Pune Potholes | पुणे महापालिकेने महिनाभरात दुरुस्त केले 2288 खड्डे  | महापालिका पथ विभागाची माहिती 

Categories
Breaking News PMC social पुणे

Pune Potholes | पुणे महापालिकेने महिनाभरात दुरुस्त केले 2288 खड्डे

| महापालिका पथ विभागाची माहिती

Pune Potholes | पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडून (PMC Pune Road Department) पाऊस (Monsoon) सुरु होण्या अगोदर पासून शहरातील विविध रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त (Pothole’s Repairs) करण्यात येत आहेत. 1 जून ते 4 जुलै दरम्यान पथ विभागाकडून 2288 खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. अशी माहिती पथ विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune Potholes)
पुणे महापालिकेच्या पथ विभागाकडून (Pune Municipal Corporation Road Department) मान्सूनपूर्व कामे करण्यात येतात. यामध्ये रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडुजी केली जाते. महापालिकेची विविध क्षेत्रीय कार्यालये (PMC Ward Offices) तसेच पूनावाला फाउंडेशन च्या वतीने खड्डे दुरुस्ती केली जात आहे. शहरात विविध रस्त्यावर एकूण 2358 खड्डे होते. यातील 2288 खड्डे पथ विभागाने 1 जून ते 4 जुलै या कालावधीत दुरुस्त केले आहेत. पूनावाला कडून 1791 खड्डे दुरुस्त करण्यात आले आहेत. शहरात अजून 70 खड्डे शिल्लक आहेत. आता हे काम पाऊस कमी झाल्यावर करण्यात येणार आहे. विभागाने 6569 चौ मी रस्त्यावर डांबरीकरण केले आहे. यासाठी 2454 मे टन माल वापरण्यात आला आहे. यामध्ये प्लांट वरील माल 1909 मे टन इतका तर कोल्ड मिक्स बॅग वरील 545 मे टन मालाचा समावेश आहे. दरम्यान पथ विभागाकडून याच कालावधीत 108 चेंबर्स दुरुस्त करण्यात आली आहेत. तर पाणी साचलेली 6 ठिकाणे आहेत. त्याचीही दुरुस्ती केली जाणार आहे. (PMC Pune News)
—–
News Title | Pune Potholes | Pune Municipal Corporation repaired 2288 potholes within a month| Municipal Road Department Information

Balbharti – Paud Fata Road | बालभारती-पौड फाटा रस्त्याला जोडरस्ता देणे शक्य नाही 

Categories
Breaking News PMC social पुणे

Balbharti – Paud Fata Road | बालभारती-पौड फाटा रस्त्याला जोडरस्ता देणे शक्य नाही

| पुणे महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण

Balbharti- Paud Fata Road | सेनापती बापट रस्ता (Senapati Bapat Road) आणि विधी महाविद्यालय रस्त्यावरील (Law College Road) वाहतूक कोंडी (Traffic) फोडण्यासाठी महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) बालभारती ते पौड फाटा रस्ता (Balbharti-paud Fata Road) प्रस्तावित करण्यात आला आहे. हा रस्ता बांधकाम व्यावसायिकांसाठी (Builder) केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. यावर आता पुणे महापालिका प्रशासनाकडून (Pune civic body) स्पष्टीकरण देण्यात आले आहे. प्रत्यक्षात या 1.7 किलोमीटरच्या रस्त्याला एकही जोडरस्ता (Junction Road) देता येत नसल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. (Balbharti-paud Fata Road)

महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ज्या सर्वे क्रमांक 44 साठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्या स.नं 44 च्या अर्ध्या भागात हा रस्ता तब्बल 25 फूट उंच ( उन्नत) आहे. तर या उन्नत रस्त्याला कुठेही रॅम्प नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच उर्वरीत भागात जिथे रस्ता पौड रस्त्याला जोडला जातो. तिथे डोंगराचा ओबडधोबड भाग असून तो कुठेही या सर्वे क्रमांकाला जोडणेच शक्‍य नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (PMC Pune)

पूर्वी या रस्त्यासाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड केली जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर महापालिकेने या बाबत खुलासा केल्यानंतर आता बांधकाम व्यावसायिकासाठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याबाबत पालिका प्रशासनाकडे याबाबत विचारणा केली असता या रस्त्यावर कुठेही जोडरस्ता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Pune Municipal Corporation News)

महापालिकेचा हा प्रस्तावित रस्ता 1.7 किलोमीटर लांबीचा आहे. त्यातील 700 मीटर रस्ता जमीनीवरून असून बालभारती समोरून ते विधी महाविद्यालय रस्त्याच्या बाजूला असलेल्या कांचन गल्ली पर्यंत हा रस्ता जमीनीवरून असणार असून कांचन गल्ली पासून तो इलिवेटेड्‌ ( उन्नत) असणार असून तो थेट सर्वे क्रमांक 44 च्या अर्ध्या पेक्षा अधिक भागात या रस्त्यांची उंची जमीनीपासून 8 मीटर ( 24 ते 25 फूट ) असणार आहे. त्यानंतर पुढे हा रस्ता पौड रस्त्याच्या बाजूला उतरावर असणार असून हा भाग टेकडीच्या तीव्र उतरावर तसेच ओबडधोबड रस्त्याने रस्ता उंचीवरच असणार आहे. त्यामुळे या भागातील कोणत्याही बांधकाम व्यावसायिक अथवा महापालिकेचे आरक्षण असलेल्या एसआरए प्रकल्पाच्या जागेसही तो जोडलेला असणार नसल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. (PMC Pune Road department)

ज्या सर्वे क्रमांक 44 चा उल्लेख करत हा रस्ता आहे असे सांगण्यात येत आहे. त्या सर्वे क्रमांक 44 ला जाण्यासाठी पौड रस्त्यावरील मासळी बाजाराच्या बाजूने स्वतंत्र रस्ता आहे. या शिवाय, पौड फटा फुटतो तिथून एक स्वतंत्र रस्ता असून एआरएआयच्या रस्त्यावरूनही स्वतंत्र रस्ता आहे. तर बालभारती पौड रस्ता आधीच उंच असल्याने तिथून आणखी एक रस्ताच देणे शक्‍य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले जात आहे.
—————–
News Title | Balbharti – Paud Fata Road | Balbharti-Poud Phata road is not possible| Explanation of Pune Municipal Administration

PMC Pune Road Department | रस्ते दुरुस्तीची 42 कोटींची कामे केली जाणार 

Categories
PMC पुणे

PMC Pune Road Department | रस्ते दुरुस्तीची 42 कोटींची कामे केली जाणार

| महापालिका पथ विभागाची माहिती

PMC Pune Road Department | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) पावसाळ्यापूर्वी (Before Monsoon) रस्ते दुरुस्तीची (Road maintenance) कामे केली जातात. त्यानुसार यावर्षी देखील कामे केली जाणार आहेत. त्याची तयारी महापालिका पथ विभागाकडून (PMC Road Department) सुरु करण्यात आली आहे. पूर्ण शहरात जवळपास 42 कोटींची कामे केली जाणार आहेत. अशी माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली. (PMC Pune Road Department)
पावसाळ्यात रस्ते खराब होण्याचे प्रमाण वाढताना दिसते आहे. पावसाळ्यात रस्ते खराब होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून महापालिका प्रशासनाच्या वतीने मान्सून पूर्व कामे केली जातात. यामध्ये रस्त्याची दुरुस्ती केली जाते. यावर्षी ही कामे करण्याची तयारी पथ विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. लवकरच याबाबत निविदा प्रक्रिया राबवून कामे करण्यास सुरुवात केली जाणार आहे. (PMC Pune News)
पथ विभागाच्या माहितीनुसार यासाठी जवळपास 56 टेंडर काढले जाणार आहेत. यामध्ये दुरुस्तीच्या कामाचे 38 टेंडर, हॉट मिक्स प्लांट साथीचे 2 टेंडर आणि Road Maintenance Vehicles (RMV) चे 16 टेंडर काढले जाणार आहेत. त्यासाठी जवळपास 42 कोटींचा खर्च येणार आहे. लवकरच याबाबतचे प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात येतील. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pune Road Maintenance)
News Title | PMC Pune Road Department | 42 crores worth of road repairs will be done| Municipal Road Department Information

Pune Municipal Corporation | MLA Bhimrao Tapkir | आमदार भीमराव तापकीर यांना पुणे मनपाच्या विरोधात का करावे लागत आहे आंदोलन?

Categories
Breaking News PMC Political social पुणे

Pune Municipal Corporation | MLA Bhimrao Tapkir | आमदार भीमराव तापकीर यांना पुणे मनपाच्या विरोधात का करावे लागत आहे आंदोलन?

| उद्या आमदार करणार आंदोलन

Pune Municipal Corporation | MLA Bhimrao Tapkir | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने वारजे भागात (Warje Area) सेवा रस्ता (Service Road) होण्याकरिता वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir) यांनी घंटा नाद आंदोलन (Agitation) करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजे 18 मे ला हे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत आमदार तापकीर यांनी महापालिकेला (PMC Pune) पत्र दिले आहे. (PMC Pune Road Department)

आमदार भीमराव तापकीर यांच्या पत्रानुसार  खडकवासला मतदार संघातील वारजे भागातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे, वारजे हायवे चौक ते बँक ऑफ महाराष्ट्र तसेच माई मंगेशकर हॉस्पिटल ते व्हायला सोसायटी तसेच सोबा पुरम सोसायटी कडून शेल पेट्रोल पंप ते हिल व्ह्यू सोसायटी पासून रोजरी अंडरपास ते डुक्कर खिंड सर्व्हिस रस्ता अरुंद असल्यामुळे आणि अपूर्णावस्थेतील असल्यामुळे नागरिकांना रस्त्याने चालणे देखील जिकरीचे झाले आहे. यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होऊन नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. (PMC Pune News)

पत्रात पुढे म्हटले आहे कि, महापालिका प्रशासनाला सर्व्हिस रस्ते तातडीने पूर्ण करण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार, बैठका घेऊन सुचना करण्यात आल्या व त्याविषयी गांभीर्य पटवून देऊन देखील प्रशासन दखल घेत नसल्याने पर्यायी आम्हाला वारजे भागातील बहुसंख्य नागरिक आणि पक्षाचे पदाधिकारी व संलग्न  संस्थामार्फत प्रत्यक्ष जागेवर जाऊन घंटा नाद आंदोलन गुरुवार  १८ मे स. १०.०० वा वारजे येथे चर्च शेजारी, हॉटेल कावेरी समोर करण्यात येणार आहे. (Pune News)
——
News Title | Pune Municipal Corporation | MLA Bhimrao Tapkir | Why does MLA Bhimrao Tapkir have to protest against Pune Municipal Corporation?