Diwali Advance | PMC Pune | अखेर मनपा कर्मचाऱ्यांना मिळाला दिवाळी एडवान्स!!  | बोनसचे सर्कुलर मात्र अजूनही नाही 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

अखेर मनपा कर्मचाऱ्यांना मिळाला दिवाळी एडवान्स!!

| बोनसचे सर्कुलर मात्र अजूनही नाही

पुणे | महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून दिवाळी एडवान्स देण्यात आला आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर १०००० उचल ची रक्कम जमा करण्यात आली आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.   दरम्यान बोनसचे सर्कुलर मात्र अजूनही जारी करण्यात आले नाही. लेखा विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र गुरुवारी संध्याकाळ पर्यंत आयुक्ताकडून यावर मुहर लावण्यात आली नव्हती.

पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीच्या मुहूर्तावर सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्यात येतो. त्याचप्रमाणे बक्षिसी दिली जाते. मात्र यंदा दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. असे असले तरीही महापालिका प्रशासनाकडून बोनस बाबतचे परिपत्रक जारी करण्यात आलेले नाही. शिवाय कर्मचाऱ्यांना उचल रक्कम (Advance) दिलेला नव्हती. याबाबत ‘कारभारी’ वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केले होते. याची दखल घेत प्रशासनाकडून उचल रक्कम जमा करण्यात आली आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना सणासाठी १०००० ची उचल रक्कम दिली जाते. कर्मचारी आपल्या सोयीनुसार ही रक्कम दिवाली, ईद सारख्या मोठ्या सणासाठी घेऊ शकतात. नंतर दहा महिन्यात ही रक्कम वसूल केली जाते. दरम्यान गेल्या काही वर्षापासून कर्मचारी ही रक्कम दिवाळीलाच घेतात. उचल जमा झाल्याने कर्मचारी दिवाळीची खरेदीला सुरुवात करू शकतात.

दरम्यान बोनसचे सर्कुलर मात्र अजूनही जारी करण्यात आले नाही. लेखा विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. मात्र गुरुवारी संध्याकाळ पर्यंत आयुक्ताकडून यावर मुहर लावण्यात आली नव्हती. याबाबत गुरुवारी दुपारी कर्मचारी संघटनांनी देखील आयुक्तांची भेट घेतली होती.