Amit Shah : Pune : अमित शाह यांचा कॉंग्रेस वर निशाणा ; म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची काँग्रेसने एकही संधी सोडली नाही

Categories
Breaking News Political देश/विदेश पुणे महाराष्ट्र
Spread the love

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची काँग्रेसने एकही संधी सोडली नाही

: अमित शाह यांचा कॉंग्रेस वर निशाणा

पुणे : पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि इमारतीसमोरील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा याचे भूमिपूजन गृहमंत्री शाह यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी पुणे महापालिकेत बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आपमान करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नसल्याची टीका अमित शाह यांनी काँग्रेसवर केली आहे.

शाह म्हणाले,  भारतरत्न पुरस्कार त्यांना कॉग्रेस सरकार नसताना आणि भाजपच्या काळात मिळाला. संविधान दिवस जेव्हा केला त्यावेळीही काँग्रेसने  विरोध केला आहे. पण मोदी संविधानाला ग्रंथ मानून सरकार चालवत आहेत. पुण्याच्या विकासाची अनेक कामे मोदी सरकारने केली. विमानतळ वाढवणे, मेट्रो ज्याचे तीन मार्ग केले, लवकरचं पुण्याला मेट्रो प्रवास सुरू होईल, बस दिल्या, मुळा मुठा नदी सर्वधन साठी निधी दिला, स्टार्टअपला प्रोत्साहन दिलं, पुण्याच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे आम्ही कुठही कमी पडणार नाही असा विश्वास शाह यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा तरुणांना प्रेरणा देत राहील

ज्यावेळेस स्वराज्य आणि स्वधर्म हे शब्द उच्चारणे अवघड होते. तेव्हा शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. न्याय, समाजकल्याण,  आत्मरक्षा, आणि पहिले नौदल उभारण्याचे काम शिवाजी महाराजांनी केले. स्वराज्य कार्य शिवाजीमहाराजांच्या नंतरही त्यांच्या प्रेरणेने सुरु राहिले. पुणे महापालिकेतील छत्रपति शिवाजी महाराजांचा पुतळा तरुणांना प्रेरणा देत राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

 दगडुशेठ गणपती कडे केली प्रार्थना  

पुण्यातील प्रसिद्ध गणपती आणि आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. सहकार मंत्री झाल्यापासून शहा यांचा हा पहिलाच महाराष्ट्रातील दौरा आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे महाराष्ट्राचे विशेष लक्ष लागले आहे. शहा यांनी आज पुणे येथे आज श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आरती केली. ”महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देश देखील कोरोनामुक्त होवो…आत्मनिर्भर भारताचे आपले ध्येय लवकर पूर्ण होवो आणि अयोध्येतील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो… असे मागणे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी दगडूशेठ गणपतीसमोर मागितले. गणरायाला महाअभिषेक करताना अमित शहा यांनी सुजलाम् सुफलाम् भारतासाठी देखील प्रार्थना केली.”  

Leave a Reply