Biometric Attendene | Smart Identity Card | आगामी ८ दिवसांत कर्मचाऱ्यांना स्मार्ट ओळखपत्र उपलब्ध करून दिले जाणार | महापालिका प्रशासनाचा दावा | महापालिकेत बऱ्याच विभागात Biometric मशीन बंद अवस्थेत

Categories
Breaking News PMC पुणे

आगामी ८ दिवसांत कर्मचाऱ्यांना स्मार्ट ओळखपत्र उपलब्ध करून दिले जाणार

| महापालिका प्रशासनाचा दावा

| महापालिकेत बऱ्याच विभागात Biometric मशीन बंद अवस्थेत

पुणे  | महापालिका प्रशासनाकडून महापालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करण्यात आली आहे. बायोमेट्रिक हजेरी नसेल तर १५ तारखेपासून वेतन अदा न करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी जारी केले आहेत. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र दुसरीकडे काही विभागात बायोमेट्रिक मशीन बंद आहेत. त्यामुळे आहे त्या मशीनवर रांगा लागत आहेत. यात कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे. याकडे मात्र प्रशासनाचे लक्ष नाही. याबाबत प्रशासनाला विचारले असता खुलासा करण्यात आला कि सगळीकडे मशीन उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच आगामी ८ दिवसांत स्मार्ट ओळखपत्र देखील उपलब्ध करून दिले जातील. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ देखील वाचेल.

Aadhar Enabled Bio-Metric Attendance System” ची प्रणाली पुणे महानगरपालिकेमध्ये  सूरू करण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व संबंधित खातेप्रमुख यांनी आपल्या विभागातील सर्व अधिकारी/सेवकांचे बायोमेट्रिक्स होते याबाबतची खात्री करणे आवश्यक आहे. तथापि, अनेक विभागामध्ये अद्याप अधिकारी/सेवक बायोमेट्रिक्स हजेरी प्रणालीमध्ये हजेरी लावत नाही असे निदर्शनास आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी नसेल, त्यांचे 15 नोव्हेंबर पासून वेतन अदा करू नये. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी जारी केले आहेत. यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत. मात्र दुसरीकडे काही विभागात बायोमेट्रिक मशीन बंद आहेत. त्यामुळे आहे त्या मशीनवर रांगा लागत आहेत. यात कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे.

दरम्यान विद्युत विभागाकडून पुणे महानगरपालिकेच्या विविध ठिकाणी Bio- Metric Attendance Machine बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी / कर्मचारी यांच्या ओळखपत्रांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी पुणे मनपाच्या विविध कार्यालयांसाठी  नव्याने स्मार्ट ओळखपत्र खरेदी करून देण्यासाठी महापालिका आयुक्त यांची मान्यता प्राप्त झाली आहे. हे ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. त्यानुसार महापालिका  कर्मचाऱ्यांसाठी स्मार्ट ओळखपत्र खरेदी करणार आहे. एका ओळखपत्राची किंमत 136 रुपये आहे.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार हे ओळखपत्र बायोमेट्रिक हजेरी साठी तसेच अंशदायी आरोग्य सहायता योजनेसाठी साठी देखील वापरले जाईल. त्याचप्रमाणे या ओळखपत्राच्या माध्यमातून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची सर्व माहिती एकत्रित ठेवली जाईल. त्यासाठी हे ओळखपत्र खरेदी केले जाणार आहे. हे ओळखपत्र आता आगामी ८ दिवसात महापालिका कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
बंद असलेल्या बायोमेट्रिक मशीन तत्काळ सुरु केल्या जातील. शिवाय आगामी ८ दिवसात आम्ही कर्मचाऱ्यांना स्मार्ट ओळखपत्र उपलब्ध करून देणार आहोत. यामुळे बायोमेट्रिक हजेरी जलद गतीने होण्यास मदत होईल.
| श्रीनिवास कंदूल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग