MLA Sunil Tingre | PMC Pune | विश्रांतवाडी चौकातील बुध्द विहार स्थलांतरित करण्यास परवानगी | आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश

Categories
Breaking News PMC Political social पुणे

MLA Sunil Tingre | PMC Pune | विश्रांतवाडी चौकातील बुध्द विहार स्थलांतरित करण्यास परवानगी

|आमदार सुनिल टिंगरे यांच्या पाठपुराव्याला यश

| धानोरी- लोहगावकडे जाणारी वाहतूक कोंडी सुटणार

MLA Sunil Tingre | PMC Pune | विश्रांतवाडी चौकातील रस्त्यावर असलेले बुद्ध विहार (Buddha Vihar) स्थलांतरीत करण्यास महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी मंजुरी दिली आहे. येथील वॉटर वर्क्स आणि प्ले ग्राउंडच्या आरक्षित जागेवर हे बुद्ध स्थलांतरीत होणार आहे. त्यामुळे धानोरी-लोहगावकडे (Dhanori-Lohgaon Road) जाणार्‍या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. वडगाव शेरीचे आमदार सुनिल टिंगरे (Vadgaonsheri MLA Sunil Tingre)यांनी ही माहिती दिली. (MLA Sunil Tingre | PMC Pune)

गेल्या अनेक वर्षांपासून विश्रांतवाडी चौकात (Vishrantwadi Chowk) सुमेध बुद्ध विहार (Sumedh Buddha Vihar) आहे. थेट चौकात आणि जवळपास अर्ध्या रस्त्यावर असलेल्या या बुध्द विहारामुळे धानोरी तसेच लोहगाव परिसरात जाणार्‍या वाहनाना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हे बुध्द विहार स्थलांतरित करुन येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. आमदार सुनिल टिंगरे (MLA Sunil Tingre)यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांच्या सोडविण्यासाठी महापालिका भवनासमोर उपोषण केले होते. त्यावेळी त्यांनी हे बुध्द विहार स्थलांतरीत करून वाहतुक कोंडी सोडविण्याची आग्रही मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने त्यावर कार्यवाही सुरू केली. यासदर्भात अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Additional Commissioner Vikas Dhakane) यांनी आमदार टिंगरे यांच्यासह संबंधित सर्व विभागांच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यात येथील वॉटर वर्क आणि प्ले ग्राऊंडच्या आरक्षित जागेवरील 200 चौरस मीटर जागेवर हे बुद्ध विहार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्रशासनाने प्रस्ताव तयार करुन तो आयुक्तांच्या मंजुरीसाठी ठेवला होता. मंगळवारी आयुक्तांनी या प्रस्तावास मंजुरी दिल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले. त्यानुसार आता लवकरच हे बुद्ध विहार स्थलांतरित होऊन या चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. (Pune municipal Corporation)


नागरिकांची अडचण लक्षात घेऊन हे बुद्ध विहार स्थलांतरीत करण्यासाठी बुध्द विहाराचे अध्यक्ष राजीव बेंगळे यांच्यासह पालिकेचे नगराभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे व्ही. जी. कुलकर्णी, बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रोहिदास गव्हाणे, बिपीन शिंदे, पथ विभागाचे अधिकारी मिरा सबनीस, संजय धारव तसेच एसआरए भूमी जिंदगी विभाग यासंर्वाची मोलाची मदत झाल्याचे आमदार टिंंगरे यांनी सांगितले.
—————————–

विश्रांतवाडी चौकातील वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. हे बुध्द विहार स्थलांतरीत झाल्यामुळे लोहगाव-धानोरीकडे जाणारी वाहने आता विना अडथळा जाऊ शकतील. तसेच लवकरच या चौकातील उड्डाणपुलाच्या कामाच्या निविदा प्रक्रिया राबविली जाणार असून पुलाचे काम होऊन येथील कोंडीचा प्रश्न कायम स्वरुपी सुटेल.

सुनिल टिंगरे, आमदार, वडगाव शेरी.
—————————–