Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या कल्याणकारी योजनांचा शिवाजी दौंडकर यांच्या प्रयत्नाने कित्येक कर्मचाऱ्यांना झाला फायदा | दौंडकर यांचा स्टेनो ते सह महापालिका आयुक्त असा रंजक प्रवास

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या कल्याणकारी योजनांचा शिवाजी दौंडकर यांच्या प्रयत्नाने कित्येक कर्मचाऱ्यांना झाला फायदा

| दौंडकर यांचा स्टेनो ते सह महापालिका आयुक्त असा रंजक प्रवास

Pune Municipal corporation पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी (PMC Pune employees) विविध योजना राबवल्या जातात. महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) माध्यमातून या योजना राबवण्यात येतात. या योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी नुकतेच सेवानिवृत्त झालेले महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर (Shivaji Daundkar) यांचा मोलाचा हातभार आहे. दौंडकर यांनी आपल्या विशेष प्रयत्नाने या योजना कामगारांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. याचा कर्मचाऱ्यांच्या कित्येक कुटुंबाना देखील फायदा झाला. महापालिकेत स्टेनो (Steno) म्हणून रुजू होऊन आणि सह महापालिका आयुक्त तथा मुख्य कामगार अधिकारी (Chief labour officer) पदा पर्यंतचा शिवाजी दौंडकर यांचा प्रवास खूपच रंजक आहे. (Pune municipal corporation)
शिवाजी दौंडकर हे नुकतेच महापालिकेच्या सेवेतून म्हणजे 31 मे ला सेवानिवृत्त झाले. त्यांनी महापालिकेच्या विविध पदांवर काम केले. यामध्ये मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव, सह महापालिका आयुक्त, शिक्षण विभाग, महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, अशा विविध कामाचा समावेश आहे. मात्र मुख्य कामगार अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द कायम लक्षात राहील. कारण त्यांच्या कारकिर्दीत कामगारांच्या लाभाच्या खूप योजना राबवल्या आणि त्याचा महापालिका कर्मचाऱ्यांना फायदा करून दिला. (PMC Pune Marathi news)

 – कोरोना सुरक्षा कवच देणारी पहिली महानगरपालिका

 महानगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच योजना लागू केली होती. महानगरपालिकेत कामगार कल्याण निधी यापूर्वीच लागू करण्यात आला आहे.  ही मदतया निधी अंतर्गत दिली जाते. महापालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार, या योजनेचे लाभार्थी असे सर्व लोक, महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी असतील ज्यांना कोरोनाचे काम देण्यात आले होते. कारण आरोग्य विभाग वगळता सर्व विभागांचे कर्मचारी आणि अधिकारी या कामावर पालिका प्रशासनाने गुंतले होते.  या अंतर्गत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना 50 लाखाची आर्थिक मदतदिली जाते. तसेच वारसाला नोकरी दिली जाते     या व्यतिरिक्त, आता अनेक योजना लागू करण्यात आल्या आहेत.  95 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  यानुसार महापालिकेने केंद्राच्या विमा कंपनीला सुमारे प्रस्ताव पाठवले होते.  ही प्रक्रिया द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी करणार आहे.  पण कंपनीने नियमानुसार पुढे जाऊन त्याला मान्यता दिली नाही.  सफाई कामगारांना नुकसानभरपाई देता येणार नाही, असे कंपनीकडून सांगण्यात येत होते.  कंपनीने आता आपला चेंडू केंद्राच्या कोर्टात टाकला होता.  त्याची मदत मिळत नव्हती.  दुसरीकडे, महापालिका सुरक्षा कवच लागू करण्यास सक्षम नव्हती.  अशा स्थितीत महापालिकेने केंद्राचा मार्ग सोडून आपला वाटा देणे सुरू केले.  शिवाय विमाकंपनी आणि शासनाच्या आरोग्य विभागाकडून महापालिका प्रशासनाचा सतत पाठपुरावा सुरू होता.  पैकी काही प्रस्ताव मंजूर झाले.  केंद्राकडून 3 कुटुंबांच्या खात्यांमध्ये 50 लाखांची रक्कम जमा करण्यात आली आहे. त्यांनतर महापालिकेने महापालिकेने आपल्या सुरक्षा कवच योजनेत बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरसकट 50 लाखाचे अर्थसहाय्य केले जात आहे. शिवाय वारसांना नोकरी देखील दिली जात आहे. एकूण 95 कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोना मुळे झाला आहे. यामध्ये पोस्ट कोविडचा देखील समावेश आहे. 95 पैकी 10 कर्मचारी ठेका कर्मचारी तर 1 बालवाडी शिक्षिका होती. त्यानुसार आपल्या योजनेत 84 पात्र झाले. त्यापैकी 60 लोकांना महापालिकेने 50 लाखाची मदत त्यांच्या वारसांना दिली आहे. 3 लोकांना केंद्र सरकारचे 50 आणि महापालिकेचे 25 अशी 75 लाखाची मदत मिळाली आहे.  महापालिकेने आतापर्यंत 57 वारसांना नोकरी देखील दिली आहे. तसेच 40 कोटींची मदत देण्यात आली आहे. हे सर्व करण्यात मुख्य कामगार अधिकारी म्हणून शिवाजी दौंडकर यांनी पुढाकार घेत कर्मचाऱ्यांना अर्थसहाय्य आणि वारसांना नोकऱ्या मिळवून दिल्या.

182 कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्कार

महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना (PMC Pune employees and officers) प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महापालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने गुणवंत कामगार पुरस्कार दिला जातो. दरवर्षी  वर्ग 1 ते वर्ग 4 मधील 20 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. 25 हजार रुपये, प्रशस्तीपत्र आणि ट्रॉफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याची सुरुवात 2007-08 साली झाली. शिवाजी दौंडकर यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अवगत करून प्रोत्साहन दिले. आतापर्यंत 182 कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर जवळपास 41 लाखांची रक्कम कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे.

समूह अपघात विमा योजनेचा देखील चांगला फायदा

शिवाजी दौंडकर यांच्या कार्यकाळात सुरु झालेली अशीच एक योजना म्हणजे समूह अपघात विमा योजना. महापालिकेचे अनेक कर्मचारी अपघातांना बळी पडून कायमचे अपंग होतात.  हे लोक आयुष्यात काम करू शकत नाहीत.  तसेच अनेक लोकांचा मृत्यू होतो.  त्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो.  त्यामुळे अपघातात बळी पडणाऱ्या अशा पालिका कर्मचाऱ्यांना महापालिका विमा संरक्षण देत आहे.  पालिकेच्या सर्व कामगारांना आता सुमारे 10 लाखांचा विमा उतरवण्यात येत आहे.  त्या बदल्यात त्यांना त्यांच्या पगारातून केवळ 136 रुपये दरमहा द्यावे लागतात.  महापालिका प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.  आतापर्यंत सुमारे 18 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.  त्यांना महापालिकेने 1 कोटी 74 लाख रुपये दिले आहेत. दौंडकर यांच्या पुढाकाराने ही योजना चांगल्या पद्धतीने कार्यान्वित आहे.
याच पद्धतीने अजूनही बऱ्याच योजना कामगार कल्याण विभागात सुरु आहेत. ज्याचा महापालिका कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी शिवाजी दौंडकर यांनी प्रयत्न केले. यामध्ये कामगार कल्याण निधी आणि मनपा निधी मधून वारस अनुदान दिले जाते. आतापर्यंत 1536 लोकांना या योजनेचा फायदा झाला. जवळपास 10 कोटीची रक्कम यासाठी देण्यात आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. आतापर्यंत 24 कर्मचाऱ्यांना भरपाई देण्यात आली आहे. यासाठी 85 लाखाची रक्कम देण्यात आली आहे. तसेच दौंडकर यांनी वार्षिक क्रीडा स्पर्धा, कामगार दिंडी, शैक्षणिक कर्ज शिष्यवृत्ती आणि गुणगौरव समारंभ अशा योजना देखील चांगल्या पद्धतीने राबवल्या.

शिवाजी दौंडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात 8578 पेन्शन प्रकरणे निकाली काढली. तसेच इंडेम्निटी बॉण्ड चा 1862 लाभार्थ्यांना लाभ दिला. ध्वजदिन निधी संकलनाचे काम देखील चांगल्या पद्धतीने पार पाडले. या माध्यमातून 2 कोटीहून अधिक निधी संकलित केला गेला. जवळपास 731 कर्मचाऱ्यांना कामगार प्रशिक्षण दिले. खातेनिहाय चौकशीची 155 प्रकरणे निकाली काढली. कामगार न्यायालयातील विविध दाव्यांपैकी 356 दावे निकाली काढण्यात आले. त्याचप्रमाणे घाणभत्ता आणि अनुकंपा योजनाचाही फायदा देण्यात आला. यामध्ये घाणभत्ता ची 3729 तर अनुकंपा ची 351 प्रकरणाचा समावेश आहे. या सर्व गोष्टीसाठी दौंडकर यांना कामगार कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची चांगली मदत झाली, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
—-
पुणे महापालिकेत मी 1988 साली रुजू झालो. सर्वात प्रथम मी गवनि विभागात स्टेनो म्हणून काम केले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त कार्यालयात स्वीय सहायक म्हणून 11 वर्ष काम केले. त्यानंतर महापालिका आयुक्त यांचे स्वीय सहायक म्हणून 2 वर्ष काम केले. 2003 साली कामगार कल्याण अधिकारी झालो. 2010 साली मुख्य कामगार अधिकारी झालो. याशिवाय महापालिकेत बऱ्याच ठिकाणी आणि खात्यात काम केले. यामध्ये सेवक वर्ग, प्राथमिक माध्यमिक, नगरसचिव विभाग अशा खात्यांचा समावेश आहे. माझ्या कार्यकाळात मी खूप कल्याणकारी योजना राबवल्या. कोरोना काळात चांगले काम केले. कर्मचाऱ्यांच्या वारसांना घरी जाऊन चेक दिले. तसेच कोरोना काळात Online आणि offline सर्वसाधारण सभा घेताना तारेवरची कसरत होती. असे असताना चांगले काम केले. नगरसेवक किंवा प्रशासनाची तक्रार येऊ दिली नाही. तसेच निवडणूक विभागात देखील काम केले.  महापालिकेच्या कामात चांगले योगदान देता आले म्हणून मी खूप समाधानी आहे. सर्वसाधारण कामगारांचे प्रश्न सोडवता आले, ही भावना सुखद आहे.  भविष्यकाळात मला माझ्या कामाचा आणि ज्ञानाचा महापालिका आणि महापालिका कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात मला आनंद वाटेल.
शिवाजी दौंडकर, सेवानिवृत्त महापालिका अधिकारी. 
—-
News Title | Pune Municipal Corporation | Many employees benefited from the efforts of Shivaji Daundkar in the welfare schemes of Pune Municipal Corporation