PMC Teachers Agitation | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांचे पुणे महापालिकेसमोर आमरण उपोषण

Categories
Breaking News Education PMC पुणे
Spread the love

PMC Teachers Agitation | रजा मुदतीतील शिक्षण सेवकांचे पुणे महापालिकेसमोर आमरण उपोषण 

PMC Teachers Agitation | पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागात (PMC Education Department) काम करणाऱ्या रजा मुदतीतील ९3 शिक्षण सेवकांना नियमित वेतनश्रेणी २०१७ (एप्रिल) पासून लागू करावी. असा उच्च न्यायालयाने (High. Court) आदेश दिला आहे. या उच्च न्यायालयाच्या आदेशावर महापालिकेने अमल करावा. या मागणीसाठी सर्व शिक्षण सेवक महापालिका भवनासमोर आमरण उपोषणास (Agitation) बसले आहेत.  (PMC Teachers Agitation) 

शिक्षण सेवकांना कायम करण्याबाबतचा आदेश २४ फेब्रुवारीस महापालिका प्रशासनास प्राप्त झाला. मात्र आज  ४ महिने होऊनही उच्चन्यायालयाच्या आदेशास केराची टोपली दाखवून प्रशासन आम्हास झुलवत आहे. असा आरोप आंदोलनकर्त्या शिक्षण सेवकांनी केला. सन 2009 पासून ९3 रजा मुदत शिक्षक इमाने इतबारे केवळ ६०००/- रू च्या एकवट मानधनावर काम करीत आहेत. विदयेच्या माहेरघरात आज शिक्षकांची अतिशय दयनीय अवस्था आहे. प्रशासनासला केव्हा  जाग येणार? असा प्रश्न देखील या आंदोलनकर्त्यांनी विचारला आहे. (Pune Municipal Corporation) 

93 कुटूंबांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या आणि अजूनही करीत आहोत. आज १४ वर्षातील एकही दिवस आम्हांला सुख समाधानाचा, गेला नाही. आमची कुटुंबाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. अतिशय तुटपुंत्र्या मानधनात अक्खे कुटुंब, मुलांच पालन पोषण, शिक्षण अशा अनेक जबाबदाऱ्या आम्हाला पार पाडाव्या लागत आहेत. आम्हा शिक्षकांना न्याय कधी मिळणार?याच प्रतिक्षेत आम्ही सर्वजण आहोत.  कमी पगारातही आमच्या सर्व शिक्षकांनी कामात कोणतीही दिरंगाई केली नाही. शिष्यवृत्ती परिक्षा, मंथन, NMMS परिक्षेत आमची मुले घवघवीत यश प्राप्त करीत आहेत. ज्ञानदान करणा-या शिक्षकास अशा प्रकारची वागणूक देणा-या आमच्याच प्रशासनास आम्ही काय म्हणावे? एका रात्रीतून २१९ एकतर्फी शिक्षक भरले जातात. तर दुसरीकडे आपले शिक्षक वाऱ्यावर सोडून द्यायचे आणि दुसऱ्यांना आत घ्यायचे.  हा कोणता प्रशासनाचा न्याय? असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी केला आहे. (PMC Pune Education Department) 

 उच्च न्यायालयाने 24फेब्रुवारी,2023 दिलेल्या आदेशानुसार तात्काळ कार्यवाही करावी.अशीआमची मागणी आहेजोपर्यंत कार्यवाही करण्यात येत नाही तोपर्यंत आमचं आमरण उपोषण असंच चालू राहील. असं आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. (PMC Pune News)

——-

News Title | Fast to death in front of Pune Municipal Corporation of education servants on leave