Biometric attendance | बायोमेट्रिक हजेरी महापालिका कर्मचाऱ्यांची ठरतेय डोकेदुखी! | रोज सर्वर डाऊन, नेटवर्क नसल्याने कर्मचारी त्रस्त

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

बायोमेट्रिक हजेरी महापालिका कर्मचाऱ्यांची ठरतेय डोकेदुखी!

| रोज सर्वर डाऊन, नेटवर्क नसल्याने कर्मचारी त्रस्त

पुणे | महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) कार्यालयीन शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने (Civic officials) बायोमेट्रिक हजेरी (Biometric attendence) अनिवार्य केली आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना स्मार्ट ओळखपत्र (Smart identity card) देखील देण्यात आले आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना सुरुवातीला यासाठी रांगा लावाव्या लागत होत्या. तर आता रोज रोज सर्वर डाऊन (Server Down), नेटवर्क नसल्याने (Network Problem) कर्मचारी त्रस्त झाले आहेत. कर्मचाऱ्यांना शिस्त लावताना  प्रशासन मात्र सुस्त असयाचे समोर येत आहे.

Aadhar Enable Bio-Metric Attendance System” ची प्रणाली पुणे महानगरपालिकेमध्ये सूरू करण्यात आलेली आहे. आदेशान्वये संबंधित खातेप्रमुख यांनी आपल्या विभागातील सर्व अधिकारी / सेवक यांचे “Aadhar Enable Bio-Metric Attendance System” च्या बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन झाले आहे किंवा नाही याबाबतची खातरजमा करून यासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रा प्रमाणे प्रमाणित करून खातेप्रमुख यांचे स्वाक्षरीने प्रमाणपत्र देण्याबाबत संदर्भ निर्देश देण्यात आले होते. अद्यापही काही अधिकारी / सेवकांचे बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन झाले नसल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रमाणपत्र सादर करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुषंगाने संबंधित खातेप्रमुख / विभागप्रमुख यांनी सदर प्रमाण पत्र सादर केल्याचे दिसून येत नाही.

त्यानुषंगाने सादर खातेप्रमुख / विभागप्रमुख यांना आदेशित करण्यात येते की आपले विभागातील / क्षेत्रिय कार्यालयातील सर्व अधिकारी / सेवकांचे बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये रजिस्ट्रेशन पूर्ण करून २०/१२/२०२२ पर्यंत बायोमेट्रिक हजेरी प्रणालीत पूर्ण क्षमतेने चालू करावयाचे आहे. ज्या अधिकारी/सेवकांची बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये हजेरी लावली जाणार नाही त्या अधिकारी/सेवक यांचेमहिने महाचे वेतन अदा करण्यात येणार नाही. असा इशारा देण्यात आला आहे. (Pune Municipal corporation)

त्यामुळे महापालिका कर्मचारी बायोमेट्रिक हजेरीबाबत गंभीर आहेत. कर्मचारी लवकर येऊन हजेरी लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र महानगरपालिका कामगार युनियन (मान्यता प्राप्त )च्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाला जाग येत नाहीये. रोज सर्वर डाऊन, नेटवर्क प्रॉब्लेम आणि कामगारांची रांग वाढत चालली. तरी देखील प्रशासन अजून कुठेही थंब मशीन वाढवल्या नाहीत, कामगार वेळेवर कामावर पोहचू शकत नाहीत थंब होत नसल्याकारणाने कामगारांमध्ये खूप असंतोष आणि खाडे लागेल म्हणून भीती निर्माण होत आहे. काही कर्मचारी शुक्रवारी सकाळी 9:30 वाजल्यापासून थंब करत होते; परंतु 10वाजले तरी थंब झाले नाही. यामुळे कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. (PMC Pune)