Beware Of Brokers | भरतीच्या नावाखाली पैसे घेण्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस! | महापालिकेकडून पुन्हा एकदा आवाहन

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

भरतीच्या नावाखाली पैसे घेण्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस!

| सुरक्षा रक्षकांनी वेळीच अडवले

पुणे | भरतीच्या नावाखाली आणि नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळण्याचा प्रकार महापालिकेत उघडकीस आला. महापालिकेतील सुरक्षा रक्षकांनी वेळीच याकडे लक्ष दिल्यामुळे ही गोष्ट उजेडात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि पुणे जिल्ह्यातील बारामती तसेच इतर काही नगरपरिषद मध्ये नोकरी लावून देण्याचे बहाण्याने एक युवक दुसऱ्या काही विद्यार्थ्यांकडून पैसे घेत होता. विशेष म्हणजे संबंधित इसमाने पैसे घेण्यासाठी महापालिका हे स्थळ निवडले होते. मात्र पैसे घेत असताना महापालिकेतील सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले आणि ताब्यात घेतले. त्यांना त्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्त त्यांच्याकडे नेण्यात आले आणि सख्त ताकीद देण्यात आली.

| महापालिकेकडून पुन्हा एकदा आवाहन

पुणे महापालिकेत एकूण 448 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट-२ व गट ३ मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र याबाबत काही दलाल किंवा अपरिचित व्यक्ती अफवा पसरवून आर्थिक देवाण घेवाण करत राहतात. त्यामुळे अशा दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणे महानगरपालिका कर्मचारी भरतीबाबत अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही मध्यस्थ / दलाल / परिचित/ अपरिचित व्यक्तीशी पदभरतीबाबत आर्थिक व्यवहार अथवा इतर तत्सम स्वरुपाची देवाण-घेवाण करू नये, अशा व्यक्तींकडून नागरिकांची/उमेदवारांची दिशाभूल व फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्या स्वरुपाची फसवणूक झाल्यास त्यास पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, याची सर्व नागरिकांनी/उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे जाहीर आवाहन महापालिकेने केले आहे.