Work on Saturday, Sunday | बोनस वेळेत अदा करण्यासाठी ऑडिटर सेवकांना शनिवार, रविवारी कामावर येण्याचे आदेश  | 18 ऑक्टोबर पर्यंत बिले तपासणीच्या वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांच्या सूचना 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

बोनस वेळेत अदा करण्यासाठी ऑडिटर सेवकांना शनिवार, रविवारी कामावर येण्याचे आदेश

| 18 ऑक्टोबर पर्यंत बिले तपासणीच्या वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांच्या सूचना

पुणे| महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये 18 ऑक्टोबर पर्यंत बिले तपासून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सानुग्रह अनुदान वेळेत आदा करणेसाठी पगार बिल ऑडीट विभागाकडील सर्व ऑडिटर सेवकांनी शनिवार  व रविवार  रोजी कामावर उपस्थित राहून सन २०२१- २०२२ या वर्षाची सानुग्रह अनुदान बिलांची तपासणी करण्यात यावी. असे आदेश वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांनी दिले आहेत.

| असे आहेत आदेश

पुणे महानगरपालिका सर्व अधिकारी / कर्मचारी यांना सन २०२१-२०२२ या वर्षासाठी सानुग्रह अनुदान आदा करणेबाबत मा. महापालिका आयुक्त यांनी ठराव क्रमांक ६/५९९, दि. १४/१०/२०२२ अन्वये मान्यता दिलेली आहे. सन २०२१-२०२२ या वर्षासाठी सानुग्रह अनुदान आदा करणेबाबत जा.क्र. २७१७, दि. १४/१०/२०२२ ने कार्यालय परिपत्रक पारीत करण्यात आलेले असून, सानुग्रह अनुदानाची बिले दि. १८/१०/२०२२ अखेर पर्यंत तपासून घेण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे माहिती तंत्रज्ञान विभागाकडील प्रोग्रामर यांनी संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करुन योग्य प्रोग्राम तयार करण्याची दक्षता घ्यावी.
सानुग्रह अनुदान वेळेत आदा करणेसाठी पगार बिल ऑडीट विभागाकडील सर्व ऑडिटर सेवकांनी शनिवार दि. १५/१०/२०२२ व रविवार दि. १६/१०/२०२२ रोजी कामावर उपस्थित राहून सन २०२१- २०२२ या वर्षाची सानुग्रह अनुदान बिलांची तपासणी करण्यात यावी.
तसेच मनपा भवनातील सर्व कार्यालये व १५ क्षेत्रीय कार्यालये, परिमंडळ कार्यालय १ ते ५ मधील संबंधित बिल लेखनिक यांनी देखील शनिवार दि. १५/१०/२०२२ व रविवार दि. १६/१०/२०२२ रोजी प्रत्यक्ष कामावर उपस्थित राहून सन २०२१-२०२२ या वर्षाची सानुग्रह अनुदान बिलांची तपासणी करून घेण्याची दक्षता सर्व संबंधित खातेप्रमुख / विभागप्रमुख यांनी घ्यावी.