PMC Employees Transfer | एका खात्यात ३ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या 40% अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्वरित करा

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

PMC Employees Transfer | एका खात्यात ३ वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या  40% अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्वरित करा

| अरविंद शिंदे यांची मागणी

PMC Employees Transfer | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या (Pune Municipal Corporation Employees) आणि विविध राजकीय नेत्यांच्या मागणीनुसार महापालिका प्रशासनाकडून विविध खात्यातील 20% कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्या वेगवेगळ्या टप्प्यात केल्या जातील, असे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र बराच कालावधी उलटून गेल्या तरी त्यावर अंमल झालेला नाही. त्यामुळे एका खात्यात 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेल्या  40% अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या त्वरित करा. अशी मागणी काँग्रेस शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation)
अरविंद शिंदे यांनी दिलेल्या पत्रानुसार पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक व पदस्थापना बदली यांच्या 17 एप्रिल  रोजी एका खात्यामधून दुसऱ्या खात्यात २०% नियतकालिक बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या पदाच्या बदल्यांमधील त्रुटी कळविलेनंतर अधिक्षक पदावरील पात्र बदली केलेल्या आहेत.  परंतु त्यामध्ये सन २०१५ मध्ये ज्या सेवकांची कर आकारणी कर संकलन कार्यालयाकडे लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक, उप अधिक्षक यांची नेमणूक झाली आहे असे सेवक आजही कर आकारणी कडे कार्यरत आहेत व सन २०१६ अथवा त्यानंतर नेमणूक झालेल्या मोजक्या सेवकांच्या बदल्या झालेल्या दिसून येत आहेत असे त्यावेळी निदर्शनास आणून दिले होते.  17 एप्रिल व त्यादरम्यान केलेल्या २०% बदल्या करण्यात आलेल्या असून पुढील २०% बदल्या आजपर्यंत झालेल्या नाहीत. सदर बदल्या का करण्यात आलेल्या नाहीत ? याची आम्ही पूर्वी माहिती मागीवली असून त्याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. (Pune Municipal Corporation Employees) 
शिंदे यांनी पुढे म्हटले आहे कि, आम्ही आपणास सन २०१६ पासून वेतनास स्थानिक संस्था कर (एल.बी.टी.) विभागाकडे व प्रत्यक्ष कामास कर आकारणी कर संकलन या खात्यात काम करीत असल्याचे लेखी कळविले असून त्या बदल्या अद्याप झालेल्या नाहीत.  तसेच आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, पथ विभाग, मालमत्ता व्यवस्थापन विभाग, विद्युत विभाग ई. विभागातील सर्व पदांच्या बदलीबाबत आम्ही मागणी केलेली होती. या बदल्या देखील अद्याप झालेल्या नाहीत. तरी वरील सर्व बाबी पुणे मनपाचे प्रशासकीय व आर्थिक हिताच्या दृष्टीने योग्य नाहीत.  त्यामुळे  ज्या मनपा अधिकारी व कर्मचारी यांना एका खात्यात ३ वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे अशा किमान ४० % अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या त्वरित करण्यात याव्यात. अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. (PMC Pune News)
—–
News Title |PMC Employees Transfer | Promptly transfer 40% officers and employees who have been in one account for more than 3 years