Maratha Community : Yuvraj Sambhajiraje Chhatrpati : मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय : खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे

Categories
Breaking News Political social महाराष्ट्र

मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय

: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय

: खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे

मुंबई : – मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यापूर्वी शिफारस झालेल्या एसईबीसी, ईएसबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्मितीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणण्याबरोबरच सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या संदर्भातील मागण्यांवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आले. दरम्यान, मंत्री दिलीप वळसे-पाटील, एकनाथ शिंदे आणि अमित देशमुख यांनी आझाद मैदान येथे उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांना या निर्णयांची जाहीर माहिती दिल्यानंतर खासदार संभाजीराजे यांनी तीन दिवसांपासून सुरु केलेले आमरण उपोषण मागे घेतले आहे.

मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक घेण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, खासदार राहुल शेवाळे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, नितीन करीर, सुजाता सौनिक, आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव सुमंत भांगे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाज आंदोलनातील पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मराठा समाजाच्या मागण्यांवर निर्णय घेण्याची मागणी केली. दोन तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या बैठकीत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले.

मराठा समाजाच्या मागण्यांवर शासनाने घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे-

● सारथीकडून कौशल्य विकासाचे कार्यक्रम एका महिन्यात सुरु करण्यात येणार.

● सारथी संस्थेचे व्हिजन डॉक्युमेंट तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ३० जून २०२२ पर्यंत तयार करणार.

● सारथीमधील रिक्त पदे दि.१५ मार्च, २०२२ पर्यंत भरण्याचा निर्णय.

● सारथी संस्थेच्या राज्यभरातील आठ उपकेंद्रांसाठी जमीन देण्याचा प्रस्ताव दि.१५ मार्च २०२२ पर्यंत मंत्रीमंडळास सादर करुन मान्यता घेण्यात येणार.

● अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला चालू आर्थिक वर्षात मंजूर रु. १०० कोटीपैकी रु. ८० कोटी प्राप्त झाले आहेत. उर्वरित रु. २० कोटी उपलब्ध करुन देण्याबरोबरच पुरवणी मागणीव्दारे अतिरिक्त १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देणार.

● व्याज परताव्यासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता करुन प्रस्ताव प्राप्त झाल्यास तातडीने व्याज परतावा देणार. क्रेडिट गॅरंटीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार.

● परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज परताव्याबाबत धोरण तयार करण्यात येत आहे.

● व्याज परताव्यासाठी कर्जाची मुदत रु.१० लाखांवरून रु.१५ लाख करण्यात येईल.

● अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व इतर दोन महामंडळांवर पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालकांची दि. १५ मार्च २०२२ पर्यंत नियुक्ती करणार. त्याशिवाय संचालक मंडळाची आणि आवश्यकतेनुसार इतर कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात येणार.

● जिल्ह्यांमध्ये स्थापन करावयाच्या वसतीगृहांची यादी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून आजच उपलब्ध करून घेऊन तयार असलेल्या वसतीगृहांचे येत्या गुढीपाडव्याच्या दिवशी उद्धाटन करण्यात येणार.

● कोपर्डी खून खटलाप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल अपिलाची सुनावणी तातडीने घेण्यासाठी महाधिवक्त्यांना विनंती करून दि. २ मार्च, २०२२ रोजी प्रकरण मेंन्शन करण्यात येईल

● रिव्ह्यू पिटीशनची सुनावणी खुल्या न्यायालयात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पंधरा दिवसात अर्ज करण्यात येईल त्याबाबतचे प्रकरण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे हाताळतील.

● मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीचा दरमहा गृह विभागाकडून आढावा बैठक घेण्यात येईल. प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेवून तसेच ज्या आंदोलनात व्हिडीओ फुटेजमध्ये ज्यांचा गुन्ह्यामध्ये सहभाग नव्हता त्यांचेवरील देखील गुन्हा मागे घेण्यासाठी प्रकरणनिहाय निर्णय घेण्यात येईल. तसेच जे गुन्हे मागे घेतलेले आहेत परंतु न्यायालयीन पटलावर प्रलंबित आहेत त्याचा आढावा घेवून प्रकरणनिहाय त्याचा निर्णय घेण्यात येईल.

● मराठा आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ९ सप्टेंबर २०२० च्या स्थगिती आदेशापूर्वी नियुक्तीकरिता शिफारस झालेल्या परंतु ९ सप्टेंबर २०२० नंतर सुधारित निवड यादीनुसार जे एसईबीसी, ईएसबीसी व इडब्ल्युएस उमेदवार शासकीय सेवेतून बाहेर पडतील त्यांच्यासाठी मानवतावादी दृष्टीकोनातून अधिसंख्य पदे निर्माण करुन त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव एक महिन्यात मंत्रीमंडळापुढे सादर करणार.

● मराठा आंदोलनात मृत पावलेल्यांच्या वारसदारांना एस. टी. महामंडळात नोकरी देण्याच्या उर्वरित प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेऊन संबंधित उमेदवारांकडून कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्यांना तात्काळ नोकरी देण्याचा निर्णय.

उपोषणस्थळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासनाच्या निर्णयांचे केले जाहीर वाचन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला, त्यानंतर त्या निर्णयांचे मागणीनिहाय इतिवृत्त तयार करुन सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आझाद मैदान येथे उपोषणस्थळी जाऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. शासनाने मराठा समाजाच्या मागण्यांवर घेतलेल्या निर्णयांचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर वाचन केले. टाळ्यांच्या कडकडाटात आंदोलकांनी शासनाच्या या निर्णयांचे स्वागत केले. मराठा समाजाच्या मागण्या शासनाने मान्य केल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रीमंडळाच्या वतीने खासदार संभाजीराजे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानून खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे उपोषण मागे

मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन या मागण्या इतिवृत्तात आणल्या आहेत, नुसते आश्वासन दिलेले नाही तर हे निर्णय घेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम दिला आहे, याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रीमंडळाचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आभार मानले. एसईबीसी, ईएसबीसी आणि इडब्ल्यूएस उमेदवारांच्या नियुक्त्यांचा निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयावर कोणताही न्यायालयीन वाद उद्‍भवल्यास शासनाबरोबर राहू, अशी ग्वाहीही यावेळी खासदार संभाजीराजे यांनी दिली. त्यानंतर तीन दिवसांपासून सुरु असलेले उपोषण मागे घेत असल्याची घोषणा त्यांनी केली.

34 Villages : Fund : समाविष्ट गावांच्या मूलभूत विकासावर सरकारचे लक्ष आताच का? 

Categories
Breaking News PMC Political पुणे

समाविष्ट गावांच्या मूलभूत विकासावर सरकारचे लक्ष आताच का?

: विविध कामासाठी 4 कोटींचे अनुदान महापालिकेला प्रदान

पुणे : महापालिका हद्दीत नवीन 34 गावांचा समावेश झाला आहे. मात्र ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. महापालिका आणि सरकार कडून अनुदान घेऊन इथे कामे केली जाणार आहेत. त्यानुसार सरकारने गावांना निधी देण्यास सुरुवात केली आहे. गावामध्ये विविध विकासकामे करण्यासाठी सरकार कडून नुकताच 4 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र आताच म्हणजे निवडणुकांच्या तोंडावरच हा निधी का उपलब्ध करण्यात येत आहे. यावरून मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

: ही कामे केली जाणार

– फुरसुंगी येथील सर्व्हे नं २०५ या ठिकाणी बहुउददेशीय सभागृह बांधणे.  : ३५ लाख
– फुरसुंगी येथील मॅजेस्टिक अॅक्वा सोसायटीचा अॅमेनिटी स्पेसमध्ये गार्डन/ जॉगिग ट्रॅक / ओपन जिम करणे.ता हवेली जि पुणे  : 40 लाख
– उरुळीदेवाची येथील सर्वे नं १५१ येथील सावली सोसायटी समोरिल मोकळया जागेवर भाजी मंडई बांधणे.ता हवेली जि पुणे : 35 लाख
– उंड्री येथील सर्व्हे नं २/१अ, २/१ब, ३/२/१ व ३/१/२ व ३/२/२
ओपन स्पेस क्षेत्र ५१०९.९२ चौ मी. विकसित करणे. ता हवेली जि पुणे : 50 लाख
-आंबेगाव परिसरामध्ये विन्डसर कांऊटी सोसायटी सर्वे नं ३९/२५ पी,३९/१८/१, १९/१९/२० मध्ये अॅमेनिटी स्पेस क्षेत्र १६४०.२९ स्क्वे मी व आरक्षण क्षेत्र २१४३.२५ स्क्वे. मी. एकुण ३७८३.६४ स्क्वे मी येथे गार्डन/जॉगींग ट्रॅक / ओपन जीम बांधणे.ता हवेली जि पुणे : 40 लाख
आंबेगाव परिसरामध्ये श्री बालाजी सहकारी गृहनिर्माण संस्था लि. पुणे ६ । सर्व्हे नं २८ या ठिकाणी अॅमेनिटी स्पेस जागेवरती बहुउददेशीय सभागृह बांधणे.ता हवेली जि पुणे : 40 लाख

Recruitment: Maharastra: नववर्षात महाराष्ट्रात मेगाभरती! : एवढी पदे भरणार!

Categories
Breaking News Education महाराष्ट्र

नववर्षात महाराष्ट्रात मेगा भरती!

: महत्वाची पदे भरणार

राज्य सरकारच्या (Maharashtra State Government) 25 विभागांतील 15 हजार 511 रिक्‍त पदांची भरती (Recruitment) एप्रिलअखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून (General Administration Department) 7 हजार 460 रिक्‍त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (Maharashtra Public Service Commission – MPSC) सादर करण्यात आले आहे. उर्वरित 8 हजार 61 पदांचे मागणीपत्र काही दिवसांत आयोगाला सादर केले जाणार आहे. त्यानुसार गट अ, ब आणि क प्रवर्गातील रिक्‍तपदे भरली जाणार आहेत. (In the new year, mega recruitment will be done in various departments in the state of Maharashtra)

राज्य सरकारच्या महत्त्वाच्या एकूण 34 विभागांमध्ये तब्बल अडीच लाखांपर्यंत पदे रिक्‍त आहेत. काही पदांची भरती ‘एमपीएससी’च्या माध्यमातून तर काही पदे थेट खासगी संस्थांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने (Information and Technology Department) यापूर्वीच पाच संस्थांची निवड केली आहे. वित्त विभागाने (Finance Department) विविध विभागांमधील महत्त्वाची पदे भरायला मान्यता दिल्याने रिक्‍त पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. कोरोनामुळे (Covid-19) राज्याची आर्थिक स्थिती विस्कटली आणि महसूल (Revenue) मोठ्या प्रमाणावर कमी झाला. त्यामुळे सर्व रिक्‍त पदांची भरती होऊ शकली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारच्या (Fadnavis Government) काळात जवळपास 70 हजार पदांची मेगाभरती (Mega Recruitment) होईल, अशी घोषणा झाली, परंतु पुढे काहीच कार्यवाही झाली नाही. महाविकास आघाडी सरकारनेही (Mahavikas Aghadi Government) सुरवातीला घोषणा केली, परंतु कोरोनाच्या संकटामुळे अजूनपर्यंत तेवढ्या पदांची भरती झालेली नाही. आता टप्प्याटप्प्याने पदभरती केली जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील अधिवेशनात एमपीएससीमार्फत काही दिवसांत रिक्‍तपदांची भरती होईल, अशी ग्वाही दिली होती. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांनीही जवळपास साडेपंधरा हजार पदांची भरती आयोगामार्फत होईल, असे स्पष्ट केले होते. त्याची कार्यवाही सुरू झाली, परंतु अजूनही आठ हजार पदांचे मागणीपत्र आयोगाकडे सादर करण्यात आलेले नाही. मात्र, काही दिवसांत संबंधित विभागातील रिक्‍त पदांचे मागणीपत्र आयोगाला पाठविले जाणार असून नववर्षात त्या पदांची भरती होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला आहे.

‘एमपीएससी’कडे प्राप्त मागणीपत्र…

  • विभाग : भरती होणारी पदे
  • सार्वजनिक आरोग्य : 937
  • कृषी, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय : 924
  • उद्योग, ऊर्जा, कामगार : 279
  • अन्न, नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण : 62
  • पाणी पुरवठा व स्वच्छता : 16
  • सामान्य प्रशासन : 957
  • मराठी भाषा : 21
  • आदिवासी विभाग : 7
  • बृन्हमुंबई महापालिका : 21
  • पर्यावरण : 3
  • गृह : 1159
  • वित्त : 356
  • वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्ये : 1572
  • उच्च व तंत्रशिक्षण : 35
  • शालेय शिक्षण, क्रीडा : 105
  • सहकार, पणन, वस्त्रोद्योग : 32
  • कौशल्य विकास, उद्योजकता : 171
  • महसूल व वन : 104
  • ग्रामविकास व पंचायतराज : 32
  • नगरविकास : 90
  • मृदा व जलसंधारण : 11
  • जलसंपदा : 323
  • विधी व न्याय : 205
  • नियोजन : 55

नववर्षातील मेगाभरतीचे नियोजन…

  • राज्य शासनाच्या 25 विभागातील 15 हजार 511 रिक्‍त पदांची होणार भरती
  • सरळसेवा व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरली जातील रिक्‍त पदे
  • सामान्य प्रशासन विभागाकडून ‘एमपीएससी’कडे सात हजार 460 पदांचे मागणीपत्र
  • गट अ, ब आणि क प्रवर्गातील पदांची होणार भरती; तीन महिन्यात पदभरती होईल पूर्ण
  • राज्य सरकारच्या घोषणेनुसार अजून 8 हजार 61 पदांचे जाणार आयोगाला मागणीपत्र

Vinayak Mete : शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार  : शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांची माहिती 

Categories
Breaking News PMC Political पुणे महाराष्ट्र

शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार 

: शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांची माहिती

पुणे : शिवसंग्राम पुणे महापालिकेची निवडणूक लढविणार आहे. मात्र किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणच्या लढवायच्या, कोणासोबत जायचं याबाबत अदयाप कोणता निर्णय घेतला नाही. नंतर लवकरच सर्व स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल. अशी माहिती शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सरकारला चिंता आर्यन खान ची

शेतकरी रोज आत्महत्या करताहेत. एकट्या बीड जिल्ह्यांत आतापर्यंत १६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ७० ते ७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंदच नाही. शेतकऱ्यांची लेकरं म्हणवून घेणाऱ्यासाठी ही लाज आणणारी बाब आहे. शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला कोणी गेले नाही ना त्यांच्या सांत्वनासाठी नेते फिरकले. राज्य सरकरला शेतकऱ्यांचे काही देणे घेणे नाही. सरकारला केवळ नवाब मलिकांच्या जावई व आर्यन खान ची  चिंता असल्याची टिका शिवसंग्रामचे नेते व आमदार विनायक मेटे यांनी केली. राज्यातील विविध प्रश्ना संदर्भात रविवारी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

”राज्य सरकारने शेतकऱ्यांची चेष्ठा लावली आहे. मुर्दाड मनाचं सरकार आहे.त्यांना याची लाज देखील वाटत नाही. दिवाळीत जर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही तर दिवाळी नंतर शिवसंग्राम च्य वतीने सरकार मोर्चा काढला जाईल. तो बीड मधून काढला जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.”

छत्रपतीं शिवरायांचे स्मारक उभारायला वेळ नाही

”फडणवीस सरकारचा काळात  शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत होत्या. मदत देखील तत्काळ दीली जात होती.पण ठाकरे सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील गंभीर नाही. दोन महिने उलटून गेले सरकारने साधी बैठंक देखील घेतली नाही. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकारला मराठा समाजाला न्याय दयायचा नाही. ठाकरे सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार सर्व विषयावर बोलतात. त्यांना केवळ मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलायला वेळ नाही. मराठा समाजाचं आंदोलन शांत झालेले नाही. मागासवर्ग आयोगाला पैशाची कमतरता नाही. निवडणुका जवळ आल्याकी ठाकरे सरकारला शिवाजी महाराज आठवतात. शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागणाऱ्या सरकारला छत्रपतीं शिवरायांचे स्मारक उभारायला वेळ नाही.”

सध्या सरकारला राज्यात कोणता प्रश्न च नाही असे वाटते. आर्यन खान  व समीर वानखडे ह्या प्रश्नातच सरकारला स्वारस्य आहे. ह्या प्रकरणांत जे सुरु आहे.ते खूप खालच्या पातळीवरचं लक्षण आहे असेही ते यावेळी म्हणाले. या पत्रकार परिषदेस शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, बाळासाहेब चव्हाण, आदी उपस्थित होते.”

PMC : Corporators : महापालिकेत किती नगरसेवक वाढणार हे अजून निश्चित नाही!   : सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार 

Categories
Breaking News PMC पुणे महाराष्ट्र

महापालिकेत किती नगरसेवक वाढणार हे अजून निश्चित नाही!

: सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार

पुणे: महापालिकेत नगरसेवकांची संख्या 15-17% वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र शहर आणि समाविष्ट गावांची लोकसंख्या गृहीत धरता किती नगरसेवक किंवा किती प्रभाग वाढतील, हे अजून पर्यंत निश्चित झालेले नाही. त्यासाठी राज्य सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. मात्र पुणे महापालिकेत 175 च्या वर नगरसेवक जाणार नाहीत, हे मंत्रिमंडळ निर्णयानुसार स्पष्ट होत आहे.

: 175 च्या पुढे नगरसेवक जाणार नाहीत

महापालिकेची नगरसेवक संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे आता नेमका कोणाचा फायदा होणार आणि कोणाची ताकद वाढणार, याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या महिनाभरापूर्वीच्या आदेशाने शहरातील नवीन प्रभागांची संख्या 55 वर जाणार होती. मात्र, शासनाच्या आदेशातील गोंधळामुळे ही प्रभागांची संख्या 59 अथवा 62 पर्यंत जाईल. तर 2017 च्या निवडणुकांवेळी ही प्रभाग संख्या 41 होती. त्यानंतर 11 समाविष्ट गावांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर ही प्रभाग संख्या 42 वर गेली आहे. सरकारने निर्णयात म्हटले आहे कि 30 लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी 161 नगरसेवक असतील. त्यापुढे प्रत्येकी 1 लाखासाठी 1 नगरसेवक असेल. शहर आणि समाविष्ट गावे यातील लोकसंख्या गृहीत धरता नगरसेवकांची संख्या 173 पर्यंत जाऊ शकते, असा अंदाज आहे. मात्र अंतिम संख्या अजून निश्चित झालेली नाही. त्यासाठी राज्य सरकारच्या लेखी आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. सरकारला अगोदर 34 गावांची 2011 ची लोकसंख्या गृहीत धरावी लागणार आहे. त्यानंतरच हे चित्र स्पष्ट होईल.

मात्र पुणे महापालिकेत 175 च्या वर नगरसेवक जाणार नाहीत, हे मंत्रिमंडळ निर्णयानुसार स्पष्ट होत आहे. असे असले तरी मात्र सर्व पक्ष आता कसून तयारीला लागले आहेत.