PMC Security Department | Disaster Management | पुणे महापालिकेतील 2250 सुरक्षा रक्षकांना आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण!

Categories
PMC पुणे
Spread the love

PMC Security Department | Disaster Management | पुणे महापालिकेतील 2250 सुरक्षा रक्षकांना आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण!

| गेल्या 15 दिवसापासून प्रशिक्षण सुरु

PMC Security Department | Disaster Management | पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दल (PMC Fire Department) आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत (PMC Disaster Management Cell) सुरक्षा विभागातील (PMC Security Department) कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी 1562 खाजगी सुरक्षा रक्षक, शिक्षण मंडळा कडील  सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा विभाग कार्याकडील कायम पदावर काम करणारे सुरक्षारक्षक असे एकूण 2250 कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षण देण्यात आले. अशी माहिती सुरक्षा अधिकारी राकेश विटकर (Rakesh Vitkar PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation (PMC)
The karbhari - PMC Security Department
पुणे महापालिकेतील सुरक्षा रक्षकांना आपत्ती विषयक माहिती देण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 29 जानेवारी ते 20 फेब्रुवारी पर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे.  महानगरपालिकेच्या जुन्या जीबी हॉलमध्ये दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत 60 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण देण्यासाठी अग्निशमन दलातील अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन दलातील अधिकारी त्याचप्रमाणे यशदा मधील अधिकारी सहभागी असतात. त्याचबरोबर सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांच्या वतीने सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांचे अधिकार व कर्तव्य यांची देखील जाणीव करून देण्यात येत आहे. (Pune PMC News)
The karbhari - PMC Security Guard Training
हे प्रशिक्षण राकेश विटकर सुरक्षा अधिकारी,  शिवाजी बोखारे प्रशासनाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन,  गजानन पाथरुडकर विभागीय अग्निशमन अधिकारी, तसेच विवेक नायडू आपती व्यवस्थापन अधिकारी यशदा पुणे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.