Finance Committee : वित्तीय समिती बाबत महापालिका आयुक्तांनी घेतला महत्वाचा निर्णय!

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

वित्तीय समितीची पुनर्रचना

: महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) गेल्या दोन वर्षापासून वित्तीय समिती (finance commitee)स्थापन करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करणे, गरजेनुसार महत्वाच्या कामांना निधी देणे, अनावश्यक खर्च टाळणे तसेच जमा खर्चाचा ताळमेळ घालणेसाठी सदर समिती आवश्यक आहे. यापुढील कालावधीसाठी पुणे महानगरपालिकेमध्ये वित्तीय उपाय योजना करणेस्तव प्रशासकीय स्तरावर नवीन वित्तीय समिती गठीत करण्यात येत आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत.

: अशी असेल वित्तीय समिती

१) अध्यक्ष : महापालिका आयुक्त
२) ज्या कामा संबंधीत प्रस्ताव असेल त्या कामासंबंधीचे/प्रस्तावासंबंधीत अति.महापालिका आयुक्त
३) मुख्य लेखा व वित्त अधिकारी
४) ज्या कामा संबंधीत प्रस्ताव असेल त्या खात्याचे खातेप्रमुख

तरी, महापालिका आयुक्त यांचे कार्यालयाकडील संबंधीत जबाबदार अधिकारी यांनी अशा समितीच्या बैठका आयोजित करणेची व्यवस्था करावी. सदर बैठकीमध्ये खात्याने त्यांच्याकडील देखभाल दुरुस्ती, स्पीलची कामे, भांडवली कामे इत्यादी कामांबाबतचे प्रस्ताव/निवेदन वित्तीय समितीकडे सादर करावे त्यास मान्यता मिळाल्यानंतरच खात्याने पुढील कार्यावाही करावी. असे महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Leave a Reply