Rajya sabha seats | राज्यसभेच्या 57 जगासाठी निवडणूक : महाराष्ट्रातून 6 उमेदवार निवडले जाणार

Categories
Breaking News Political देश/विदेश महाराष्ट्र

राज्यसभेच्या 57 जगासाठी निवडणूक

: महाराष्ट्रातून  6 उमेदवार निवडले जाणार

नवी दिल्ली – राज्यसभेच्या १५ राज्यांतील ५७ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरवात झाली.  राज्यसभेतील २४५ जागांपैकी यंदाच्या वर्षभरात ९५ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यापैकी आता येत्या १० जूनला सर्वाधिक ५७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा थेट परिणाम आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर होणार आहे.

महाराष्ट्रातील ६ पैकी २ जागा भाजप हमखास जिंकणार आहे. मात्र तिसऱ्या जागेसाठीही पक्षाने सक्रिय प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यातील ताणाताणीत भाजप ही जागा पदरात पाडून घेण्यासाठी ‘धक्कातंत्र” वापरू शकते, अशी दिल्लीत चर्चा आहे. सहाव्या जागेसाठी संभाजीराजे अपक्ष म्हणून उभे राहिलेच तर वेळप्रसंगी त्यांना पाठिंबा द्यावा काय, याबाबतही पक्षात खल सुरू असून विरोधी नेते देवेंद्र फडणवीस याबाबतचा ‘अंतिम” निर्णय घेतील, असे पक्षसूत्रांनी स्पष्ट केले. राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याची ३१ मे ही अंतिम मुदत आहे. १० जून रोजी राज्यसभेसाठी मतदान होईल व त्याच दिवशी मतमोजणीही होईल. राज्यसभेच्या २४५ पैकी भाजपकडे सध्या ९५ खासदार आहेत तरी पक्षाचे येथे स्पष्ट बहुमत अजूनही नाही. वरिष्ठ सभागृहात उत्तर प्रदेशचे सर्वाधिक ३४ खासदार असून त्यातील ११ जणांचा कार्यकाळ संपत आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र-तमिळनाडूतील प्रत्येकी ६ सदस्य निवृत्त होत आहेत. तमिळनाडूतून भाजपला काही आशा नाही. एकूण चित्र पाहता या निवडणुकीनंतर भाजपची राज्यसभेतील सदस्य संख्या कमी होण्याची चिन्हे आहेत.

विरोधी मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेठी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळे भाजपने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठीच्या ‘इलेक्ट्रोरल कॉलेज” चे वर्तमान स्वरूप पाहिले तर भाजप आघाडीकडे ४८.९ टक्के हक्काची मते आहेत. कॉंग्रेस व विरोधी पक्षांकडे साधारणतः ५१.१ टक्के मते आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर राव यांनी विरोधकांच्या एकीसाठी कंबर कसली असून विविध विरोधीपक्षीय मुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशीही ते लवकरच चर्चा करणार आहेत. भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नितीशकुमार यांच्याशी चर्चा करण्यास पाटण्यात पाठविले होते. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यामार्फत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या संपर्कात भाजप नेतृत्व आहे. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्यासाठी भाजप नेत्याला सांगण्यात आले आहे.

Sambhaji Raje Chatrapati : Amol Balwadkar : माझ्या मनातील महान काम अमोल तू सत्यात आणले.. : संभाजी राजे छत्रपती यांनी अमोल बालवडकर यांचे केले कौतुक 

Categories
cultural पुणे महाराष्ट्र

माझ्या मनातील महान काम अमोल तू सत्यात आणले..

: संभाजी राजे छत्रपती यांनी अमोल बालवडकर यांचे केले कौतुक

पुणे : माझ्या मनातील, प्रेरणेतील महान काम अमोल तू सत्यात आणले.. या महान कामासाठी छत्रपती शिवाजी महाराज तुला कायम आशीर्वाद देत राहतील.. अशा शब्दात युवराज छत्रपती संभाजी महाराज भोसले (Sambhaji Raje Chaptrapati)  यांनी नगरसेवक अमोल बालवडकर (Amol Balwadkar) यांचे कौतुक केले. तर आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण क्षण आहे. आज या अनमोल आशीर्वादाने मी धन्य झालो. असे भावनिक उद्गार अमोल बालवडकर यांनी काढले.

: एकत्रित स्मारकाचे भूमिपूजन संपन्न

बालवडकर यांनी सांगितले, स्वराज्य संकल्पक शहाजी राजे, राजमाता जिजाऊसाहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले एकत्रित स्मारक बालेवाडी येथे साकार होत आहे. या कामापेक्षा महान काम माझ्या हातून उभ्या आयुष्यात होणे शक्य नाही. आज या महान कामाचा भूमिपूजन समारंभ युवराज संभाजीराजे छत्रपती (खासदार) यांच्या हस्ते संपन्न झाला..

 

समारंभास ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प.शेखरमहाराज जांभुळकर, भाजपाचे जेष्ठ नेते  प्रकाशतात्या बालवडकर, नगरसेविका स्वप्नालीताई प्रल्हाद सायकर, नगरसेविका ज्योतिताई गणेश कळमकर, स्वाभिमानी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, भाजपा युवा नेते लहुशेठ बालवडकर, भाजपा पुणे शहर उपाध्यक्ष  गणेशजी कळमकर, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओ.बी.सी.  प्रल्हादजी सायकर, भाजपा युवा नेते  राहुलजी कोकाटे, भाजपा कोथरूडचे सरचिटणीस  सचिनजी पाषाणकर, प्रभाग क्र. ९ भाजपा अध्यक्षा  उमाताई गाडगीळ, प्रभाग क्र. ९ भाजपा महिला अध्यक्षा अस्मिताताई करंदीकर, सुसचे माजी सरपंच  नारायणराव चांदेरे, मा. सरपंच  काळुराम गायकवाड, पुणे जिल्हा भूमाता किसान मोर्चाचे अध्यक्ष अनिल तात्या बालवडकर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशजी तापकीर, सुसचे भाजपा युवा नेते  अनिलबाप्पु ससार, कोथरूड आयटी सेलचे अध्यक्ष मंदार राराविकर, हभप चंद्रकांत वांजळे, हभप शेखर जांभुळकर तसेच बालेवाडीतील समस्त शिवप्रेमी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी शिल्पकार सुभाष भरेकर व अमित भरेकर, कंत्राटदार अनिल धोत्रे (मे.आर.आर.धोत्रे), अनुराधा येडके, शाहिर अरुण गायकवाड, शस्त्रास्त्र तज्ञ  राकेश राव यांचा सत्कार करण्यात आला..