Transfer | Rajendra muthe | उपायुक्त राजेंद्र मुठे यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बदली! | राज्य सरकारकडून आदेश जारी

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

उपायुक्त राजेंद्र मुठे यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बदली!

| राज्य सरकारकडून आदेश जारी

पुणे | महापालिका सेवेत प्रतिनियुक्ती वर आलेले उपायुक्त राजेंद्र मुठे यांची राज्य सरकार कडून बदली करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात करमणूक विभागात उपायुक्त या पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले आहे. महापालिकेच्या मालमत्ता आणि व्यवस्थापन विभागात काम करत असताना मुठे यांनी पालिकेच्या हिताचे खूप निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचे खूप कौतुक देखील होत आहे.
महापालिकेत येण्या अगोदर मुठे हे अपर जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांना प्रतिनियुक्ती देण्यात आली होती. पालिकेतील त्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यात आली आहे. मुठे यांनी महापालिकेत काम करताना पालिकेच्या हिताचे खूप चांगले निर्णय घेतले आहेत. शहरात महापालिकेच्या हजारो मिळकती आहेत. मात्र मिळकतीची सुरक्षा होत नसल्याकारणाने कुणीही याचा वापर करत असे. याकडे महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागात काम करत असताना राजेंद्र मुठे यांनी गंभीरपणे लक्ष दिले. मिळकतीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विभागाने मिळकतीचे पॉलीगॉन मॅपिंग सुरु केले आहे. आज अखेर एकूण 3267 मिळकतीचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.
महापालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी मालमत्ता व व्यवस्थापन विभागाची जबाबदारी आहे. त्यामुळे विभागातील सर्व दस्तांचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. हे करण्यासाठी विभागातील सर्व दस्तांचे स्कॅनिंग करण्याचा निर्णय मुठे यांनी घेतला.
पुणे महापालिकेच्या 3912 मिळकती आहेत. पुढील काळात यामध्ये अजून वाढ होऊ शकते.  विविध विभागाच्या ताब्यात या मिळकती आहेत. या मिळकतीच्या 7/12 वर महापालिकेचे नाव देखील लावण्यात आले आहे. अशा सर्व मिळकतीचे एकूण मूल्यांकन 34 हजार 886 कोटी होत आहे. ज्याचा उपयोग महापालिकेच्या पत मूल्यांकनासाठी होणार आहे. याबाबत ही मुठे यांनी पुढाकार घेतला होता. महापालिकेसाठी हा खूप महत्वाचा निर्णय आहे. दरम्यान हे सर्व करण्यासाठी खात्यातील सर्व कर्मचाऱ्यांची मुठे यांना चांगली मदत झाली.
आता मुठे यांची राज्य सरकार कडून बदली करण्यात आली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात करमणूक विभागात उपायुक्त या पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले आहे.
| नियुक्ती आदेश