलेल्या महापालिका व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये निर्णायक जागांपर्यंत पोहचू ,असा विश्वास विजय कुंभार यांनी व्यक्त केला.

यावेळी रयत स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे, रविराज काळे, ऋषिकेश कानवटे,निरज सुतार, ओमकार भोईर, योगेश गायकवाड, अभिजित कदम,अजय थेरूडकर यांच्यासह अनेकांनी पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेश झाल्यानंतर सुर्यकांत सरवदे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये भाजपाने केलेला भ्रष्टाचार शहरातील नागरिकांसमोर उघडा करणार असल्याचे सांगितले.

Ryat Swabhimani Association | समाविष्ट झालेल्या 23 गावांना मुलभूत गरजा पूर्ण अन्यथा वेगळी नगरपालिका करा | रयत स्वाभिमानी संघटना

Categories
Breaking News PMC पुणे

समाविष्ट झालेल्या 23 गावांना मुलभूत गरजा पूर्ण अन्यथा वेगळी नगरपालिका करा | रयत स्वाभिमानी संघटना

 

नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांना आता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होऊन जवळपास दीड वर्ष पुर्ण होत आले. सर्वच स्तरातून पुणे महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. महानगरपालिका प्रशासन या संपूर्ण 23 गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचे सर्व नागरिकांचे म्हणणे आहे. समाविष्ट केलेली 23 गाव व हिंजवडी एकत्र करून वेगळी नगरपालिका स्थापन करावी व त्यामधून आमचा विकास करावा हा एकमेव पर्याय उरला आहे. अशी मागणी रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे यांनी केली आहे.

कानवटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार या समाविष्ट सर्व 23 गावांमध्ये ना आत्तापर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, ना गाडी नेण्यासारखा रस्ता झाला आहे आणि रात्री बाहेर पडणे म्हणजे जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. महानगरपालिकेकडून कोणती लाईटची व्यवस्था केली नाही . प्रश्न पडतो की महानगरपालिका कोणाचा विकास करण्यात व्यस्त आहे नागरिकांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करीत पुणे महानगरपालिका कोणाचा विकास करू पाहते.

मुख्यमंत्री कार्यालयासोबत मागील सहा महिन्यापासून वारंवार पत्र व्यवहार करूनदेखील याबाबत अजूनही कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. मग आम्हाला कळत नाहीये की मुख्यमंत्री साहेब तुम्ही खरंच अनाथांचे नाथ आहात का? तुम्हाला नागरिकांची काळजी आहे का? का प्रशासन तुमचा ऐकत नाही?
आता एक तर आम्हाला मुलभूत सोई सुविधा द्या अन्यथा आम्हाला पुणे महानगरपालिकेमधून बाहेर काढा कारण आम्हाला असं वाटत नाही की पुणे महानगरपालिकेमध्ये राहून आमचा विकास होईल म्हणून नव्याने समाविष्ट केलेली 23 गाव व हिंजवडी एकत्र करून वेगळी नगरपालिका स्थापन करावी व त्यामधून आमचा विकास करावा हा एकमेव पर्याय उरला आहे.
या सर्व बाबतीत आपण सकारात्मक विचार करून कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलनाच्या मार्गाने पुढे जावे लागेल, अशी माहिती रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे यांनी दिली.