PMC Commissioner Vikram Kumar | उत्पन्न वाढीसाठी नियोजन करा  | महापालिका आयुक्तांच्या टॅक्स विभागाला सूचना 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

 उत्पन्न वाढीसाठी नियोजन करा

| महापालिका आयुक्तांच्या टॅक्स विभागाला सूचना

पुणे | महापालिकेचा कर आकारणी व संकलन विभाग महापालिकेला सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देतो. मात्र गेल्या दोन महिन्यात विभागाला अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. याकडे महापालिका आयुक्तांनी गंभीरपणे लक्ष दिले आहे. वसुलीच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी नियोजन करा. असे आदेश महापालिका आयुक्तांनी कर विभागाला दिले आहेत. त्यानुसार विभागाने देखील याची तयारी सुरु केली आहे.
महापालिकेला टॅक्स विभागाकडून जास्तीत जास्त उत्पनाची अपेक्षा असते. कारण हा विभाग 1700 कोटीपर्यंत उत्पन्न महापालिकेला मिळवून देतो. त्यामुळे महापालिका आयुक्तांचेही या विभागाकडे जास्त लक्ष असते. दरम्यान चालू आर्थिक वर्षात विभागाला 2200 कोटींहून अधिक उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट आयुक्तांनी दिले आहे. मात्र आतापर्यंत 1163 कोटी जमा झाले आहेत. त्यातच मे महिना संपल्यानंतर वसुली देखील कमी होते. त्यामुळे उत्पन्न मिळण्याचा वेग मंदावतो. त्यामुळे वसुलीच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी नियोजन करा. असे आदेश महापालिका आयुक्तांनी कर आकारणी विभागाला दिले आहेत. त्यानुसार विभागाने देखील याची तयारी सुरु केली आहे. टॅक्स विभाग नियोजन तयार करून आयुक्तांसमोर ठेवेल. यामध्ये जास्तीत जास्त वसुली करण्याचे प्रयत्न टॅक्स विभागाचे असतील.

| आतापर्यंत 1163 कोटी जमा

टॅक्स विभागाच्या माहितीनुसार विभागाकडे 1 एप्रिल पासून आतापर्यंत 1163 कोटी जमा झाले आहेत. यामध्ये 9.48 कोटी समाविष्ट गावातून जमा झाले आहेत. मागील वर्षी याच दिवशी विभागाकडे 978 कोटी जमा झाले होते. 10 आगस्ट या एका दिवशी 1 कोटी 59 लाख 75 हजार जमा झाले. तर मागील वर्षी 10 आगस्टला 1 कोटी 33 लाख 51 हजार जमा झाले होते.