Pune News | Team CM च्या सदस्यांनी वाचवले सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे प्राण! 

Categories
Breaking News Political social पुणे
Spread the love

Pune News | Team CM च्या सदस्यांनी वाचवले सेवानिवृत्त पोलिस निरीक्षकाचे प्राण!

 

Pune  News | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.1) पुणे दौऱ्यावर (PM Narendra Modi Pune Visit) आले होते. पुणेकरांनी मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. मोदींचा दौरा असल्याने पुणे पोलिसांनी (Pune Police) मोठा बंदोबस्त तैनात केला होता. नागरिकांनी देखील पोलिसांना सहकार्य केले. तसेच भाजप (BJP), शिंदे गट (Shinde Group) आणि अजित पवार गटाचे (Ajit Pawar Group) कार्यकर्त्यांनी देखील पोलिसांना सहकार्य केले. याच दरम्यान शिवाजीनगर येथे झालेल्या अपघातात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक (Retired Police Inspector) गंभीर जखमी (Seriously Injured) झाले. यावेळी त्याठिकाणी उपस्थितीत असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टीमचे प्रमुख सुधीर जोशी (Sudhir Joshi) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अपघातात (Pune Accident News) जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करुन त्यांचे प्राण वाचवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे मेट्रो (Pune Metro) उद्घाटन सोहळ्यासाठी वडगाव शेरी मतदार संघातील भाजप ज्येष्ठ नागरिक आघाडीचे उपाध्यक्ष आणि सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे (Retired PI Vitthal Surve) आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी रस्ता ओलांडत असताना त्यांना कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (Karnataka State Transport Corporation) बसने जोरदार धडक दिली. त्याचवेळी कार्यक्रमाला आलेले सुधीर जोशी आसनव्यवस्थेकडे जात होती. त्यांनी अपघात (Pune Accident News) पाहताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी विठ्ठल सुर्वे यांना तातडीने वैद्यकीय उपचार (Medical Treatment) मिळावेत यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले.

त्याठिकाणी कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने होते. मात्र, कर्तव्यावर नियुक्त असल्याने त्यांनी मदत करण्यास असमर्थता दाखवली. यानंतर जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी वेगाने हालचाली करत त्यांना खासगी वाहनाने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तज्ञ डॉक्टरंशी संपर्क करीत त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले. सुर्वे यांच्या मेंदूला मार बसल्याने वेळात वैद्यकीय उपचार मिळाल्याने सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल सुर्वे यांचे प्राण वाचले.

यावेळी आशुतोष शेंडगे, ऋषिकेश गोसावी, उपशहरप्रमुख सुधीर कुरूमकर यांनीही तातडीने मदत केली. विठ्ठल सुर्वे त्यांच्यावर संचेती रुग्णालयात (Sancheti Hospital) आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत. शिवसेना (Shiv Sena) शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) आणि एकनाथ शिंदे सोशल फाउंडेशनतर्फे (Eknath Shinde Social Foundation) त्यांच्या उपचारासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येत आहे.


News Title | Pune News | Members of Team CM saved the life of a retired police inspector!