PMC Pune RRR Centre’s | पुणे महापालिकेकडे जमा झाल्या 30 टन जुन्या वस्तू

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Pune RRR Centre’s | पुणे महापालिकेकडे जमा झाल्या 30 टन जुन्या वस्तू

| महापालिकेच्या RRR केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद

PMC Pune RRR centre’s| पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने RRR केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पुणे महापालिकेकडे आतापर्यंत 30 टन जुन्या वस्तू जमा झाल्या आहेत. अशी माहिती महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या (PMC solid waste management department) वतीने देण्यात आली. (PMC Pune RRR centre’s)
 पुणे शहरातील (Pune City) नागरिकांनी वापरलेली जुनी पुस्तके, प्लास्टिक, कपडे, पादत्राणे आणि इतर  वस्तू गोळा करून त्यांचा पुर्नवापर करण्यासाठी “रिड्यूस, रीयुज आणि रिसायकल” सेंटर्स (Reduce, Reuse, Recycle centers) म्हणजेच RRR केंद्रे स्थापन करणे आणि या संकलित केलेल्या वस्तू नूतनीकरण, पुर्नवापर किंवा नवीन उत्पादने तयार करण्यासाठी विविध भागधारकांना सुपूर्त करणे हा RRR केंद्रे उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. (PMC Pune Marathi News)

ही RRR केंद्रे ०५ जून २०२३ पर्यंत रोज स.७.०० ते दु.१.०० या वेळेत नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. डॉ. हेगडेवार क्रीडांगण, गणपती मंदिराशेजारी, कल्याणीनगर, जुने औंध क्षेत्रिय कार्यालय ब्रेमन चौक व शरदचंद्र पवार उद्योग भवन या ठिकाणचे RRR सेंटर्स हे कायमस्वरूपी नागरिकांसाठी खुले असणार आहेत. (Pune Municipal Corporation)

दिनांक ३१ मे रोजीपर्यंत १२०० हून अधिक नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला असून आत्तापर्यंत एकूण ३० टन जुन्या वस्तू नागरिकांनी पुनःवापर व पुनःचक्रीकरणासाठी दिल्या आहेत. यामध्ये ५६% कपडे, ८% ई-वेस्ट, ९% पुस्तके व २७% खेळणी, पादत्राणे, भांडी, शोभेच्या वस्तू, बॅग्स यांसारख्या इतर वस्तू गोळा केल्या आहेत. तसेच एकूण १७४९ पुस्तके व ४६०८ पादत्राणांचे जोड संकलित करण्यात आलेले आहेत. (PMC solid waste management department)
सर्व क्षेत्रिय कार्यालयांतर्गत स्थापित RRR केंद्रांचे परीक्षण करणेकरीता तज्ञ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली असून शहरपातळीवर तीन उत्कृष्ट RRR केंद्रांची निवड करण्यात येणार आहे. या उत्कृष्ट RRR केंद्रांना जागतिक पर्यावरण दिनी सन्मानित करण्यात येणार आहे. असे घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.
News title | PMC Pune RRR Centers |  30 tons of old items have been deposited with Pune Municipal Corporation
 |  Good response from the citizens to the RRR centers of the Municipal Corporation