State Women’s Commission | राज्य महिला आयोगाने मागविला चंद्रकांत पाटील यांच्याकडून खुलासा

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र

राज्य महिला आयोगाने मागविला चंद्रकांत पाटील यांच्याकडून खुलासा

ओबीसी आरक्षण आंदोलनासमयी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी खासदार  सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत.

महिला आज स्वकर्तुत्वावर शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्थ महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब आहे.
यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील यांनी राखावे. तसेच केलेल्या वक्तव्याबाबत लेखी खुलासा राज्य महिला आयोगास सादर करण्याबाबतचे निर्देश चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलेले आहेत.

Rupali Chakankar : अंतर्गत तक्रार निवारण समिती कार्यरत नसल्यास कारवाईला सामोरे जा : रुपाली चाकणकर यांचा इशारा

Categories
PMC Political social पुणे महाराष्ट्र

अंतर्गत तक्रार निवारण समिती कार्यरत नसल्यास कारवाईला सामोरे जा

: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा इशारा

पुणे: शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय, खाजगी कंपन्या तसेच ज्या ठिकाणी दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत, अशा ठिकाणी काम करत असलेल्या महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या समित्या स्थापन करण्यात आले नसल्याचे आढळून येईल त्या संबंधित ठिकाणी ५० हजार रुपयांचा दंड आणि कंपनीचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी पुणे महानगरपालिका येथे भेट दिली. या भेटी दरम्यान त्या पुणे कार्यरत असणाऱ्या ‘अंतर्गत तक्रार निवारण समिती’ च्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महिलांसाठी असणाऱ्या सार्वजानिक स्वच्छतागृहांविषयी महिलांसाठी राखीव असलेल्या तेजस्विनी बसेस याविषयी माहिती घेतली आणि महानगरपालिकेच्या सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधून काम करताना येणाऱ्या त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, या अडचणी सोडविण्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य महिला आयोग सर्वतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन त्यांनी दिले.

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण मिळणे आवश्यक आहे. काम करत असलेल्या महिलांवर वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकणे, अरेरावी करणे, दुय्यम वागणूक देणे आदी तक्रारी आयोगास प्राप्त होत आहे. कामाच्या ठिकाणी महिलांना त्रास दिल्याचे प्रकार घडत असतील तर, याबाबत महिलांनी तक्रार देण्यासाठी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन रुपाली चाकणकर यांनी केले.

Rupali Chakankar : औरंगाबाद सामूहिक बलात्कार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवणार : रूपाली चाकणकरांची माहिती

Categories
Breaking News महाराष्ट्र

औरंगाबाद सामूहिक बलात्कार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवणार

रूपाली चाकणकरांची माहिती

मुंबई :औरंगाबाद सामूहिक बलात्कार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवणार, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी दिली आहे.

चाकणकर यांनी सांगितले कि आज बिडकीन पोलीस स्टेशनमधून आपल्याशी संवाद साधत आहे.हा निर्णय फास्ट ट्रॅक न्यायालयात चालावा तसेच आरोपींनी ज्या निर्दयपणे सामुहिक बलात्कार केलेला आहे,यामध्ये कोठेही आरोपींच्या शिक्षेसाठी दिरंगाई होणार नाही यासाठी राज्य महिला आयोग लक्ष घालेल. पिडितीच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात आलेले आहे.तसेच ग्रामीण रुग्णालयात पिडीतेला आज पुन्हा उपचारासाठी दाखल करून ,मानसिक आधार देऊन समुपदेशन करण्यात येणार आहे.