PMC Pune Road Department | रस्ते दुरुस्तीची 42 कोटींची कामे केली जाणार 

Categories
PMC पुणे
Spread the love

PMC Pune Road Department | रस्ते दुरुस्तीची 42 कोटींची कामे केली जाणार

| महापालिका पथ विभागाची माहिती

PMC Pune Road Department | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) पावसाळ्यापूर्वी (Before Monsoon) रस्ते दुरुस्तीची (Road maintenance) कामे केली जातात. त्यानुसार यावर्षी देखील कामे केली जाणार आहेत. त्याची तयारी महापालिका पथ विभागाकडून (PMC Road Department) सुरु करण्यात आली आहे. पूर्ण शहरात जवळपास 42 कोटींची कामे केली जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली. (PMC Pune Road Department)
पावसाळ्यात रस्ते खराब होण्याचे प्रमाण वाढताना दिसते आहे. पावसाळ्यात रस्ते खराब होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून महापालिका प्रशासनाच्या वतीने मान्सून पूर्व कामे केली जातात. यामध्ये रस्त्याची दुरुस्ती केली जाते. यावर्षी ही कामे करण्याची तयारी पथ विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. लवकरच याबाबत निविदा प्रक्रिया राबवून कामे करण्यास सुरुवात केली जाणार आहे. (PMC Pune News)
पथ विभागाच्या माहितीनुसार यासाठी जवळपास 56 टेंडर काढले जाणार आहेत. यामध्ये दुरुस्तीच्या कामाचे 38 टेंडर, हॉट मिक्स प्लांट साथीचे 2 टेंडर आणि Road Maintenance Vehicles (RMV) चे 16 टेंडर काढले जाणार आहेत. त्यासाठी जवळपास 42 कोटींचा खर्च येणार आहे. लवकरच याबाबतचे प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात येतील. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Road Maintenance)
News Title | PMC Pune Road Department | 42 crores worth of road repairs will be done| Municipal Road Department Information