PMC Solid Waste Management Department | इंदौर दौऱ्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून तात्काळ उपाययोजना सुरु | आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण 

Categories
Breaking News PMC social पुणे
Spread the love

PMC Solid Waste Management Department | इंदौर दौऱ्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून तात्काळ उपाययोजना सुरु | आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण

PMC Solid Waste Management Department | पुणे शहराला अजून स्वच्छ बनवण्यासाठी आणि देशात प्रथम क्रमांकाचे स्वच्छ शहर बनवण्यासाठी महापालिकेच्या घनकचरा विभागाने (PMC Pune Solid Waste Management Department) कंबर कसली आहे. त्यासाठी महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी इंदौर शहराची (PMC Indore Tour) याबाबत पाहणी करण्यासाठी दौरा आयोजित केला होता. दौऱ्यांनंतर दुसऱ्याच दिवशी विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्वप्रथम आरोग्य निरिक्षक आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये त्यांना घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, वाहतुक नियोजन, कर्मर्शियल भागातील कच याबाबत केलेले सुयोग्य नियोजन तसेच झाडणकाम इ.बाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम (Deputy Commissioner Sandeep Kadam) यांनी दिली. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिकेमार्फत ३० नोव्हेंबर व 1 डिसेम्बर रोजी इंदौर शहराचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौ-यासाठी पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. इंदोर शहरामध्ये स्वच्छतेचा आयाम राखणेकामी ज्या ज्या बेस्ट प्रॅक्टीसेस जसे की घरोघरी १०० टक्के कचरा संकलन, वाहतुक नियोजन, कर्मर्शियल भागातील कच याबाबत केलेले सुयोग्य नियोजन तसेच झाडणकाम इ.बाबतची पाहणी करण्यात आले या पाहणी दरम्यान आढळलेल्या बाबींचे अनुषंगाने आरोग्य निरीक्षक व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना याबाबत अवगत करणे व त्याबाबतचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यानुसार परिमंडळ नुसार हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. (PMC News)

 

| अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही देण्यात आली आहे जबाबदारी

1. वरिष्ठ आरोग्य निरीक्षक  राम सोनवणे, आरोग्य निरीक्षक  जालिंदर चांदगुडे व   नवनाथ शेलार यांनी इंदौर शहराची केलेल्या पहाणीबाबत पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्र. १ ते ५ मधील सर्व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांना प्रशिक्षण देणेकामी दैनंदिन बॅचेस तयार करून दु.०३.०० ते सायं ०५.०० या कालावधीत शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाकडील ऑडिटोरियम मध्ये प्रशिक्षण पूर्ण करण्यात यावे.

2. तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री राम सोनवणे, आरोग्य निरीक्षक श्री. जालिंदर चांदगुडे व श्री. नवनाथ शेलार यांनी दिलेल्या प्रशिक्षणाबाबतचा अहवाल मुख्य खात्याकडे सादर करावा.

3. प्रशिक्षणासाठी लागणारा शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाकडील ऑडिटॉरियम (उप आयुक्त कार्यालय परिमंडळ क्र. १) येथील उपलब्धतेबाबत व त्याबाबतचे योग्य ते आवश्यक नियोजन प्र. सहायक
आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक श्री. इमामुद्दीन इनामदार यांनी करावयाचे आहे.