PMC Pune Water Budget | समाविष्ट 34 गावांच्या पाण्यावरून पुणे महापालिकेने पाटबंधारे विभागाला सुनावले | वाचा काय आहे प्रकरण

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Pune Water Budget | समाविष्ट 34 गावांच्या पाण्यावरून पुणे महापालिकेने पाटबंधारे विभागाला सुनावले | वाचा काय आहे प्रकरण 

PMC Water Budget | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत 34 गावांचा (34 included Villages) झालेला समावेश आणि दरवर्षी वाढणारी लोकसंख्या गृहीत धरता अर्थात 72 लाख लोकसंख्या गृहीत धरून शहराला आता 20.90 टीएमसी (20.90 TMC) पाण्याची आवश्यकता लागणार आहे. पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक अर्थात वॉटर बजेट (PMC Pune Water Budget 2013-24) जलसंपदा विभागाला (Department of Water Resources) सादर करत ही मागणी केली होती. मात्र पाटबंधारे विभागाने महापालिकेला फक्त 12.82 टीएमसी पाणी मंजूर केले आहे. समाविष्ट 34 गावांना आम्हीच पाणी देतो असे म्हणत पाटबंधारे विभागाने 2.34 टीएमसी पाणी कमी केले आहे.  यामुळे महापालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. समाविष्ट गावांना पुणे महापालिकेने पाणी देणे बंद केले तर याची सर्वस्वी जबाबदारी पाटबंधारेची राहील, असा इशारा पुणे महापालिकेकडून देण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)

पुणे महापालिकेकडून दरवर्षी जलसंपदा विभागाला वॉटर बजेट सादर करत पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी केली जाते. यावर्षी 20.34 टीएमसी पाणी मागण्यात आले होते. सद्यस्थितीत शहराला जलसंपदा विभागाकडून 14.61 टीएमसी पाणी दिले जात आहे. जलसंपदा विभाग पाण्याचा कोटा किती मंजूर करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. त्यानुसार जलसंपदा विभागाने फक्त 12.82 TMC पाणी कोटा मंजूर केला आहे. पाटबंधारे विभागाने पुन्हा एकदा मनमानी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता महापालिका पाणीपुरवठा विभागाने पाटबंधारे विभागाला खरमरीत पत्र लिहिले आहे.  (PMC Water Budget)
पाणीपुरवठा विभागाच्या पत्रानुसार  मान्य केलेल्या वॉटर बजेट नुसार जर समाविष्ट ३४ गावांचा पाणीपुरवठा पुणे महानगरपालिका करित नसेल व पुणे मनपाचे पाणी कोटा मध्ये सदर समाविष्ट ३४ गावांचा १.७५ टी.एम.सी. पाणी बजेट वाढवून मिळणार नसेल तर पुणे महानगरपालिकेने सदर समाविष्ट ३४ गावांचा पाणीपुरवठा बंद केल्यास यास सर्वस्वी पाटबंधारे  खाते जबाबदार राहणार आहे.  या शिवाय पुणे महानगरपालिकेचा भामा आसखेड धरणाचा २.६७ टी.एम.सी. पाणी कोटा व पवना नदी येथील ०.३४ टी.एम.सी. पाणीकोटाचा उल्लेख पाटबंधारे कडून सादर केलेल्या वॉटर बजेट मध्ये दिसत नाही. तसेच वॉटर
लॉसेस करिता MWRRA चे निकषानुसार पुणे शहरासाठी २०% वॉटर लॉसेस गृहित धरणे आवश्यक आहे. या कारणामुळेच पुणे महानगरपालिकेस आपले विभागामार्फत यापूर्वी सुध्दा अधिक दर लावून पाण्याची बिले दिली गेली आहेत. त्यामुळे पुणे महानगरपालिकेस आपले विभागाकडून जादा रक्कम आकारली गेली आहे.

| महापालिकेने या केल्या मागण्या

१)  सादर केलेल्या वॉटर बजेट नुसार व समाविष्ट ३४ गावांकरिताचा १.७५ टी.एम.सी. पाणीकोटा, भामा आसखेड धरणाचा २.६७ टी.एम.सी. पाणीकोटा व पवना नदीचा ०.३४ टी.एम.सी. पाणी कोटाचा उल्लेख वॉटर बजेट मध्ये करणे.
२) मिनिस्ट्री ऑफ अर्बन अफेअर्स व CPHEEO मॅन्युअल गाईड लाईननुसार २०% वॉटर लॉसेस गृहित धरा
३) आपले विभागाचे पुणे मनपा सन २०२३-२४ करिताचे वॉटर बजेट मध्य वजावट केलेले २:२३ टी.एम.सी.पाणी वजा (कमी) करणेत येऊ नये व आपले विभागामार्फत मान्यं पाणीकोटा वाढूवन मिळावा.
—-