PMC Property tax Department | मिळकतकर विभागाने पार केला 1800 कोटींचा टप्पा | मागील वर्षीपेक्षा 300 कोटी अधिक उत्पन्न

Categories
Uncategorized

PMC Property tax Department | मिळकतकर विभागाने पार केला 1800 कोटींचा टप्पा | मागील वर्षीपेक्षा 300 कोटी अधिक उत्पन्न

PMC Property Tax Department | पुणे | पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाने (PMC Pune Property tax Department) वसुलीवर चांगला भर दिला आहे. गेल्या 8-9 महिन्यात म्हणजे 1 एप्रिल पासून विभागाला 1815 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षी याच कालावधीत विभागाला 1516 कोटी मिळाले होते. म्हणजेच 300 कोटीने अधिक उत्पन्न मिळाले आहे. आगामी 2-3 महिन्यात अजून 400-500 कोटी उत्पन्न मिळेल, असा अंदाज विभागाने व्यक्त केला आहे. (Pune Municipal Corporation)
विभागाच्या माहितीनुसार 1 जानेवारी 2024 रोजी कोटी 78 लाख इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. तर मागील वर्षी याच दिवशी 47 लाख 4 हजार इतके उत्पन्न मिळाले होते. मिळकतकर विभागाने वसुलीवर चांगला जोर दिला आहे. त्यामुळे 1 एप्रिल पासून आजपर्यंत 10 लाख 22 हजार 938 लोकांनी 1815 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स जमा केला आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत चांगली भर पडली आहे. (PMC Pune News)
उपायुक्त अजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली मिळकतकर विभागाने मोहीम आखत वसुली केली आहे. त्यामुळे विभागाने 1800 कोटींचा टप्पा पार केला आहे. आगामी कालावधीत वसुली मोहीम अजून चांगल्या पद्धतीने राबवण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.
1-04-2023 पासून अशा पद्धतीने मिळाले उत्पन्न
1. CASH – 322451(32%)-212.97 Cr (12%)
2. CHEQUE – 112594(11%)-599.37 Cr (33%)
3. ONLINE – 587893(57%)-1002.43 Cr (55%)
Total amount – 1022938 – 1815.21 Cr”

Nanded City Property tax PMC | नांदेड सिटी टाऊनशिप मधील लोकांना कर भरावा लागणार | महापालिकेकडून कर आकारणी सुरु | 30 जानेवारी पर्यंत PT3 अर्ज भरून देण्यासाठी मुदत

Categories
Breaking News Commerce PMC social पुणे

Nanded City Property tax PMC | नांदेड सिटी टाऊनशिप मधील लोकांना कर भरावा लागणार | महापालिकेकडून कर आकारणी सुरु

| 30 जानेवारी पर्यंत PT3 अर्ज भरून देण्यासाठी मुदत

Nanded City  Property Tax PMC | पुणे महापालिकेमध्ये (Pune Municipal Corporation) समाविष्ट झालेल्या २३ गावांना (Including 23 Villages) मिळकत कराच्या नोटीस (Property tax bills) पाठविण्यास मिळकत कर विभागाने सुरूवात केली आहे. या गावांसोबत महापालिकेच्या हद्दीत आलेल्या नांदेड सिटी प्रकल्पालाही महापालिकेने कर आकारणी केली आहे. येथील लोकांचा कर भरण्याबाबत महापालिकेने प्रक्रिया सुरु केली आहे. कायद्यानुसार नागरिकांना कर भरावा लागणार, हे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या टाउनशिप कायद्यानुसार (Townships Laws) उभारण्यात आलेल्या नांदेड सिटीला करारानुसार करामध्ये ६६ टक्के सवलत देण्यात आली आहे. यासोबतच निवासी मिळकतींमध्ये स्वत: मिळकतधारक राहत  असल्यास उर्वरीत करावर पुन्हा ४० टक्के सवलत देण्यात येणार आहे. यासाठी येथील नागरिकांना येत्या ३० जानेवारीपर्यंत पीटी ३ फॉर्म (PT 3 Application) भरून द्यावा लागणार असल्याची माहिती कर आकारणी व कर संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख (Ajit Deshmukh PMC) यांनी दिली. (Nanded City Pune Property Tax PMC)

कर आकारणी विभागाने (PMC Property tax Department) महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांना मिळकत कराची बिले (Property tax bills) पाठविण्यास सुरूवात केली आहे. नांदेड सिटी देखिल यापैकी नांदेड गावाचा भाग असल्याने तेथील नागरिकांना बिले पाठविण्यात आली आहेत. या टाउनशिपमध्ये सुमारे १२ हजार सदनिका आणि व्यावसायीक दुकाने, कार्यालये आहेत. टाउनशिप असल्याने येथे थेट पाटबंधारे विभागाकडून पाणी उचलण्यात येते. त्यावर प्रक्रिया करून नागरिकांना पैसे आकारून पाणी पुरवठा केला जातो. तसेच स्वच्छता, पथदिवे, व इतर सुविधा देखिल टाउनशिप कडून पुरविण्यात येतात. यासाठी टाउनशिपने मिळकतधारकांकडून एकरकमी मेन्टेनन्स घेतला आहे. यामुळे महापालिकेचा कर लागणार नाही, अशी धारणा येथील नागरिकांची होती. त्यामुळे महापालिकेकडून कराची बिले हाती पडताच नागरिकांकडुन संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. (Nanded City PMC Property Tax)

दरम्यान, राज्याचा सुधारित टाऊनशिप कायदा २०१९ मध्ये लागू झाला. यानुसार नगररचना करण्याचे अधिकार असलेल्या (टाऊन प्लॅनिंंग अथॉरिटी) संस्थांच्या हद्दीत टाऊनशिपचा समावेश झाल्यास त्यांना मिळकतकर आकारण्याचा अधिकार संबंधित संस्थांना आहे. त्यानुसार नांदेड गाव महापालिकेत विलीन झाल्यानंतर नांदेड सिटीही महापालिकेत समाविष्ट झाली आहे. परिणामी, नांदेड सिटीमधील रहिवाशांनाही मिळकतकर लागू झाला आहे. ही बाब नांदेड सिटीमधील सदनिका खरेदी करतानाच्या करारनाम्यातही (ऍग्रिमेंट) नमूद आहे, असे टाउनशिपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सतिश मगर यांनी स्पष्ट केले आहे.

कर आकारणी प्रमुख अजित देशमुख यांनी सांगितले, की पंचायतीला नगरनियोजनाचा अधिकार नसल्याने  नांदेड ग्रामपंचायतीने नांदेड सिटीला मिळकतकर आकारला नव्हता. जून २०२१ नंतर नांदेड सिटी महापालिकेत  विलीन झाल्याने तेव्हापासून महापालिकेचा मिळकतकर लागू झाला.  सध्या ६६ टक्के सवलतीसह आलेल्या देयकांमध्ये २०२१ पासूनची कर मागणी असल्याने ही रक्कम थोडी मोठी वाटते.  पुढील वर्षीपासून नियमित देयके येतील. येथील निवासी मिळकतींना उर्वरीत ३४ टक्के करावर ४० टक्के सवलतही
मिळणार आहे. परंतू मालक स्वत: त्या मिळकतीमध्ये राहात असल्याबाबत दोन पुराव्यांसह पी टी ३ फॉर्म येत्या ३० जानेवारीपर्यंत भरून महापालिकेकडे द्यावा लागणार आहे. ३० जानेवारीनंतर हा फॉर्म भरून देणार्‍यांना ४० टक्के सवलत मिळणार नाही.

——

Ajit Deshmukh PMC | उपायुक्त अजित देशमुख यांना एक वर्षाची मुदतवाढ!

Categories
Breaking News PMC पुणे

Ajit Deshmukh PMC | उपायुक्त अजित देशमुख यांना एक वर्षाची मुदतवाढ!

| राज्य सरकारकडून आदेश जारी

Ajit Deshmukh PMC | पुणे | पुणे महापालिकेचे कर आकारणी आणि कर संकलन विभाग प्रमुख (PMC Property Tax Department) तथा उपायुक्त अजित देशमुख (Deputy Commissioner Ajit Deshmukh) यांना पुणे महापालिकेत (PMC Pune) अजून एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. देशमुख यांचा कार्यकाळ आज समाप्त होत होता. मुदतवाढीचा आदेश राज्य सरकारकडून काल संध्याकाळीच जारी करण्यात आला आहे. (Ajit Deshmukh PMC Pune)
अजित देशमुख हे प्रतिनियुक्ती वर पुणे महापालिकेत आले आहेत. 15 डिसेंबर 2020 ला देशमुख हे पुणे महापालिकेत रुजू झाले होते. आज त्यांना पुणे महापालिकेत 3 वर्ष पूर्ण होत आहेत. महापालिकेत काम करण्यासाठी त्यांनी सरकारकडे कालावधी वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सरकारने त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. (Pune Municipal Corporation)
देशमुख यांनी याआधी घनकचरा व्यवस्थापन विभागात काम केले आहे. त्यांची कामाचे चांगले कौतुक झाले होते. कारण घनकचरा विभागात त्यांनी घनकचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले होते. तसेच वेगवेगळे प्रकल्प देखील यशस्वी करून दाखवले. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांना मिळकत कर विभागाची जबाबदारी दिली. तिथेही त्यांनी चांगले काम करून दाखवत महापालिकेला चांगले उत्पन्न मिळवून दिले. पुणेकरांना पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) केवळ निवासी मिळकतींना (Residential property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत (40% Discount) कायम करण्यात आली आहे. हे देशमुख यांच्याच प्रयत्नाने साध्य झाले आहे. या आर्थिक वर्षात महापालिकेने 1700 कोटी उत्पन्न मिळवले आहे. वर्षअखेर 2400 कोटीपर्यंत उत्पन्न मिळेल, असा विश्वास देशमुख यांना आहे. तसेच त्यांनी काही काळ मालमत्ता व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देखील सांभाळली आहे. राज्य सरकारकडून त्यांना मुदतवाढ देण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. (PMC Pune News)