Pune Congress Jansanvad | पुणे काँग्रेसच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेचा शुभारंभ पर्वती विधानसभा मतदारसंघातून

Categories
Breaking News Political पुणे
Spread the love

Pune Congress Jansanvad | पुणे काँग्रेसच्या  ‘जनसंवाद’ पदयात्रेचा शुभारंभ पर्वती विधानसभा मतदारसंघातून 

  Pune Congress Jansanvad    महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (Maharashtra congress) आदेशानुसार संपूर्ण राज्यभर ‘जनसंवाद’ पदयात्रा (Jansanvad Padyatra) काढण्यात येणार आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या (Pune congress) वतीने या पदयात्रेचा शुभारंभ पर्वती विधानसभा मतदार संघातून करण्यात येणार असून उद्या रविवार ३ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वा., देशभक्त केशवराव जेध चौक, स्वारगेट ते गंगाधाम चौक पर्यंत जनसंवाद पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी माहिती शहर काँग्रेसच्या वतीने देण्यात आली. (Pune Congress Jansanvad)

     

याबाबत शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे कि, केंद्रातील मोदी सरकार जनतेची लुट करत आहे, शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी उद्धवस्थ झाला आहे. कृत्रिम टंचाईमुळे जनतेचे जगणे कठीण झाले आहे. भाजपा लोकशाही नाही तर सत्तेच्या स्वार्थासाठी काम करत आहे. आम्ही या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून मोदी सरकारचा पर्दाफाश करणार आहोत.

भाजपा सत्तेच्या जोरावर सर्व सरकारी यंत्रणामध्ये हस्तक्षेप करत आहे. संविधान संपुष्टात आणले जात आहे, विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करत आहे. जनतेच्या समस्यांकडे भाजपा सरकार लक्ष देत नाही म्हणून जनतेच्या व्यथा, समस्या, वेदना या यात्रेच्या माध्यमातून समजून घेतल्या जाणार आहेत.

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका मागील दिड-दोन वर्षांपासून घेतल्या जात नाहीत. राज्यातील वातावरण सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असून पराभवाच्या भितीने निवडणुका घेतल्या जात नाहीत. विविध कारणे देऊन सरकार निवडणुका टाळत आहे. सरकारकडे ओबीसी, मराठा आरक्षणासंदर्भात कोणतेही धोरण नाही. नोकर भरती सुरु असतानाही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. सरकार केवळ बैठकांचे गाजर दाखवत आहे. या सर्व मुद्द्यांवर लोकांसोबत आम्ही संवाद साधणार आहोत. महत्वाचे म्हणजे या जनसंवाद पदयात्रेचा उद्देश लोकभावना जाणून घेणे हा आहे. अशी माहिती या पत्रकाद्वारे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली आहे.