Ajit Pawar Maharashtra Tour | विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या निर्णयाचे स्वागत

Categories
Breaking News Political पुणे महाराष्ट्र
Spread the love

Ajit Pawar Maharashtra Tour | विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून शरद पवारांच्या निर्णयाचे स्वागत

| विरोधी पक्षनेते अजित पवार उद्यापासून आठ दिवस पुणे, सातारा, उस्मानाबाद, लातूर, नाशिक दौऱ्यावर 

Ajit Pawar Maharashtra Tour | शरद पवार (Sharad pawar) साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे हा राज्यातील, देशातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन पदावर कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, देशातील विरोधी पक्षांच्या एकजुटीला बळ देणारा आहे. साहेबांनींच राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावे, असा आग्रह धरत, अध्यक्ष निवड समितीने साहेबांच्या निवृत्तीचा निर्णय फेटाळून लावला आणि साहेबांनीच अध्यक्षपदी कायम रहावे, (NCP president) हा निर्णय एकमताने घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे एक कुटुंब असून साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष राज्यात आणि देशात उज्जवल यश संपादन करेल,” असा विश्वास व्यक्त करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. (NCP president News)
 साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा निर्णय आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर घेतला असून त्यांचे वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी, एकजुटीने आणि अधिक जोमाने काम करावे, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असे आवाहनही अजित पवार यांनी केले आहे. (Ajit pawar news)
साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागलो आहोत. आज उशीरापर्यंत मुंबईत थांबल्यानंतर उद्या 6 तारखेला मी दौंड, कर्जत दौऱ्यावर जात आहे. 7 तारखेला बारामती, 8 तारखेला कोरेगाव, सातारा, 9 तारखेला सातारा, फलटण. 10 तारखेला उस्मानाबाद, लातूर, 11 तारखेला नाशिक आणि 12 तारखेला पुणे असा माझा दौरा कार्यक्रम असणार आहे, अशी माहितीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. (Ajit pawar Maharashtra tour)
००००००