PMC EV Charging Station | पुणेकरांना आजपासून  पुणे महापलिकेच्या २१ EV चार्जिंग स्टेशनची मिळणार सुविधा  | महापालिका आयुक्त यांच्या हस्ते झाले  लोकार्पण 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC EV Charging Station | पुणेकरांना आजपासून  पुणे महापलिकेच्या २१ EV चार्जिंग स्टेशनची मिळणार सुविधा

| महापालिका आयुक्त यांच्या हस्ते झाले  लोकार्पण

 

PMC EV Charging Stations | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीतील विविध ८२ ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) चार्जिंग स्टेशन निर्माण करण्यात येणार आहेत. त्यातील २१ स्टेशन चे काम पूर्ण झाले आहे. याचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले आहे.  महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले.  आजपासून नागरिकांना याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे.  (PMC Pune News)

 

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध ८२ ठिकाणी कार्यालयीन इमारती, वाहनतळ क्षेत्रे, उद्याने, संग्रहालये, सभागृहे, दवाखाने व स्मशानभूमी इ) नागरिकांच्या सोयीकरिता PPP तत्वावर आधारित इलेक्ट्रिक
व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाचा कालावधी ८ वर्षे आहे. मे. मरीन इलेक्ट्रिकल्स कंपनीला याचे काम देण्यात आले आहे. येणारा सर्व खर्च संबंधित ठेकेदाराकडून करण्यात येणार आहे व त्यामधून येणाऱ्या net profit मधून ५०% शेअर पुणे महानगरपालिकेला देण्यात येणार आहे. (Pune PMC News)

नागरिकांना काय करावे लागेल?

चार्जिंग स्टेशन्स नागरिकांनी वापरण्यासाठी प्ले स्टोअर मधून अथवा प्रत्येक चार्जिंग स्टेशन वरील QR कोड स्कॅन करून Bijlify हे App डाउनलोड करून व स्वतःचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करता येईल. सदर App द्वारे हे लोकेशन मॅपच्या सहाय्याने ठिकाण व पार्किंग उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत माहिती सहज कळू शकते तसेच पेमेंट सुविधा सुद्धा App द्वारे उपलब्ध करण्यात आलेली असून चार्जिंग शुल्क (charges) नागरिकांना र.रु. १३ ते १९ प्रति युनिट दर राहणार आहे.  जे इतर खाजगी चार्जिंग स्टेशन दरापेक्षा कमी राहणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या अत्याधुनिक सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात
आले आहे.

| या ठिकाणी आहेत  चार्जिंग स्टेशन्स

१ पुणे महानगरपालिका पार्किंग
२ सावरकर भवन पार्किंग
३ गणेश कला क्रीडामंच
४ यशवंतराव चव्हाण नाटयगृह / बाळासाहेब ठाकरे कलामंदिर
५ बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय
६ घोले रोड क्षेत्रिय कार्यालय
७ टिळक रोड क्षेत्रिय कार्यालय
८ बालगंधर्व नाट्यगृह
९ स्केचर्स शोरूम जंगली महाराज रोड पार्किंग
१० मॅकडोनाल्ड्स जंगली महाराज रोड पार्किंग
११ लेमन सलन एफ सी रोड पार्किंग
१२ कुशल वाल स्ट्रीट एफ सी रोड पार्किंग
१३ आर्ट स्टेशन पुणे एफ सी रोड पार्किंग
१४ मिलेनिअम प्लाझा एफ सी रोड पार्किंग
१५ पेशवे पार्क पार्किंग
१६ मंडई आर्यन पार्किंग
१७ गुलटेकडी पार्किंग
१८ नवलोबा पार्किंग नं. ३८ शुक्रवार पेठ
१९ पद्मावती पम्पिंग स्टेशन पार्किंग
२० पंडित भीमसेन जोशी ऑडीटोरीअम
२१ संजय गांधी हॉस्पिटल पार्किंग