Sinhagad road | Madhuri Misal | सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू होणार

Categories
Breaking News PMC Political पुणे

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू होणार

सिंहगड रस्त्याला पर्यायी रस्ता १५ दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी कळविली आहे. मिसाळ यांनी अधिकाऱ्यांसोबत या रस्त्याची पाहाणी केली.

मिसाळ म्हणाल्या, जनता वसाहत पु. ल. देशपांडे उद्यानामागील रस्ता काँक्रिट करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर वृक्ष छाटणी आणि इलेक्ट्रिक विभागाची कामे १५ दिवसांत पूर्ण होतील. त्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

विश्रांती नगर रस्ता , विठ्ठल मंदिर मागील रस्ता, हिंगणे चौक, कॅनॉल रस्ता आदी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सिहगड रस्त्यावरील उड्डाण पुलाच्या जागेची पाहाणी केली.

श्रीनिवास बोनाला, प्रकल्प प्रमुख, व्ही जी कुलकर्णी, पथ विभाग प्रमुख, अमित घुले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक, उदयसिंग शिंगाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिहगड रोड वाहतूक विभाग, प्रदीप आव्हाड, क्षेत्रीय अधिकारी सिहगड क्षेत्रीय कार्यालय, अमर शिंदे, कार्यकारी अभियंता पथ , राखी चौधरी, अभियंता पथ, अतुल कडू अभियंता पथ, अजय वायसे, कार्यकारी अभियंता प्रकल्प , सुश्मिता शिर्के, अधिक्षक अभियंता प्रकल्प, महादू थोपटे उपअभियंता , निखिल रंधवे, कनिष्ठ अभियंता, विश्वास ननावरे , प्रवीण दिवेकर , विशाल पवार उपस्थित होते.

Water cut : सिंहगड रोड, धानोरी, विमाननगर परिसरात गुरुवारी पाणी बंद 

Categories
Breaking News PMC social पुणे

सिंहगड रोड, धानोरी, विमाननगर परिसरात गुरुवारी पाणी बंद

गुरूवार रोजी वडगाव जलकेंद्र तसेच विमान नगर व धानोरी टाक्यावर अवलंबून असणारा भाग येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे व टाक्यांचे अखत्यारीतील पुणे शहराचा काही भागाचा पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
शुक्रवार दिनांक ०६/०५/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-

१) वडगाव जलकेंद्र परीसर हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.
२) भामा आसखेड प्रकल्प :-
i) विमाननगर टाकी परिसर :- संजय पार्क, संपूर्ण विमाननगर , म्हाडा कॉलनी, एस.आर.ए. भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुना नगर, दत्त मंदिर परिसर इ.
ii) धानोरी टाकी परिसर :- कमल पार्क, माधव नगर ,धानोरी गावठाण, परांडे नगर, लक्ष्मी नगर, गोकुळ नगर, भैरवनगर, काशिनाथ नगर, आनंद पार्क, श्रमिक नगर, सिद्धार्थ नगर,
सुदामा नगर, अंबानगरी, हरिकृष्ण पार्क, इ.

Pune Shivsena : Sinhgadh Road bridge : भविष्यातील वाहतूकींचे नियोजन करुनच उड्डणपूलाचे बांधकाम करावे – शिवसेना

Categories
Breaking News PMC Political पुणे

भविष्यातील वाहतूकींचे नियोजन करुनच उड्डणपूलाचे बांधकाम करावे – शिवसेना

पर्यायी रस्त्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन

पुणे – सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून अजूनही पर्यायी मार्गांची कामे पूर्ण होवू शकली नाहीत. त्यामुळे पर्यायी मार्गाची कामे आधी पूर्ण करून नंतरच उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात करावी, या मागणीसाठी शिवसेना शहरच्या वतीने संतोष हॉल येथे निदर्शने आणि आंदोलन करण्यात आले. शिवसेना खडकवासला विधानसभा मतदार संघाचे समन्वयक मनीष जगदाळे यांनी या आंदोलनाला पुढाकार घेतला. तसेच शहर शिवसेना यांच्या वतीने प्रकल्प मुख्य अभियंता श्रीनिवास बोनाला यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले, शहरातील बहुतांश उड्डाणपुलांचा आराखडा हा चुकीचाच असल्याचा प्रत्यय वाहनचालकांना येतो आहे. वाहतूक नियोजनकारांना एक तर आराखडा तयार करता येत नाही किंवा तयार करण्यात आलेल्या आराखड्यात स्थानिक लोकप्रतिनिधींकडून बदल करण्यात असल्याने शहरातील उड्डाणपुलांमुळे वाहतूककोंडी वाढल्याचेच चित्र आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावर मेट्रो आणि इतर वाहतूक व्यवस्थेचा विचार करून पुढील किमान ५०-१०० वर्षाचा विचार करून उड्डाणपूल तयार करण्यात यावा या मगणीसाठी आंदोलन करण्यात आले.

गजानन थरकुडे म्हणाले की, भविष्यातील आव्हानांचा विचार करून उड्डाणपुलाचे नियोजन करणे अपेक्षित असताना, पालिका प्रशासन यांच्याकडून याबाबत कोणतेही नियोजन ना करता काम सुरू करण्यात आले आहे. पर्यायी रस्ते अजूनही रखडले असून त्यावरून वाहतूक सुरू झालेली नाही. त्यामुळे आधी पर्यायी रस्ता करा, मगच उड्डाणपुलाचे काम सुरू करा, अशी मागणी आम्ही करत आहोत.

शिवसेना खडकवासला समन्वयक मनीष जगदाळे म्हणाले, पुणे महापालिकेकडून सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फन टाईम पर्यंत उड्डाणपूलाचे काम चालू करण्यात येणार आहे. या कामामुळे सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होणार आहे. ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिंहगड रस्त्यास पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण करुन हा रस्ता वाहतूकीस खुला करावा. रस्ता वाहतुकीसाठी खुला होईपर्यंत उड्डाणपूलाचे काम सुरु करुन नये, अशी मागणी जगदाळे यांनी केली आहे.

यावेळी शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे,  मनिष जगदाळे, उपजिल्हाप्रमुख महेश मते, उपशहरप्रमुख भरत कुंभारकर, शाखाप्रमुख रमेश देसाई, संघटक प्रसाद गिजरे, समन्वयक राजाभाऊ चव्हाण, विभागप्रमुख महेश पोकळे, वैभव हनमघर, सतीश पंधारे, अनंत घरत, राजू पायगुडे, कल्पेश वाजे, सुनील जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.