PMC Fireman Recruitment Results | अखेर फायरमन पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध | महापालिका प्रशासना कडून तात्काळ हंगामी नेमणुका! 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Fireman Recruitment Results | अखेर फायरमन पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध | महापालिका प्रशासना कडून तात्काळ हंगामी नेमणुका!

PMC  Fireman Bharti Results | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) वतीने फायरमन (Fireman) पदासाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणे बाकी होते. 200 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र यात 167 उमेदवार पात्र ठरले आहेत. त्यानुसार प्रशासनाने निवड यादी प्रसिद्ध करून तात्काळ हंगामी नेमणुका देखील दिल्या आहेत.  (Pune Mahanagarpalika Fireman Bharti Results)
पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरले होते. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा  ही 26 ते 29 ऑक्टोबरला आणि 22 नोव्हेंबर ला घेण्यात आली होती.  त्यानुसार या चाचणीचे गुण महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर अग्निशमन साहित्य ओळख बाबत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी 5 गुण होते. परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत काही हरकती असतील तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर ‘अग्निशमन साहित्याची ओळख’ यामधील उत्तरांबाबत आणि गुणांबाबत उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्यात आलेली आहे. पुनर्तपासणीमध्ये बदल झालेल्या उमेदवारांच्या सुधारित गुणांचा तक्ता व संबंधित उत्तरपत्रिका मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आली.   Pune Municipal Corporation recruitment)

| काही ठरले अपात्र

दरम्यान अंतिम निकालाकडे उमेदवार टक लावून होते. अखेर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. 200 जागांपैकी 167 लोकांनाच यात निवडण्यात आले आहे. अंतिम निवड यादी ही निवड समिती ठरवणार होती. त्यानुसार समितीने चर्चा करून ही यादी प्रसिद्ध केली आहे. यात 30 माजी सैनिक अपात्र ठरले आहेत. कारण त्यांनी केलेला कोर्स हा वादाचा मुद्दा ठरला. एक महिला होती. तिला उंचीच्या नियमात अपात्र ठरवण्यात आले. दरम्यान हा विषय कोर्टात आहे. तर दोन उमेदवार हे अनाथ प्रवर्गातील होते जे महापालिकेला मिळू शकले नाहीत. त्यानुसार 167 उमेदवार पात्र करण्यात आले आहेत.

| पुणे अग्निशमन दलात प्रथमच महिलेचा समावेश

दरम्यान या भरतीच्या निमित्ताने पुणे महापालिका अग्निशमन दलात प्रथमच एका महिलेचा समावेश झाला आहे. मेघना महेंद्र सपकाळ असे या पात्र झालेल्या महिलेचे नाव आहे. मुंबई खालोखाल पुण्यात स्थायी पदावर महिलेला नेमणूक देण्यात आली. मेघनाचे आजोबा सदाशिव बापुराव सकपाळ हे अग्निशमन दलाकडून सेवानिवृत्त तर वडिल महेंद्र सदाशिव सकपाळ हे सध्या फायरमन पदावर कार्यरत आहेत.
the karbhari - meghna sapkal

– शारीरिक पात्रतेचा दाखला अनिवार्य

दरम्यान महापालिकेत रुजू होण्या अगोदर या उमेदवारांना शारीरिक पात्रतेचा दाखला घेऊन येणे अनिवार्य केले आहे. उमेदवारांनी अग्निशमन विभागाकडून शारीरिक तपासणी बाबतचे पत्र घेऊन अध्यक्ष, वैद्यकीय बोर्ड यांच्याकडून शारीरिक तपासणी करून घ्यायची आहे. त्यानंतरच उमेदवारांना कामावर हजर करून घेतले जाणार आहे.

– अंतिम निवड यादी येथे पहा