PMC Employees Time Bound Promotion | कालबद्ध पदोन्नती बाबत महापालिका कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दिलासा! | मात्र चर्चा करण्याचे सामान्य प्रशासन विभागाला आदेश

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC Employees Time Bound Promotion |  कालबद्ध पदोन्नती बाबत महापालिका कर्मचाऱ्यांना आयुक्तांचा दिलासा! | मात्र चर्चा करण्याचे सामान्य प्रशासन विभागाला आदेश

| कर्मचाऱ्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार

PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्धपदोन्नतीचा प्रस्ताव (Time Bound Promotion Proposal) लटकला होता. कारण याबाबतची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांनी दिले होते. याच्या अंमलबजावणी बाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण घेण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. मात्र कर्मचारी संघटनाच्या मागणीनुसार सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. याला महापालिका आयुक्तांची मंजूरी मिळाली नव्हती. नुकतीच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी या प्रस्तावावर सकारात्मक भूमिका घेत चर्चा करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाला दिले आहे. असे असले तरी याबाबतचे कार्यालयीन सर्क्युलर येण्यासाठी अवधी लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात नोव्हेंबर 2021 ला  वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले होते. (Pune Municipal Corporation Employees)

मात्र याबाबत महापालिका कामगार संघटनांनी नुकतीच अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत पदोन्नती बाबत प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. दरम्यान सरकारने काही बदल सुचवला तर त्यानुसार कार्यवाही केली जाणार आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने अतिरिक्त आयुक्तांची मान्यता घेत प्रस्ताव आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमोर ठेवला होता. या प्रस्तावावर महापालिका आयुक्तांनी चर्चा करा, असा शेरा मारला आहे. आयुक्तांनी सकारात्मक भूमिका दाखवली असली तरी अंतिम मंजूरी दिली नाही. त्यामुळे सर्क्युलर निघण्यासाठी कर्मचाऱ्यांना अजून काही काळ तरी वाट पाहावी लागणार आहे. (PMC Pune News)
News Title | PMC Employees Time Bound Promotion | Commissioner’s relief to municipal employees regarding time-bound promotions! | But the general administration department is ordered to discuss