PMC Property tax Department | मिळकतकर विभागाने पार केला 1800 कोटींचा टप्पा | मागील वर्षीपेक्षा 300 कोटी अधिक उत्पन्न

Categories
Uncategorized
Spread the love

PMC Property tax Department | मिळकतकर विभागाने पार केला 1800 कोटींचा टप्पा | मागील वर्षीपेक्षा 300 कोटी अधिक उत्पन्न

PMC Property Tax Department | पुणे | पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने (PMC Pune Property tax Department) वसुलीवर चांगला भर दिला आहे. गेल्या 8-9 महिन्यात म्हणजे 1 एप्रिल पासून विभागाला 1815 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत विभागाला 1516 कोटी मिळाले होते. म्हणजेच 300 कोटीने अधिक उत्पन्न मिळाले आहे. आगामी 2-3 महिन्यात अजून 400-500 कोटी उत्पन्न मिळेल, असा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे. (Pune Municipal Corporation)
विभागाच्या माहितीनुसार 1 जानेवारी 2024 रोजी कोटी 78 लाख इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर मागील वर्षी याच दिवशी 47 लाख 4 हजार इतके उत्पन्न मिळाले होते. मिळकतकर विभागाने वसुलीवर चांगला जोर दिला आहे. त्यामुळे 1 एप्रिल पासून आजपर्यंत 10 लाख 22 हजार 938 लोकांनी 1815 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स जमा केला आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत चांगली भर पडली आहे. (PMC Pune News)
उपायुक्त अजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मिळकतकर विभागाने मोहीम आखत वसुली केली आहे. त्यामुळे विभागाने 1800 कोटींचा टप्पा पार केला आहे. आगामी कालावधीत वसुली मोहीम अजून चांगल्या पद्धतीने राबवण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
1-04-2023 पासून अशा पद्धतीने मिळाले उत्पन्न
1. CASH – 322451(32%)-212.97 Cr (12%)
2. CHEQUE – 112594(11%)-599.37 Cr (33%)
3. ONLINE – 587893(57%)-1002.43 Cr (55%)
Total amount – 1022938 – 1815.21 Cr”