Sunil Tingare : Vadgaonsheri works : पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्याची समस्या लवकरच सुटणार : आमदार सुनील टिंगरे

Categories
PMC Political पुणे
Spread the love

पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्याची समस्या लवकरच सुटणार : आमदार सुनील टिंगरे

मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत आमदारांनी रस्त्याची पाहणी केली

एयर फोर्स परिसरातून ड्रेनेज लाइन टाकण्यास एयर फोर्सची परवानगी

पुणे : रहदारीसाठी अतिशत व्यस्त झालेल्या धानोरी-लोहगांव परिसरातील पोरवाल रस्त्यासाठी पर्यायी रस्त्याची अत्यंत आवश्यकता आहे. या पर्यायी रस्त्याचे रखडलेले काम लवकर पुर्ण होण्यासाठी तसेच या कामातील अडथळे लवकर दूर करण्यासाठी मनपा आयुक्त विक्रम कुमार तसेच इतर अधिकार्‍यांनी मंगलवारी सकाळी या भागाची पाहणी केली. वडगावशेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्या मागणीनुसार या दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या भागातील अडचणींची माहिती सुनील टिंगरे यांनी मनपा आयुक्तांना दिली. समस्या सुटण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पोरवाल रस्त्याच्या पर्यायी रस्त्याची समस्या लवकरच सुटणार असल्याची माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.

पोरवाल रस्ता परिसरात अनेक मोठ्या सोसायट्यांची बांधकामे पूर्ण झालेली आहेत. या भागात मोठ्या संख्येने लोक राहत आहेत. अशावेळी पोरवाल रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने या भागात सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणावर टै्रफिक समस्येचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या संदर्भात आमदार सुनील टिंगरे यांनी मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना पर्यायी रस्त्याची अडचण सोडविण्याची मागणी लावून धरली होती. यानुसार विक्रम कुमार यांनी मंगलवारी या परिसरामध्ये येऊन प्रत्यक्ष स्थितीची माहिती घेतली. यावेळी रस्ते विभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त सुहास जगताप, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त वैभव कडलख, एल.आर.डब्ल्यू.ए चे सभासद, या भागातील नागरिक, अशोक खांदवे, नवनाथ मोझे, राजेश साठे यावेळी उपस्थित होते. पोरवाल रस्त्याला पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. त्याचे काम अपूर्ण आहे, या रस्ता पूर्ण करण्यासाठी नियम २०५ च्या अंतर्गत नवा रस्ता दाखवून भू-संपादन करण्याची गरज आहे. हे कार्य लवकरात लवकर करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. पर्यायी रस्ता लवकरण पूर्ण करण्यासाठी इतर कामे गतीने करण्यात येणार आहेत. पोरवाल रस्ता परिसरातील नागरिकांना पानी मिळत नाही. याबाबत सुनील टिंगरे यांनी सांगितले की ऊंचीची समस्या असल्याने या भागात ऑटोमॅटिक बूस्टर लावण्यात यावे, जेणे करून या परिसरातील नागरिकांना योग्य दाबाने पुरेसा पाणी पुरवठा करणे शक्य होईल. याबाबत मनपा आयुक्तांनी लगेच त्यावर अंमल करण्याचा आदेश दिया.

लोहगाव या भागातील मनपामध्ये समावेश झालेल्या परिसरातील ड्रेनेज समस्या सोडविण्यासाठी एयरफोर्स परिसरातून ड्रेनेज लाइन टाकणे आवश्यक आहे. याबाबत एयरफोर्सची परवानगी आवश्यक आहे. याबाबत एयरफोर्स ग्रुप कॅप्टन व चीफ एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर संजय पिसे, विंग कमांडर पी. सजिनी यांच्यासोबत आमदार सुनील टिंगरे, मनपा आयुक्त विक्रम कुमार व मनपाचे अधिकारी ड्रेनेज विभागाचे प्रमुख जगदीश खानोरे, कार्यकारी अभियंता येवलेकर, उप अभियंता सुशील तायडे  यांची एयरफोर्समध्ये बैठक झाली. या बैठकीत ड्रेनेज लाइन टाकण्यासाठी चर्चा करण्यात आली. या कामाकरिता एयरफोर्सने लेखी परवानगी देखील दिली. त्यामुळे हे कार्य लवकरच सुरू होईल. जेणेकरून नागरिकांची डे्रनेजची समस्या देखील सुटणार आहे.

राजीव गांधी हॉस्पिटल लवकरच सुरू होणार

येरवडा येथील राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल सुरू होत आहे. या कामाची पाहणी देखील यावेळी आमदार सुनील टिंगरे व मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी केली. याबाबत सुनील टिंगरे यांनी सांगितले कि हॉस्पिटलमधील कामे झालेली आहेत. काही कामे बाकी आहेत ती लवकरच पूर्ण केली जातील. ऑक्सीजन प्लांट संदर्भात देखील चर्चा करण्यात आली आहे. येथील स्थानीक नगरसेवकांसोबत अधिकार्‍यांची बैठक पुढील मंगलवारी आयोजित करण्यात आली आहे. सर्व अडचणी दूर करून हे हॉस्पिटल लवकरच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे.
पुणे महानगरपालिका परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा गलांडे, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. माया लोहार, राजीव गांधी बालरोग तज्ज्ञ डाॅ. स्वाती पाटील, वैद्यकीय अधिकारी डाॅ. शुभांगी लोकरे, येरवडा क्षेत्रिय कार्यालयाचे सह आयुक्त वैभव कडलख, नगरसेवक संजय भोसले, नगरसेविका अश्विनी लांडगे, डाॅनीयल लांडगे उपस्थित होते.

Leave a Reply