PMC : अतिक्रमण कारवाई दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा  : महापालिका संघटनाची पोलीस आयुक्तांकडे मागणी 

Categories
PMC पुणे
Spread the love

अतिक्रमण कारवाई दरम्यान मनपा कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा

: महापालिका संघटनाची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पुणे : धानोरी परिसरात अतिक्रमण निर्मुलन कारवाई दरम्यान
पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी यांचेवर जबर मारहाण करण्यात आली होती. या मारहाण करणाऱ्या लोकांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी महापालिकेतील कमर्चारी संघटनांनी पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे.
: पोलीस आयुक्त यांना दिले पत्र
पीएमसी एम्प्लॉईज युनियन, पुणे महापालिका कामगार युनियन, पुणे मनपा अभियंता संघ, पुणे मनपा डॉक्टर्स असोसिएशन यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना पत्र दिले आहे. त्यानुसार  मंगळवार २९/०३/२०२२ रोजी दु.२.३० चे सुमारास धानोरी येथे नगररोड वडगाव शेरी व येरवडा क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्य अतिक्रमण निर्मुलन कारवाईच्या वेळी अतिक्रमण निर्मुलन पथकातील अनिल परदेशी व जेसीबी चालकास काही  लोकांनी गर्दीचा फायदा घेऊन जबर मारहाण केली.  त्यात त्यांना गंभीर दुखापत झालेली आहे.  अनिल परदेशी यांना सह्याद्री रुग्णालय,शास्त्रीनगर येथे तपासणीसाठी पुन्हा दाखल करण्यात आले होते.  या दुर्दैवी हल्ल्यामुळे पुणे महापालिकेतील सेवकांमध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या असून सदर हल्लेखोर आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी अशी सर्व सेवकांची व सर्व कर्मचारी संघटनांची मागणी आहे. तरी, मंगळवार,दि.२९/०३/२०२२ रोजी उपरोक्त ठिकाणी घडलेल्या हल्ल्यातील आमचे पुणे मनपाचे जखमी कर्मचारी यांना न्याय मिळावा याकरिता सदर घटनेतील दोषी व्यक्तींविरुद्ध तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. अशी मागणी पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

Leave a Reply