Meri Life Mera Swachh Shahar | PMC Pune | पुणे महापालिकेकडून करण्यात आली RRR केंद्राची स्थापना

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

Meri Life Mera Swachh Shahar | PMC Pune | “मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर”  अभियानांतर्गत पुणे शहरात  RRR (रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल) केंद्रांची स्थापना 

 

Meri Life Mera Swachh Shahar | PMC Pune | केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने (MoHUA) “मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर” हे अभियान दिनांक १५ मेपासून पुढील ३ आठवड्यांच्या कालावधीत राबविण्याचा निर्णय घेतला असून या अभियानांतर्गत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थाना “रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल” सेंटर्स म्हणजेच RRR केंद्रे स्थापन करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार  पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत (15 Ward offices) विविध हौसिंग सोसायटी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मोकळे मैदान, बाजारपेठा या ठिकाणी खालीलप्रमाणे RRR सेंटर्स स्थापन करण्यात आलेली आहेत. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या उपायुक्त आशा राऊत (Solide waste managaement Deputy commissioner Asha Raut)  यांनी दिली. (Meri Life Mera Swachh Shahar | PMC Pune)

शहरातील नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर  वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी “रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल” सेंटर्स म्हणजेच RRR केंद्रे स्थापन करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुर्नवापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्त करणे हा उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. (PMC pune News)

पुणे महानगरपालिकेच्या १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध हौसिंग सोसायटी, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मोकळे मैदान, बाजारपेठा या ठिकाणी खालीलप्रमाणे RRR सेंटर्स स्थापन करण्यात आलेली आहेत. (PMC Pune Ward Offices)

अ.क्र. क्षेत्रिय कार्यालयाचे नाव अ.क्र. RRR सेंटरचे ठिकाण
नगररोड-वडगावशेरी फोरेस्ट काउटी सोसायटी जवळ
डॉ.हेगडेवार क्रीडांगण,गणपती मंदिराशेजारी, कल्याणीनगर
येरवडा-कळस-धानोरी रोड न. १० डी विद्यानगर
ढोलेपाटील रोड बर्निग आरोग्य कोठी
औंध- बाणेर जुने औंध क्षेत्रिय कार्यालय ब्रेमन चौक
शिवाजीनगर-घोलेरोड हिरवाई हजेरी कोठी कमला नेहरू पार्क
कोथरूड-बावधन मयूर कॉलनी आरोग्य कोठी
धनकवडी-सहकारनगर तीन हत्ती चौक हजेरी कोठी
शरदचंद्र पवार उद्योग भवन
सिंहगड रोड १० सन सिटी आरोग्य कोठी जवळ
वारजे-कर्वेनगर ११ नादब्रम्हा आरोग्य कोठी
१० हडपसर-मुंढवा १२ मगर पट्टा चौक मेगा सेंटर जवळ
११ कोंढवा-येवलेवाडी १३ पेशवे तलाव कोठी जवळ
१२ वानवडी-रामटेकडी १४ शिवरकर उद्यान वानवडी
१३ कसबा-विश्रामबागवाडा १५ इंद्रधनुष्य
१४ भवानी पेठ १६ मनपा कॉलनी नं.८ घोरपडी पेठ
१५ बिबवेवाडी १७ क्रीडा संकुल अप्पर

 

ही RRR केंद्रे दि.२० मे २०२३ पासून दि.०४ जून २०२३ पर्यंत रोज स.७.०० ते दु.१.०० या वेळेत नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. डॉ.हेगडेवार क्रीडांगण, गणपती मंदिराशेजारी, कल्याणीनगर, जुने औंध क्षेत्रिय कार्यालय ब्रेमन चौक व शरदचंद्र पवार उद्योग भवन या ठिकाणचे RRR सेंटर्स हे कायमस्वरूपी नागरिकांसाठी खुले असणार आहेत. या सर्व RRR केंद्रांच्या ठिकाणी जास्तीत जास्त नागरिकांनी आपलेकडील वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर  वस्तू आणून जमा कराव्यात असे आवाहन पुणे महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. याबाबतची सविस्तर माहिती ही पुणे महानगरपालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे घनकचरा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. (PMC Pune Marathi news)


News Title | Meri Life Mera Swachh Shahar | PMC Pune | Establishment of RRR (Reduce, Reuse and Recycle) centers in Pune city under the “Meri Life Mera Swachh Shahar” campaign.