Gopichand Padalkar Vs NCP | गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी | पुणे पोलिस आयुक्तांना दिले निवेदन

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

गोपीचंद पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी

| पुणे पोलिस आयुक्तांना दिले निवेदन

पुणे | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बदनामी करण्याचे काम गोपीचंद पडळकर यांनी केले आहे, असा आरोप पुणे राष्ट्रवादी कॉंग्रेस ने केला आहे. शिवाय पुणे पोलिसांना निवेदन देत पडळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

राष्ट्रवादीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार गेली साठ वर्षांहून अधिक काळ राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होणे समजू शकते. परंतु भाजपाचे आमदार  गोपीचंद पडळकर हे सातत्याने आदरणीय  पवार साहेबांची बदनामी करीत असून त्यांचे वारंवार प्रतिमाहनन करीत आहेत, हे अतिशय गंभीर आणि खेदजनक आहे. गोपीचंद पडळकर हे सातत्याने खोटी आणि बिनबुडाची माहिती पसरवित आहेत. नुकतेच त्यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना -“राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा मफलर टाकून घोषणा देतात.” उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करणारी ‘पवारांची माणसं’ होती, अशी बेजबाबदार आणि खोटी विधाने केली.

त्यांचे हे विधान अतिशय गंभीर असून आमच्या सामाजिक व राजकीय संस्कृतीला धक्का पोहोचविणारे आहे. आम्ही या विधानाचा जाहिर निषेध करीत असून त्यांनी आमचा पक्ष व सर्वोच्च नेत्याच्या विरोधात खोटीनाटी माहिती पसरवून आमची बदनामी केलेली आहे. याबद्दल त्यांच्यावर योग्य त्या कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देवून त्याचप्रमाने विश्रामाबग पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल माने यांच्याकडे तक्रार अर्ज देण्यात आला
या प्रसंगी प्रवक्ते अंकुश काकडे व प्रदीप देशमुख ,दिपाली धुमाळ रविन्द्र माळवादकर ,वनराज आंदेकर , दत्ता सागरे , महेंन्द्र पठारे ,किशोर कांबळे , मोहसिन शेख ,दिपक पोकळे , रूपाली पाटील व इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते