AAP | गुणवत्ता आणि संधी नाकारणारा कंत्राटी भरती आदेश मागे घ्या : आप

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

AAP | गुणवत्ता आणि संधी नाकारणारा कंत्राटी भरती आदेश मागे घ्या : आप

महाराष्ट्र सरकारच्या कंत्राटी पद्धतीने भरती च्या आदेशाविरोधात आपचे आंदोलन

AAP | बाह्ययंत्रणे कडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थांचे पॅनल नियुक्त करण्याचा शासन निर्णय 6 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेला आहे.. त्यानुसार विविध पदांवरती शासकीय विभाग, निमशासकीय विभाग ,स्थानिक स्वराज्य संस्था ,महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादींना कंत्राटांवर भरती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारचा हा बाह्य एजन्सीमार्फत कंत्राटी नोकरभरतीचा आदेश मागे घ्यावा या मागणीसाठी आम आदमी पार्टी तर्फे शास्त्री रोड, नवी पेठ भागात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यास भरती परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत मोठा प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रात विविध शासकीय विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत २.४४ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. या भरती साठी गेली काही वर्षे एमपीएससी व इतर भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आहेत. सरळ सेवा भरतीची हे लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. असे असताना या नवीन कंत्राटी धोरणामुळे भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार आहेत. अंदाजे ७५००० सरकारी जागा या एजन्सी/ कंत्रादारांकडून भरल्या जातील असा अंदाज आहे.

या आदेशानुसार भरती केलेल्या पदासाठी निर्धारित पगाराच्या केवळ ६० टक्के रक्कम ही प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला हातात दिली जाणार आहे आणि दरमहा १५ टक्के रक्कम ही नियुक्त करणाऱ्या कंत्राटदाराला मिळणार आहे. हे कंत्राटदार आणि मंत्र्यांसाठी भ्रष्टाचाराचे आणि वशिल्याच्या भरती चे कुरण ठरणार आहे. स्पर्धा नसल्याने गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे तर वंचित घटकातील मुलांना संधीच मिळणार नाही. तसेच या पद्धतीमुळे संबंधित व्यक्तीचे जनतेप्रती उत्तरदायित्व व जबाबदारी राहणार नाही, जनतेस सेवाहमी मिळणार नाही. असे आक्षेप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केले व दिल्ली पंजाब आदी ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू केली जात आहे. तसेच कंत्राटावर असणाऱ्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करण्याचे धोरण आम आदमी पार्टीची सरकारे राबवत आहेत असे असताना महाराष्ट्रात मात्र याच्याबरोबर उलटे धोरण भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांचे शिंदे फडणवीस पवार सरकार राबवत आहे असे सांगितले.

आजच्या आंदोलनात मुकुंद किर्दत यांच्या सह अनिल कोंढाळकर, सतिश यादव, निलेश वांजळे, अक्षय शिंदे, ॲड अमोल काळे, किरण कद्रे, अमोल मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रशांत कांबळे, धनंजय बेनकर, शाशिभूषण होले, अभिजीत गायकवाड,साजिद कुरेशी, इरफान रोड्डे, मनोज थोरात, सय्यद अली, संजय रणधीर, शंकर थोरात,तानाजी शेरखाने, किरण कांबळे, अविनाश भाकरे, असगर बेग, जिबरील शेख, असिफ मोमीन, उमेश बागडे, शेखर ढगे, माधुरी गायकवाड, फाबियन समसन, अजय पैठणकर, प्रभाकर कोंढाळकर, शिवाजी डोलारे, उत्तम वडावराव , सुनील भोसले, किर्तीसिंग चौधरी, बाबा शिरसाट, बापू रणसिंग, सखाराम भोकर,निखिल खंदारे इत्यादीनी सहभाग घेतला.

 

AAP | रयतच्या पदाधिकाऱ्यांनी आम आदमी पार्टी मध्ये केला जाहिर प्रवेश

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

रयतच्या पदाधिकाऱ्यांनी आम आदमी पार्टी मध्ये केला जाहिर प्रवेश

पिंपरी : आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख संघटक विजय कुंभार यांच्या उपस्थितीत पिंपरी चिंचवड शहरातील रयत स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केला. रयत स्वाभिमानी संघटनेचे सरचिटणीस रविराज काळे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पुणे जिल्ह्यात आम आदमी पार्टीला तरूणांची मोठी साथ लाभली आहे. आजचा होणारा पक्षप्रवेश पिंपरी चिंचवड शहरात मोठा झंझावात उभा करेल. असा विश्वास विजय कुंभार यांनी व्यक्त केला. (AAP)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भागात विकास कामे जोराने सुरू आहेत. सर्व तरुणांनी एकत्र येऊन स्थानिक पातळीवर बूथ कमिट्या सक्षम करण्याचे काम करावे. यातूनच आता येऊ घातलेल्या महापालिका व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये निर्णायक जागांपर्यंत पोहचू ,असा विश्वास विजय कुंभार यांनी व्यक्त केला.

यावेळी रयत स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत सरवदे, रविराज काळे, ऋषिकेश कानवटे,निरज सुतार, ओमकार भोईर, योगेश गायकवाड, अभिजित कदम,अजय थेरूडकर यांच्यासह अनेकांनी पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेश झाल्यानंतर सुर्यकांत सरवदे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये भाजपाने केलेला भ्रष्टाचार शहरातील नागरिकांसमोर उघडा करणार असल्याचे सांगितले.

AAP | Kasba By election | आम आदमी पार्टीचे किरण कद्रे कसबा विधानसभा मतदार संघातून लढणार

Categories
Breaking News Political पुणे

आम आदमी पार्टीचे किरण कद्रे कसबा विधानसभा मतदार संघातून लढणार

आम आदमी पार्टीचे किरण कद्रे यांनी कसबा पेठ विधानसभा मधून उमेदवारी अर्ज भरला.
उमेदवारीचा अर्ज भरता वेळेस राज्य संघटक विजय कुंभार, मुकुंद किर्दत, अभिजित मोरे,  एकनाथ ढोले, सौ. विजया किरण कद्रे  आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर किरण कद्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “आम आदमी चे अरविंद केजरीवाल यांनी जे काम जनसामान्यांसाठी काम केले आहे तसेच काम कसबा मतदार संघात केले जाईल” असे त्यांनी सांगितले.

विजय कुंभार म्हणाले, “देशाचे मालक ही जनताच आहे, हेच आमच्या आमदारांच्या कामातून दिसेल. आम्ही पूर्ण ताकतिने प्रचार करणार आहोत, विजय आमचाच निश्चित आहे.”

उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी पुणे पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले.

 

Aam Aadmi Party | दिल्लीतील आप चे नगरसेवक आणि आमदार आज पुणे मनपा दौऱ्यावर | विविध प्रकल्पांची करणार पाहणी

Categories
Breaking News PMC Political देश/विदेश पुणे

दिल्लीतील आप चे नगरसेवक आणि आमदार आज पुणे मनपा दौऱ्यावर

| विविध प्रकल्पांची करणार पाहणी

दिल्ली विधानसभा आणि महापालिकेवर (Delhi Legislative Assembly and Municipal Corporation) एकहाती सत्ता असणाऱ्या आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार, नगरसेवक पुण्यातील कचरा व्यवस्थापन, बायोगॅस प्रकल्प आणि उत्पन्न वाढीसाठी मिळकतकर याचा अभ्यास करणार आहेत. यासाठी १४ जणांचे शिष्टमंडळ बुधवारी (ता.२१) आणि गुरुवारी (ता. २२) शहरातील विविध ठिकाणी भेटी देणार आहे. (Pune Municipal corporation)

पुणे शहरातील कचरा फुरसुंगी व उरुळी देवाची येथील कचरा डेपोवर उघड्यावर टाकणे बंद केले, त्यानंतर कचरा जिरविण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या. त्यामध्ये कचरा डेपो येतील लाखो टन कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने कॅपींग करणे, तो परिसर दुर्गंधीमुक्त करणे, वृक्षारोपण करणे अशी कामे केली.(PMC Pune)

ओला कचरा जिरविण्यासाठी बायोगॅस प्रकल्प सुरू केले. सध्या शहरातील१३ प्रकल्प सुरू आहेत. त्याच प्रमाणे स्वच्छ संस्थेमार्फत घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे मॉडल अशा विविध उपाययोजना केल्या आहेत. दिल्ली विधानसभेत आपची सत्ता आहे. पण महापालिकेत भाजपची सत्ता होती. काही दिवसांपूर्वी महापालिका निवडणूका झाल्या, त्यामध्ये आपने महापालिकेवरही सत्ता मिळवली आहे. दिल्ली महापालिकेत दिल्लीतील सर्व ७ खासदार, १४ आमदार आणि सर्व नगरसेवक यांच्या विविध समित्या स्थापन केल्या जातात. त्यापैकी एक समिती पुणे शहराच्या दौऱ्यावर येत आहे. त्यामध्ये आमदार, नगरसेवक आणि अधिकारी असे १४ जणांचे शिष्टमंडळ आहे. महापालिकेत त्यांची आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसात विविध प्रकल्पांची पाहणी करणार आहेत.(Aam aadmi party)