PMC Solid Waste Management | आता रविवारी देखील स्वच्छतेच्या कामांना सुट्टी नाही | उपायुक्त संदीप कदम यांचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश 

Categories
PMC social पुणे
Spread the love

PMC Solid Waste Management | आता रविवारी देखील स्वच्छतेच्या कामांना सुट्टी नाही | उपायुक्त संदीप कदम यांचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

PMC Solid Waste Management | क्षेत्रीय कार्यालय स्तरावर (PMC Ward Office) आठवड्याचे सातही दिवस स्वच्छता विषयक कामकाजाचे नियोजन करण्याचे आदेश उपायुक्त संदीप कदम (PMC Deputy Commissioner Sandip Kadam) यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)

संदीप कदम यांच्या आदेशानुसार  महापालिका आयुक्त यांनी रविवारी संपूर्ण शहरात प्रत्यक्ष पहाणी केली असता सार्वजनिक ठिकाणे, मुख्य रस्ते, सार्वजनिक स्वच्छता गृहे व आजूबाजूचा परिसर येथे स्वच्छता नसल्याचे आढळून आल्याने त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय रविवारी देखील स्वच्छताविषयक कामकाज करणेबाबत आदेशित केले आहे. तसेच याबाबत शहरातील सामाजिक संघटनांनी देखील मागणी केली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांना आता सरसकट रविवारी सुट्टी न देता रोटेशन नुसार सुट्टी दिली जाणार आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना 6 दिवस काम आणि 1 दिवस सुट्टी असेल मात्र यात रविवारच्या कामाचे नियोजन करावे लागणार आहे. (Pune Municipal Corporation Solid Waste Management Department)
आदेशात पुढे म्हटले आहे कि, पुणे शहरामध्ये साधारणपणे रविवारी सुट्टीच्या दिवशी महत्वाच्या व्यक्तींचे आगमन होत असते. तसेच काही खाजगी कंपन्या, शासकीय कार्यालय, विविध संस्था, शाळा, कॉलेजेस यांना सुट्टी असल्यामुळे नागरिक विविध कारणांसाठी बाहेर पडतात. त्यामुळे रस्त्यांवर वर्दळ वाढल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढते व कचरा इतरत्र पसरल्याने शहराच्या सौंदर्यास बाधा निर्माण होते.
याबाबत प्रसार माध्यमात देखील बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये सुद्धा आपले शहर कायम स्वच्छ रहावे हे अपेक्षित आहे. त्यामुळे रविवारी स्वच्छताविषयक कामकाज पूर्ण क्षमतेने चालू राहील या दृष्टीने आपले अधिनस्त असलेले स्वच्छताविषयक कामकाज करणारे खाजगी
कर्मचारी व मनपा कर्मचारी, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, मोकादम, सफाई सेवक यांचे संपूर्ण आठवड्याचे (सोमवार ते रविवार) स्वच्छताविषयक कामाचे व सुट्टीचे दिवशीचे नियोजन करण्यात यावे.
याकरिता मोटार वाहन विभागाने कचरा वाहतूक गाड्यांचे व त्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कामाचे व त्यांचे सुट्टीचे दिवशीचे नियोजन करणे आवश्यक असून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना त्याप्रमाणे सूचित करण्यात यावे. तसेच रात्रपाळीमध्ये चालू असलेले कमर्शियल क्षेत्राचे कामकाज व्यवस्थित चालू राहील, याबाबतही विशेष दक्षता घेण्यात यावी. त्यामुळे यापुढे संपूर्ण आठवडाभर ( आठवड्याचे सातही दिवस) कामकाज होणेबाबत योग्य ते नियोजन करण्याचे आदेश कदम यांनी दिले आहेत.