Final Voter List | पुणे महापालिका निवडणूक | अंतिम मतदार यादी उद्या प्रसिद्ध होणार 

Categories
Breaking News PMC पुणे
Spread the love

पुणे महापालिका निवडणूक | अंतिम मतदार यादी उद्या प्रसिद्ध होणार

पुणे महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी  संदर्भातील कामकाज पूर्ण झाले आहे. मतदार यादी संगणक प्रणालीत अपडेट केली जाणार आहे. त्यानंतर गुरुवारी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी  प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी महापालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

 निवडणूक आयोगाने  31 मे रोजी सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या प्रभाग निहाय मतदार याद्या तयार केल्या आहे. प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्या 23 जून रोजी प्रसिद्ध करुन त्यावर 3 जुलै पर्यंत हरकती व सूचना कळवण्यास सांगितले होते. त्यानुसार प्राप्त झालेल्या हरकती व सूचना विचार घेऊन महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील तरतुदीनुसार प्रभाग निहाय अंतिम याद्या गुरुवारी (दि.21) प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय मतदार यादीच्या छापील प्रती पालिकेकडून सशुल्क क्षेत्रिय कार्यालयात उपलब्ध होणार आहेत.

क्षेत्रीय कार्यालय       –   प्रभाग

1. औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय  – 11,12,13,14

2. भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय – 27,28,39

3. बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय  – 40,41,48,57,58

4. धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय  – 38,50,55,56

5. ढोलेपाटील रोड क्षेत्रिय कार्यालय – 19,20,21

6. हडपसर-मुंढवा क्षेत्रिय कार्यालय  – 22,23,24,25,45

7. कसबा-विश्रामबाग क्षेत्रिय कार्यालय  – 17,18, 29,37

8. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय  – 46,47,49

9. कोथरूड-बावधन क्षेत्रिय कार्यालय – 30-31,32,33

10. नगररोड-वडगावशेरी क्षेत्रिय कार्यालय  -3,4,5,6,7

11. शिवाजीनगर-घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय – 10, 15,16

12. सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय – 51,52,53,54

13. वानवडी-रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय  – 26,42,43,44

14. वारजे-कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय  -34,35,36

15. येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रिय कार्यालय – 1,2,8,9