Medical Management and IT Systems | एका क्लिकवर रुग्णाच्या पूर्वीच्या आजाराच्या उपचाराची माहिती मिळणार 

Categories
Breaking News PMC social आरोग्य पुणे
Spread the love

एका क्लिकवर रुग्णाच्या पूर्वीच्या आजाराच्या उपचाराची माहिती मिळणार

| पुणे स्मार्ट सिटी आणि महापालिकेची प्रणाली

पुणे महापालिका (PMC pune) आणि स्मार्ट सिटी (smart city pune) यांच्या वतीने वैद्यकीय व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीची (Health management and IT) सुरुवात केली आहे. या माध्यमातून एका क्लिकवर रुग्णाच्या पूर्वीच्या आजाराच्या उपचाराची माहिती मिळणार आहे. यामुळे डॉक्टर (Doctor)!आणि पेशंट (Patient) अशा दोघांचाही वेळ वाचणार आहे.
पुणे महानगरपालिका आणि पुणे स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीची अंमलबजावणी पुणे महापालिकेच्या (एकूण ७९ संस्था) रुग्णालये, दवाखाने, प्रसूती वॉर्ड व मनपा वैद्यकीय महाविद्यालय यांमध्ये होत आहे. (Pune Municipal corporation)
वैद्यकीय व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान प्रणालीचा उददेश आरोग्य सेवेचे संगणकीकरण करणे होय. म्हणजेच रुग्णांना पूर्वी झालेल्या आजारावर काय उपचार केले हे एका क्लिकवर पाहता येणार आहे. ज्यामुळे डॉक्टर्स आणि पेशंटचा वेळ वाचून कार्यक्षमता वाढणार आहे. उपचाराबरोबरच इतर सर्व विभाग ओपीडी, प्रयोगशाळा, औषधालय इत्यादी टॅब्ज व संगणक प्रणालीव्दारे सध्याच्या वैद्यकीय क्षेत्रात अमूलाग्र बदल तसेच पेपरलेस व्यवहार शक्य होणार आहे. या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा उददेश साध्य होईल.
या मोहिमेत पुणे स्मार्ट सिटीतर्फे ३०० टॅब्जचे वाटप डॉक्टर तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांना होणार आहे. पहिल्या चरणात कमला नेहरु रुग्णालय तसेच भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ४६ टॅब्जचे वाटप पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या हस्ते दि. ०८/१२/२०२२ करण्यात आले. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आशिष बनगिनवार, कमला नेहरु रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सूरज वाणी, डॉक्टर्स, परिचारीका व इतर कर्मचारी या वेळी उपस्थित होते. (PMC Pune)
यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देशातील २६४ शहराबददल अभिप्राय नोंदविण्यासाठी “इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षणाचे” आयोजन केले आहे. या अभियानात दि. २३ डिसेंबर पर्यंत अभिप्राय नोंदवावेत असे आवाहन पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. चे मुख्य
कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी उपस्थितांना केले. (Pune smart city)