PMC STP Plant | महापालिका आणि सल्लागाराच्या उदासीनतेने एसटीपी प्लांटच्या नुतनीकरणाचे प्रस्ताव रखडले

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC STP Plant | महापालिका आणि सल्लागाराच्या उदासीनतेने एसटीपी प्लांटच्या नुतनीकरणाचे प्रस्ताव रखडले

| महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केली तक्रार

PMC STP Plant |  पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने अमृत अभियान (Amrit Abhiyan) अंतर्गत 9 एसटीपी प्लांट (STP Plant) चे नूतनीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र महापालिका आणि या कामाच्या व्यवस्थापन सल्लागाराच्या उदासीनतेने एसटीपी प्लांटच्या नूतनीकरणचे चे प्रस्ताव रखडले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेच (MJP) याची तक्रार महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे केली आहे. तसेच 4 सप्टेंबरला याबाबत एका बैठकीचे आयोजन केले आहे. (PMC STP Plant)

प्राधिकरणाच्या प्रस्तावानुसार केंद्र पुरस्कृत अमृत २.० अभियाना अंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीतील अस्तीत्वात’ असलेल्या ९ मैला पाणी शुध्दीकरण केंद्राचे नुतनीकरण / अद्ययावतकरण करणेबाबतच्या प्रस्तावांचा समावेश Phase व Phase ॥ अंतर्गत करण्यात आलेला आहे. Phase I मधील बोपोडी, एरंडवणे, तानाजीवाडी व भैरोबा या ४ मैलापाणी शुध्दीकरण केंद्राचे नुतनीकरण/अद्ययावतकरण करणेबाबतचे प्रस्ताव समाविष्ट आहेत. त्यापैकी बोपोडी, एरंडवणे व तानाजीवाडी या ३ केंद्राचे प्रस्ताव शेरेपुर्तता करुन तांत्रिक मान्यते साठी प्राप्त झाले आहेत. मजीप्रा दरसुची सन २०२३-२४ लागु करण्यात आली असुन बोपोडी, एरंडवणे हि अंदाजपत्रके अद्यायावत करुन सादर करणे आवश्यक आहे. तशा सुचना
संबंधित सल्लागारांना देण्यात आलेल्या आहेत. भैरोबा मैलापाणी शुध्दीकरण केंद्राबाबतचा सुधारित प्रस्तावावर मनिसंवस कक्षाने उपस्थित केलेल्या शेऱ्यांची पुर्तता करुन, असुन, दि. २२/०८/२०२३ रोजी विभागास सादर करण्यात आले आहे. सदर प्रस्तावाची तपासणी प्रगती पथावर आहे.

Phase || मधील नायडु व विठ्ठलवाडी या २ मैलापाणी शुध्दीकरण केंद्राचे नुतनीकरण/ अद्ययावतकरण करणेबाबतचे प्रस्ताव समाविष्ट आहेत. त्यापैकी विठ्ठलवाडी या केंद्राचा प्रस्ताव शेरेपुर्तता करुन तांत्रिक मान्यतेसाठी या कार्यालयास प्राप्त झाला आहे. मजीप्रा दरसुची सन २०२३-२४ लागु करण्यात आली असुन विठ्ठलवाडी अंदाजपत्रके अद्यायावत करुन सादर करणे
आवश्यक आहे. तशा सुचना संबधित सल्लागारांना देण्यात आलेल्या आहेत. नायडू या केंद्राचा प्रस्तावावरील मनिसंवस कक्षाने ०३/०३/२०२३ रोजीच्या पत्राने उपस्थित केलेल्या शेऱ्यांची पुर्तता करुन तांत्रिक मान्यतेसाठी या कार्यालयास अद्याप प्राप्त झालेला नाही. आता, Phase २ मधील बाणेर, खराडी व मुंढवा या तीनही (STP) मैलापाणी शुध्दीकरण केंद्र SBR
Technology चे असल्याने व MPCB च्या नवीन पॅरामिटरनुसार शुध्दीकरण होत असल्याने या तीनही मैलापाणी शुध्दीकरण केंद्र Phase ॥ मधुन वगळण्यात आले आहे असे मुख्य अभियंता (विद्युत), पुणे महानगरपालिका यांनी पत्रान्वये  कळविले आहे.
Phase मधील भैरोबा केंद्राचा प्रस्ताव उपस्थित शेऱ्यांची पुर्तता करुन व Phase I मधील नायडू या केंद्राचे प्रस्ताव अद्याप या कार्यालयास प्राप्त नाहीत. तसेच बोपोडी, एरंडवणे व विठ्ठलवाडी हि अंदाजपत्रके चालु दरसुची नुसार अद्यावत करुन अद्याप सादर करण्यात आलेले नाहीत. वडगाव बु येथे १२५ MLD क्षमतेचे नवे जल शुध्दीकरण केंद्र बांधणे बाबतचा प्रस्ताव  प्राप्त असुन, मनिसंवस कक्षाने उपस्थित केलेल्या शेऱ्यांची परिपुर्ण शेरेपुर्तता करण्यात आली नाही.
प्राधिकरणाने पुढे म्हटले आहे कि, वारंवार पाठपुरावा करुनही प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांचा प्रतिसाद नसल्याने वरील प्रस्तावांना तांत्रिक मान्यता देणे कामी विलंब होत आहे. त्याअनुषंगाने ०४/०९/२०२३ रोजी
सकाळी ११ वाजता या कार्यालयामध्ये बैठक आयोजीत करण्यात आली आहे. संबंधीत मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता, पुणे मनपा व संबंधीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांना सदर बैठकीस आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याबाबत आपल्या स्तरावरुन आदेश देण्यात यावेत. अशी सूचना आयुक्तांना करण्यात आली आहे.
—-